Budget 2021 : ‘बजेटमध्ये आत्मनिर्भर भारतचं दर्शन, सर्वसामान्यांवर कोणताही बोजा नाही’, पंतप्रधान मोदींची पहिली प्रतिक्रिया

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज संसदेत बजेट 2021 सादर केला. या बजेटवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रतिक्रिया दिली (PM Narendra Modi on Budget 2021)

Budget 2021 : 'बजेटमध्ये आत्मनिर्भर भारतचं दर्शन, सर्वसामान्यांवर कोणताही बोजा नाही', पंतप्रधान मोदींची पहिली प्रतिक्रिया
Government Companies

नवी दिल्ली : अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज संसदेत बजेट 2021 सादर केला. या बजेटवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या बजेटमध्ये प्रत्येक व्यक्तीचा विचार करण्यात आला आहे. शेतकरी, कामगार, तरुण ते महिला या सर्वांचा बजेटमध्ये विचार करण्यात आला आहे. हा बजेट एक सकारात्मक बदल घडवेल. त्याचबरोबर या बजेटमध्ये सर्वसामान्यांवर कोणताही बोजा टाकण्यात आलेला नाही, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले (PM Narendra Modi on Budget 2021).

“कोरोना संकटाने संपूर्ण मानव जातीला हादरवून सोडलं. सध्याच्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आजचा बजेट भारताच्या आत्मविश्वासाला जागरुत करणारा आहे. त्याचबरोबर हा बजेट जगात एक वेगळा आत्मविश्वास निर्माण करणारा आहे. आजच्या बजेटमध्ये आत्मनिर्भरताचं ध्येय आहे. याशिवाय प्रत्येक नागरिक आणि प्रत्येक वर्गाचा समावेश आहे”, असं पंतप्रधान मोदी म्हणाले (PM Narendra Modi on Budget 2021).

“ग्रोथसाठी नव्या संकल्पनांचा विस्तार करायचा, तरुणांसाठी नव्या संधी निर्माण करायची, मानव संसाधनासाठी काम करायची, इन्फ्रास्ट्रक्चर निर्माण करण्यासाठी नवनव्या क्षेत्रांना विकसित करणं, आधुनिकताच्या दिशेला पुढे चालायचं, नव्या सुधारणा आणायचं, हे या बजेटचे सिद्धांत आहेत”, असं मोदींनी सांगितलं.

“नियम आणि प्रक्रियेला सरळ बनवून सर्वसामान्य लोकांच्या आयुष्यात इज ऑफ लिव्हिंगला वाढण्यावर जोर दिला गेला आहे. हा बजेट वैयक्तिक, गुंतवणुकदार आणि इन्फ्रास्ट्रक्चर सेक्टरमध्ये खूप सकारात्मक बदल घडवून आणणार आहे. मी यासाठी देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण, मंत्री अनुराग ठाकूर आणि त्यांच्या संपूर्ण टीमचं अभिनंदन करतो”, असं मोदी म्हणाले.

“विशेष म्हणजे बजेट सादर होताच सुरुवातीच्या दोन तासांमध्ये अनेक सकारात्मक गोष्टी समोर आल्या आहेत. कोरोना संकट सुरु असल्याने सरकार सर्वसामान्यांवरील ओझं वाढवेल, असा अंदाज अनेक तज्ज्ञांनी वर्तवला होता. मात्र, सरकारने बजेट ट्रान्सपर्ट असण्यावर भर दिला आहे. अनेकांनी या बेजटचं स्वागत केलं आहे”, असा दावा त्यांनी केला.

“या बजेटमध्ये देशातील प्रत्येक क्षेत्राचा विचार केला गेला आहे. उत्तरेकडे लेह-लडाख, दक्षिण आणि पूर्व राज्यांमध्ये विकासाचं ध्येय ठेवण्यात आलं आहे. या बजेटमध्ये कोस्टल स्टेट जसे तामिळनाडू, केरळ, पश्चिम बंगाल या राज्यांना एक बिझनेस पॉवर बनवण्याच्या दृष्टीकोनाने महत्त्वपूर्ण पाऊल उचललं गेलं आहे. या बजेटमुळे युवकांना ताकद मिळेल. भारत उज्ज्वल भविष्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलेल”, असं मोदी म्हणाले.

“महिलांचं जीवन आणखी सुरळीत करण्यासाठी त्यांच्या आरोग्यासाठी, स्वच्छता, पोषक अन्न आणि पाण्यासाठी तरतूद करण्यात आली आहे. बजेटमध्ये रोजगार, अॅग्रीकल्चर सेक्टरसाठी अनेक तरतूद करण्यात आल्या आहेत. कृषी उत्पन्न बाजार समितींना आणखी बळकट करण्यासाठी पावलं उचलण्यात आली आहेत. हा बजेट आत्मनिर्भर भारतच्या मार्गाला जाणारा आहे ज्यामुळे देशाच्या प्रत्येक नागरिकांची प्रगती यामध्ये सामील आहे”, असंदेखील पंतप्रधान मोदी यांनी सांगितलं.

संबंधित बातम्या :

Budget 2021: बजेटचं भाषण संपताच सोने 1200 रुपयाने स्वस्त; जाणून घ्या दहा ग्रॅम सोन्याचा भाव

Budget 2021 : बँकांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी 20 हजार कोटींची घोषणा, तुमच्या खात्यावर याचा काय परिणाम होणार?

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI