AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra Budget 2026-27 : मुंबई-पुण्यासह महाराष्ट्राच्या इन्फ्रास्ट्रक्चरसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनी काय महत्वाच्या घोषणा केल्यात?

Maharashtra Budget 2026-27 : कुठल्याही राज्याच्या, देशाच्या विकासात इन्फ्रास्ट्रक्चरचा रोल महत्वाचा असतो. महाराष्ट्राच्या इन्फ्रास्ट्रक्चरसाठी देवेंद्र फडणवीस यांनी काय घोषणा केल्या आहेत ते जाणून घ्या.

Maharashtra Budget 2026-27 : मुंबई-पुण्यासह महाराष्ट्राच्या इन्फ्रास्ट्रक्चरसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनी काय महत्वाच्या घोषणा केल्यात?
Devendra fadnavis
| Updated on: Mar 06, 2026 | 2:43 PM
Share

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज विधानसभेत वर्ष 2026-2027 साठीचा अर्थसंकल्प मांडत आहेत. अर्थसंकल्पात त्यांनी वेगवेगळ्या घोषणा केल्या आहेत. त्यात इन्फ्रास्ट्रक्चर एक महत्वाचा विषय आहे. कुठल्याही राज्याच्या, देशाच्या विकासात इन्फ्रास्ट्रक्चरचा रोल महत्वाचा असतो. कारण त्यामुळे जीडीपी, रोजगाराला गती मिळते. महाराष्ट्राच्या इन्फ्रास्ट्रक्चरसाठी देवेंद्र फडणवीस यांनी काय घोषणा केल्या आहेत ते जाणून घ्या.

मुंबई-पुणे जलदगती ट्रेनसाठी तरतूद केली आहे. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानतो. विकसित महाराष्ट्रात आपला वाटा सर्वात मोठा असेल.

महाराष्ट्र हे देशाचे आर्थिक इंजिन आहे. विकसित भारत 2047 च्या विकासात आपला मोठा वाटा असेल. 5 ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्था करणं हे आपलं ध्येय आहे. राज्याच्या सर्व अर्थसंकल्पात विकसित महाराष्ट्राचं प्रतिबिंब दिसणार आहे.

राज्याचे व्हिजन डॉक्युमेंट तयार केले आहे.

प्रादेशिक संतुलित विकासासाठी चार प्रमुख स्तंभ ठरवले आहे. चार केंद्रांखाली १६ उपकेंद्र ठरवले आहेत. प्रत्येक अर्थसंकल्पात त्याची छबी दिसेल.

मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा एक अंतर्गत ३० हजार किलोमीटर पर्यंत कामे झाली आहेत. उर्वरीत कामे मार्च अखेरीपर्यंत होत आहेत.

आम्ही टप्पा तीन घोषित करत आहोत. २३ हजार किलोमीटर लांबीचे रस्ते आणि पुलांचे कामे करता येणार आहे.

चार वर्षांत भांडवली गुंतवणूक वाढवून पायाभूत सुविधा निर्माण केल्या जातील

मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा ३ अंतर्गत २३ हजार किमी रस्ते व पुलांची कामे हाती घेतली जातील.

१२३ अब्ज डॉलरवरून १५०० अब्ज डॉलर्स पर्यंत वाढविण्याचे उद्देश आहे. महाराष्ट्र हे जागतिक उत्पादन केंद्र बनविण्याचे उद्देश आहे.

इन्व्हेस्ट महाराष्ट्र हा व्यासपीठ तयार करत आहोत. ५० लाख प्रत्यक्ष रोजगार निर्माण होईल. सेवा क्षेत्रासाठी आयुक्तालय करण्याची घोषणा करत आहे.

राज्याचे नवीन गुंतवणूक व औद्योगिक सेवा धोरण जाहीर केलं आहे. इन्व्हेस्ट महाराष्ट्र हा एकसंघ डिजीटल प्लॅटफॉर्म तयार केला जात आहे. या धोरणातून ५० लाख रोजगार निर्माण होणार आहे. तसेच यासाठी आयुक्तालय स्थापन करण्याची घोषणा करण्यात येत आहे.

महाराष्ट्रातील पुणे हे जीसीसी साठी सर्वात पसंतीचे शहर ठरत आहे. 4 लाख उच्च कुशल रोजगार निर्मितीचे लक्ष आहे.

निवडक 50 पर्यटन स्थळी पायाभूत सुविधा तयार करण्यात येणार आहे. वासोटा किल्ला हा महाराजांच्या शौर्य आणि रणनीतीचे प्रतिक आहे. मुनावळे ते वासोटा किल्ला रोपवे सुरू करणार.

राज्यातील तिसरी चित्रनगरी नवरगा तालुका रामटेक येथे विकसित करण्यात येणार आहे. नवीन पिढीला महाकवी कालिदासांचा जीवनपट कळावा म्हणून चित्रपटासाठी अर्थसहाय्य देण्यात येईल.

वाढवण जवळ चौथी मुंबई विकसित करणार.

बुलेट ट्रेनच्या तीन स्थानकांची कामे 2027 पर्यंत पूर्ण करणार.

मुंबई दुबई सिंगारपूरमध्ये पर्यटन गुंतवणूक करणार.

मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन मार्गातील काम २०२७पर्यंत पाच स्थानकांचे काम पूर्ण होईल.

तिसऱ्या मुंबईत रायगड पेण व नवी मुंबई विमानतळ ही ग्रीन फिल्ड म्हणून विकसित करणार.

चौथी मुंबई वाढवण येथे होईल.एमएमआरमध्ये 10 लाख नवी घरे उभारणार. नवी अनधिकृत बांधकामे होणार नाहीत, याचा रोडमॅप तयार होणार.

राज्यात 1 हजार 200 किमीचे मेट्रो मार्ग व 6 हजार किमीचे द्रुतगती मार्ग विकसित केले जातील. 2019 पर्यंत 165 किमी मार्गाचे मेट्रो मार्गिका तयार केल्या जातील.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...