Budget 2021 : बँकांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी 20 हजार कोटींची घोषणा, तुमच्या खात्यावर याचा काय परिणाम होणार?

केंद्र सरकारने बँकांना पुनर्जिवित करण्यासाठी 20 हजार कोटींची घोषणा केली आहे. सरकारच्या या निर्णयाचा सर्वसामान्य जनता आणि ग्राहकांना मोठा फायदा होणार आहे (Budget 2021 Nirmala Sitharaman announce 20000 crore recapitalisation of state owned banks).

Budget 2021 : बँकांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी 20 हजार कोटींची घोषणा, तुमच्या खात्यावर याचा काय परिणाम होणार?
Nirmala Sitharaman

नवी दिल्ली : कोरोना काळात सार्वजनिक क्षेत्रातील बँकांची अवस्था खराब झाली. त्यांच्यावर कर्जाचं मोठं ओझं झालं. त्यामुळे सरकारी बँकांची अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी सरकारने अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. केंद्र सरकारने बँकांना पुनर्जिवित करण्यासाठी 20 हजार कोटींची घोषणा केली आहे. त्याचबरोबर बॅड बँकेची घोषणा केली आहे. सरकारच्या या निर्णयाचा सर्वसामान्य जनता आणि ग्राहकांना मोठा फायदा होणार आहे (Budget 2021 Nirmala Sitharaman announce 20000 crore recapitalisation of state owned banks).

बँकांजवळ पैसे आले तरच त्यांची आर्थिक स्थिती मजबूत होईल. बँक स्वत: ला अपग्रेड करेल, टेक्नॉलिजित पारंगत होईल, सेक्युरिटी फिचर्स मजबूत होईल आणि बँकांमधील स्पर्धा वाढेल. त्याचा थेट फायदा ग्राहकांना होईल. ग्राहकांना चांगली सुविधा मिळेल आणि बँकिंगशी संबंधित सर्व गोष्टी सोप्या होतील.

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्प सादर करताना 2 सरकारी बँकेचे शेअर्स विकण्याची घोषणा केली. देशात सध्या 12 पब्लिक सेक्टरच्या बँका आहेत. सरकार हळूहळू छोट्या बँकांना मोठ्या बँकेत मर्ज (विलीनिकरण) किंवा सामावून घेणार आहे. याचा फायदा म्हणजे बँकाच्या मालमत्तेत भर पडेल. याशिवाय जे नुकसान झाले आहे त्याची झळ सोसण्यासाठी बळ येईल आणि त्याविरोधात सामना करता येतो. याशिवाय एक इन्शुरन्स कंपनी विकली जाणार आहे. निधी गोळा करण्यासाठी सरकारी कंपन्यांची अतिरिक्त जमीन विकली जाईल.

20 हजार कोटी रुपये बॅड बँकेसाठी

बँकांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी आणि कर्ज बुडव्यांकडून वसुली करण्यासाठी केंद्रीय अर्थ मंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पातून बॅड बँकेची घोषणा केली आहे. त्यासाठी 20 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे बँकिंग क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर सुधारणा होणार आहे.

केंद्र सरकारने 2020-2021 या आर्थिक वर्षासाठीचा आर्थिक सर्व्हेक्षण अहवाल सादर केला होता. त्यानंतर मुख्य आर्थिक सल्लागार के. व्ही. सुब्रमण्यम यांनी बॅड बँक स्थापन करण्याची जोरदार मागणी केली होती. एनपीएची समस्या सोडवण्यासाठी बॅड बँकेची गरज आहे. कोरोनामुळे रिझर्व्ह बँकेने अनेक नियमांमध्ये शिथिलता दिली होती. पुन्हा हे नियम लागू केल्यानंतर बँकांच्या बुडालेल्या कर्जांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या संकटातून बँकांना बाहेर काढण्यासाठी बॅड बँके सुरू करण्याची मागणी करण्यात येत होती. यापूर्वी आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनीही बॅड बँक सुरू करण्याची मागणी केली होती. त्यानुसार आज सादर झालेल्या अर्थसंकल्पात बॅड बँकची संकल्पना मांडण्यात आली आहे. या बॅड बँकेला डेव्हल्पेमेंट फायनान्स इन्सिट्यूशनच्या नावाने ओळखले जाणार आहे.

बॅड बँक म्हणजे काय?

ही एक आर्थिक संस्था आहे. बँकांचे बुडित खात्यात गेलेलं कर्ज स्वीकारून त्यातून सुनिश्चितपणे मार्ग काढण्याची प्रक्रिया बॅड बँकेकडून केली जाते. बँका आणि ऋणदात्यांकडूनही बॅड बँकेची मागणी करण्यात येत होती. बुडालेल्या कर्जाचा ताण कमी व्हावा यासाठी ही मागणी करण्यात येत होती. जगात फ्रान्स, पोर्तुगाल आणि स्पेनसारख्या देशात बॅड बँका कार्यरत आहेत. या वित्तीय संस्थेचं काम बॅड अॅसेट्सला गुड अॅसेट्समध्ये रुपांतरीत करण्याचं असतं (Budget 2021 Nirmala Sitharaman announce 20000 crore recapitalisation of state owned banks).

संबंधित बातम्या:

Union Budget 2021 Marathi LIVE : पुढील जनगणना डिजीटल होणार

Nirmala Sitharaman Saree | निर्मला सीतारमण यांच्या लूकने लक्ष वेधले, लाल साडी निवडण्याचे कारण काय?

Budget 2021: कोरोना काळात पाच मिनी बजेट एवढी आर्थिक मदत: निर्मला सीतारामन

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI