Maharashtra Budget 2022 : पंचसूत्रीमधील दुसरे सूत्र : सार्वजनिक आरोग्य आरोग्यासाठी एवढ्या कोटींची तरतूद; 16 जिल्ह्यात होणार स्त्री रुग्णालये

हा अर्थसंकल्प पंचसूत्रीच्या आधारे मांडण्यात आला असून पहिल्या सूत्रामध्ये कृषी व संलग्न,दुसऱ्या सूत्रात सार्वजनिक आरोग्य तिसऱ्या दळणवळण, चौथ्या उद्योग त्यानंतर स्मारक, पर्यटन आणि महामंडळे अशा सूत्रात या अर्थसंकल्पाची विभागणी करण्यात आहे.

Maharashtra Budget 2022 : पंचसूत्रीमधील दुसरे सूत्र : सार्वजनिक आरोग्य आरोग्यासाठी एवढ्या कोटींची तरतूद; 16 जिल्ह्यात होणार स्त्री रुग्णालये
Ajit Pawar Budget 2022Image Credit source: TV9
Follow us
| Updated on: Mar 11, 2022 | 5:44 PM

मुंबईः कोरोनाच्या संकटाकाळानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांना 2022-23 चा अर्थसंकल्प (Budget 2022-23) मांडला. यावेळी अर्थमंत्र्यांनी कृषी, आरोग्य, मनुष्यबळ विकास, दळणवळण आणि उद्योग या पंचसूत्रीच्या आधारे हा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. या अर्थसंकल्पात कृषीबरोबरच आरोग्य सुविधांवरही भर देण्यात आला आहे. या अर्थसंकल्पाचे हे विशेष आहे की, 1 ट्रिलयनची अर्थव्यवस्था असलेले महाराष्ट् हे देशातील पहिले राज्य ठरलेले आहे. या अर्थसंकल्पात आरोग्य क्षेत्रासाठी (Health Sector) 5 हजार 244 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

राज्यातील अनेक जिल्ह्यातील सरकारी रुग्णालयाना अत्याधुनिक सोयी सुविधांची तरतूद करण्यात आली असून हिंगोली, यवतमाळ, बुलढाणा, सांगली, सातारा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, वर्धा, भंडारा, जळगाव, अहमदनगर, धुळे, सोलापूर ,रत्नागिरी, औरंगाबाद आणि रायगड येथे प्रत्येकी 100 खाटांची स्त्री रुग्णालये स्थापन करणार असल्याची तरतूद या अर्थसंकल्पामध्ये करण्यात आली आहे. हा अर्थसंकल्प पंचसूत्रीच्या आधारे मांडण्यात आला असून पहिल्या सूत्रामध्ये कृषी व संलग्न,दुसऱ्या सूत्रात सार्वजनिक आरोग्य तिसऱ्या दळणवळण, चौथ्या उद्योग त्यानंतर स्मारक, पर्यटन आणि महामंडळे अशा सूत्रात या अर्थसंकल्पाची विभागणी करण्यात आहे.

अर्थसंकल्पात विकासाची पंचसूत्री

या अर्थसंकल्पात विकासाची पंचसूत्री मांडून कृषी, आरोग्य, मनुष्यबळ विकास, दळणवळण आणि उद्योग या क्षेत्रांसाठी 1 लाख 15 हजार 215 कोटी रुपयांचा नियतव्यय प्रस्तावित करण्यात आले आहेत तर येत्या तीन वर्षांत 4 लाख कोटी रूपये उपलब्ध करुन देणार असल्याचेही सांगण्यात आले आहे. कृषी व संलग्न क्षेत्रांसाठी 23 हजार 888 कोटीची तरतूद करुन आरोग्य क्षेत्रासाठी 5 हजार 244 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. तर मानव व मनुष्यबळ विकासासाठी 46 हजार 667 कोटी तरतूद करुन पायाभूत सुविधा व वाहतूकीसाठी 28 हजार 605 कोटी रुपये देण्यात आले आहेत. उद्योग व उर्जा विभागासाठी 10 हजार 111 कोटींची तरतूद अर्थमंत्री अजित पवार यांनी केली आहे.

पंचसूत्रीमधील दुसरे सूत्र : सार्वजनिक आरोग्य

  1. नांदेड, अमरावती, जालना, भंडारा, अहमदनगर आणि सातारा येथे प्रत्येकी ५० खाटांची प्रथम दर्जाची ट्रॉमा केअर युनिट उभा करण्यात येणार आहेत.
  2. 2०० खाटांच्या सर्व रुग्णालयांमध्ये येत्या तीन वर्षात लिथोट्रिप्सी उपचार पद्धती देण्यात येणार आहेत.
  3. मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी आधुनिक “फेको” उपचार पद्धती सुरु करणार
  4. ५० खाटांच्या रुग्णालयांना यांत्रिक धुलाई संयंत्रे व 30 खाटांवरील रुग्णालयांना स्वच्छता यंत्रे देणार.
  5. मोबाईल कर्करोग निदान वाहनांची सुविधा देणार
  6. हिंगोली, यवतमाळ, बुलढाणा, सांगली, सातारा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, वर्धा, भंडारा, जळगाव, अहमदनगर, धुळे, सोलापूर ,रत्नागिरी, औरंगाबाद आणि रायगड येथे प्रत्येकी 100 खाटांची स्त्री रुग्णालये स्थापन करणार.
  7. जालना येथे 365 खाटांचे नवीन प्रादेशिक मनोरूग्णालय स्थापन करण्याकरीता 60 कोटी रुपये उपलब्ध करणार
  8. मुंबई येथे सेंट जॉर्ज पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण व संशोधन संस्था, नाशिक येथील आरोग्य विज्ञान विद्यापीठात वैद्यकीय पदव्युत्तर संस्था, नागपूर येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर वैद्यकीय शिक्षण व संशोधन संस्था येथे पदव्युत्तर संस्था स्थापन करण्यात येणार.
  9. अन्न सुरक्षा कार्यप्रणालीचे बळकटीकरणासाठी 2 वर्षात 100 कोटी उपलब्ध करणार
  10. पुणे शहराजवळ अत्याधुनिक “इंद्रायणी मेडिसीटी” उभारण्यात येणार.
  11. रोजगारक्षम मनुष्यबळ निर्माणासाठी 500 कोटी रुपये खर्चून “ इनोव्हेशन हब ” स्थापन करण्यात येणार.
  12. स्टार्ट अप फंडासाठी 100 कोटी

संबंधित बातम्या

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.