AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उद्धव ठाकरेंसोबत चांदीची वीट, राम मंदिराची पायाभरणी?

अयोध्या (लखनऊ): शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला जंगी सुरुवात झाली आहे. दुपारी दीडच्या सुमारास उत्तर प्रदेशातील फैजाबाद विमानतळावर दाखल झाले. उद्धव ठाकरेंच्या स्वागताला अनेक शिवसेना नेत्यांसह शिवसैनिकांनी गर्दी केली. ढोल ताशांच्या गजरात उद्धव ठाकरेंचं स्वागत करण्यात आलं. त्यानंतर उद्धव ठाकरे दुपारी साडेतीनच्या सुमारास लक्ष्मण किल्ल्यावर दाखल झाले. इथे त्यांनी सहकुटुंब पूजा-अर्चा केली. मात्र […]

उद्धव ठाकरेंसोबत चांदीची वीट, राम मंदिराची पायाभरणी?
| Updated on: Jul 05, 2019 | 4:58 PM
Share

अयोध्या (लखनऊ): शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला जंगी सुरुवात झाली आहे. दुपारी दीडच्या सुमारास उत्तर प्रदेशातील फैजाबाद विमानतळावर दाखल झाले. उद्धव ठाकरेंच्या स्वागताला अनेक शिवसेना नेत्यांसह शिवसैनिकांनी गर्दी केली. ढोल ताशांच्या गजरात उद्धव ठाकरेंचं स्वागत करण्यात आलं. त्यानंतर उद्धव ठाकरे दुपारी साडेतीनच्या सुमारास लक्ष्मण किल्ल्यावर दाखल झाले. इथे त्यांनी सहकुटुंब पूजा-अर्चा केली. मात्र सर्वाधिक लक्ष वेधून घेतलं ते त्यांच्यासाठी आणलेल्या चांदीच्या वीटेने. शिवसेनेचे औरंगाबादचे खासदार  चंद्रकांत खैरे यांनी तब्बल 4 किलोची चांदीची वीट उद्धव ठाकरेंसोबत अयोध्या दौऱ्यावर आणली आहे. ‘हर हिंदू की यही पुकार, पहले मंदीर फीर सरकार’ अशी घोषणा देत शिवसैनिक राम मंदिरासाठी अयोध्येत आले आहेत.

उत्तर प्रदेशात जाऊन उद्धव ठाकरे म्हणाले, “जय महाराष्ट्र”   

त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी चांदीची वीट आणून इथे राम मंदिराच्या पायाभरणीचे संकेत दिले आहेत का असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे. सध्या राम मंदिराचा प्रश्न सुप्रीम कोर्टात आहे. मात्र भाजप सरकारने निवडणुकीपूर्वी राम मंदिर बांधण्याचं आश्वासन दिलं होतं. पण सरकारला पाच वर्ष पूर्ण होत आले तरी राम मंदिराची एकही वीट नसल्याचा आरोप शिवसेनेसह सहकारी पक्षांनी केला आहे.

त्याचाच एक भाग म्हणून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हजारो शिवसैनिकांसह अयोध्येत दाखल झाले आहेत. शिवसैनिक आणि कारसेवकांनी 1992 मध्ये बाबर मस्जित पाडली होती, तसं वक्तव्य शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी केलं होतं. त्यानंतर 26 वर्षांनी उद्धव ठाकरे हे अयोध्येत आल्याने देशाचं लक्ष या दौऱ्याकडे लागलं आहे. त्यात आता त्यांनी थेट चांदीची वीट आणल्याने राम मंदिराचा प्रश्न ऐरणीवर आला.

उद्धव ठाकरेंचा एल्गार

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अयोध्येतील लक्ष्मण किल्यावर जाऊन राम मंदिराचा आग्रह धरला. “पहिल्यांदाच अयोध्येत आलोय, झोपलेल्या कुंभकर्णाला जागं करायला आलो आहे. यापुढे वारंवार येणार. अयोध्येत राम मंदिर झालंच पाहिजे. राम मंदिराचा अध्यादेश आणा. नोटाबंदीसारखा राम मंदिराचा कायदा करा”, असं उद्धव ठाकरे म्हणाले. तुम्ही मंदिर बनवा, मी श्रेय घेणार नाही. फक्त मी रामभक्त म्हणून येईन. आता हिंदू गप्प बसणार नाही, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे सहकुटुंब दुपारी दीडच्या सुमारास उत्तर प्रदेशातील फैजाबाद विमानतळावर दाखल झाले. उद्धव ठाकरेंच्या स्वागताला अनेक शिवसेना नेत्यांसह शिवसैनिकांनी गर्दी केली. ढोल ताशांच्या गजरात उद्धव ठाकरेंचं स्वागत करण्यात आलं. उद्धव ठाकरे दुपारी बाराच्या सुमारास मुंबईतून अयोध्येच्या दिशेने निघाले. सुमारे दीड तासात ते फैजाबादमध्ये पोहोचले. त्यानंतर ते सहकुटुंब आधी पंचवटी हॉटेलमध्ये गेले. तिथून ते कार्यक्रमाला रवाना झाले.

संबंधित बातम्या

उत्तर प्रदेशात जाऊन उद्धव ठाकरे म्हणाले, “जय महाराष्ट्र”   

अयोध्या LIVE: मला श्रेय नको, पण आता हिंदू गप्प बसणार नाही: उद्धव ठाकरे     

VIDEO : तणावपूर्ण अयोध्येत शिवसेैनिकांनी बंदुका नाचवल्या  

उद्धव ठाकरेंचं विमान अयोध्येत उतरलं तो क्षण   

‘अयोध्येला निघालो जोशात राजीनामे मात्र अजूनही खिशात’, मनसेचे पोस्टर्स    

जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.