AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Budget 2022 | मोदी सरकारचा टॅक्स स्लॅबचाही रेकॉर्ड, तुमचा इनकम टॅक्स कसा कटणार ?

नवी दिल्लीः  मध्यमवर्गीय कुटुंबांच्या दृष्टीने अर्थसंकल्पातील (Budget 2022) महत्त्वाचा मुद्दा हा आयकर सवलतींचा असतो. यंदाच्या अर्थसंकल्पात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Seetharaman) नोकरदारांसाठी कोणती घोषणा करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र आयकर किंवा प्राप्तिकराच्या सवलतीत काही दिलासा मिळेल का, याकडे आशा लावून बसलेल्या नोकरदारांची बजेटकडून निराशा झाली आहे. इन्कम टॅक्सच्या स्लॅबमध्ये (Income Tax Slabs) […]

Budget 2022 | मोदी सरकारचा टॅक्स स्लॅबचाही रेकॉर्ड, तुमचा इनकम टॅक्स कसा कटणार ?
| Edited By: | Updated on: Feb 01, 2022 | 2:12 PM
Share

नवी दिल्लीः  मध्यमवर्गीय कुटुंबांच्या दृष्टीने अर्थसंकल्पातील (Budget 2022) महत्त्वाचा मुद्दा हा आयकर सवलतींचा असतो. यंदाच्या अर्थसंकल्पात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Seetharaman) नोकरदारांसाठी कोणती घोषणा करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र आयकर किंवा प्राप्तिकराच्या सवलतीत काही दिलासा मिळेल का, याकडे आशा लावून बसलेल्या नोकरदारांची बजेटकडून निराशा झाली आहे. इन्कम टॅक्सच्या स्लॅबमध्ये (Income Tax Slabs) कोणताही बदल झालेला नाही. 2022-23 या आर्थिक वर्षातदेखील जुनीच कररचना सुरु राहणार. मात्र कर चोरी पकडल्यास सदर व्यक्तीची संपत्ती जप्त होऊ शकते, असे अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सांगितले. देशातील एक मोठा पगारदार वर्ग करदाता असतो. ज्याचे वर्षाचे उत्पन्न निश्चित असते. अशा व्यक्तींना अर्थसंकल्पात आयकरातून सूट मिळते का, असा प्रश्न पडलेला असतो. मागील काही वर्षांपासून आयकरात कोणतीही अतिरिक्त सवलत मिळालेली नाही. यंदादेखील आता टॅक्स स्लॅबमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

दिव्यांग व्यक्तींच्या पालकांना मात्र यंदाच्या अर्थसंकल्पात सवलत देण्यात आली आहे.

कर भरण्याच्या प्रक्रियेत काय सुधारणा?

कर भरण्याच्या प्रक्रियेतील त्रुटी दूर करण्यासाठी करदात्यांना संधी दिली जाणार आहे. ही मोठी घोषणा आजच्या बजेटमध्ये करण्यात आली. या प्रक्रियेत पुढील सवलती देण्यात आल्या आहेत.

– अपडेटेड रिटर्न पुढील 2 वर्षात फाइल करता येतात. मात्र त्यासाठी दंडही भरावा लागेल. – आयकर रिटर्नमध्ये नंतर कोणतीही सुधारणा करता येऊ शकते. – भारतातील करदात्यांना याचा फायदा होईल. तसेच आयकरासंबंधी वादांमध्ये याची मोठी मदत होईल.

आर्थिक वर्ष 2022-23 साठी नवी कररचना पुढीलप्रमाणे-

– 0 ते 2.5 लाख रुपये वार्षिक उत्पन्न असलेले नोकरदार करमुक्त असतील. – 2.5 ते 5 लाख रुपये वार्षिक उत्पन्न असलेल्यांना 5 टक्के आयकर लागेल. – 5 ते 7.5 लाख रुपये वार्षिक उत्पन्न असलेल्यांना 10 टक्के आयकर लागेल. – 7.5 ते 10 लाख रुपये वार्षिक उत्पन्न असलेल्यांना 15 टक्के आयकर असेल. – 10 ते 12.5 लाख रुपये वार्षिक उत्पन्न असलेल्यांना 20 टक्के आयकर लागेल. – 12.5 ते 15 लाख रुपये वार्षिक उत्पन्न असलेल्यांना 25 टक्के आयकर लागेल. – 15 लाखांपेक्षा जास्त वार्षिक उत्पन्न असलेल्यांना 30 टक्के आयकर लागेल.

इतर बातम्या-

VIDEO : जानेवारी 2022 पर्यंत 1 लाख 40 हजार कोटी GST जमा : Nirmala Sitharaman | Budget 2022 |

BUDGET 2022: ‘सेझ’चा कायदा बदलणार, राज्य सरकार होणार भागीदार, अर्थमंत्र्यांची घोषणा

रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.