AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra Budget 2026-27 : देवेंद्र फडणवीस यांच्या अर्थसंकल्पातील पहिल्या दहा घोषणा काय?

Maharashtra Budget 2026-27 : राज्यात महायुतीचं सरकार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधानसभेत अर्थसंकल्प मांडत आहेत. वर्ष 2026-2027 च्या अर्थसंकल्पात त्यांनी वेगवेगळ्या घोषणा केल्या आहेत.

Maharashtra Budget 2026-27 : देवेंद्र फडणवीस यांच्या अर्थसंकल्पातील पहिल्या दहा घोषणा काय?
Devendra Fadnavis
| Updated on: Mar 06, 2026 | 2:19 PM
Share

राज्यात महायुतीचं सरकार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधानसभेत अर्थसंकल्प मांडत आहेत. वर्ष 2026-2027 च्या अर्थसंकल्पात त्यांनी वेगवेगळ्या घोषणा केल्या आहेत. खरंतर अजित पवार यांच्या अकाली निधनामुळे देवेंद्र फडणवीस यांच्यावर हा अर्थसंकल्प मांडण्याची वेळ आली. अजित पवार महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तसेच राज्याचे अर्थमंत्री होते. त्यांनी आतापर्यंत अनेकवेळा अर्थसंकल्प मांडला. देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्प मांडताना हा अर्थसंकल्प अजितदादांना समर्पित करत असल्याचं सांगितलं. देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्प सादर करताना पहिल्या दहा काय घोषणा केल्या आहेत ते जाणून घ्या.

महात्मा फुले यांच्या जयंतीला 200 वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने एक समिती स्थापन करून विविध सामाजिक कार्यक्रम राबवण्यात येतील.

संत गाडगेबाबांचं 150 वं जयंती वर्ष आहे. त्यामुळे एक सर्किट तयार करणार. संत गाडगेबाबा ग्राम योजना राबवणार.

बाबासाहेब आंबेडकर यांच्या महाड येथील चवदार तळ्याच्या सोयीसुविधांसाठी तरतूद करण्यात येणार आहे.

२०२६-२०२७ हे वर्ष सामाजिक समता आणि समरसता वर्ष म्हणून साजरे करण्यात येणार आहे.

बाळासाहेब ठाकरे यांच्या दादरमधील स्मारकाचे पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले आहे. अंतिम काम जूनपर्यंत होईल.

संत तुकाराम महाराज बीज सोहळा झाला. देहू येथील तुकारामांच्या जन्मस्थानाचं जतन आणि संवर्धन करू.

16 व्या वित्त आयोगाच्या शिफारशी नुसार केंद्राकडून भरीव निधी प्राप्त होणार आहे. सहाव्या वित्त आयोगाची स्थापना राज्य सरकारने केली होती. त्यांचा अहवाल राज्यपालांच्या मान्यतेनंतर पटलावर ठेवण्यात येईल.

1 फेब्रुवारी 2026 रोजी युवा केंद्रीत अर्थसंकल्प सादर केला. मुंबई-पुणे जलदगती ट्रेनसाठी तरतूद केली आहे. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानतो. विकसित महाराष्ट्रात आपला वाटा सर्वात मोठा असेल.

बळीराजाला केंद्रस्थानी ठेवून 10 ते 15 ठिकाणांसाठी एकत्रित मूल्य साखळी तयार केली जाईल.

संयुक्त राष्ट्र संघटनेने आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष म्हणून घोषित केलं आहे. महिला गोपालक, कुक्कुटपालकांसाठी विशेष योजना करण्यात येणार आहे.

1 कोटीची मुख्यमंत्री मत्स्य योजना करण्यात येत आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...