AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ULIP चा कर सवलतीचा टेकू काढला, वार्षिक गुंतवणूक 2.5 लाखांच्यावर असेल तर मिळणार नाही फायदा

ULIP चा कर सवलतीचा टेकू अखेर केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाच्या निर्देशानंतर काढण्यात आला. आता युलिप योजनेत 2.5 लाखांच्यावर वार्षिक गुंतवणूक केल्यास कर सवलतीचा फायदा मिळणार नाही. नवीन नियमांमुळे गुंतवणूक, विमा आणि कर सवलतींचा तिहेरी फायदा घेणा-यांची निराशा होणार आहे.

ULIP चा कर सवलतीचा टेकू काढला, वार्षिक गुंतवणूक 2.5 लाखांच्यावर असेल तर मिळणार नाही फायदा
| Edited By: सिद्धेश सावंत | Updated on: Jan 22, 2022 | 11:40 AM
Share

ULIP चा कर सवलतीचा टेकू अखेर केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाच्या ( CBDT-Central Board of Direct Taxes ) निर्देशानंतर काढण्यात आला. आता युलिप योजनेत ( ULIP) 2.5 लाखांच्यावर वार्षिक गुंतवणूक केल्यास कर सवलतीचा फायदा मिळणार नाही. नवीन नियमांमुळे गुंतवणूक, विमा आणि कर सवलतींचा तिहेरी फायदा घेणाऱ्यांची निराशा होणार आहे. आता युलिपमधील भांडवली नफा मोजण्याचे नियम स्पष्ट करण्यात आले आहेत. त्यामुळे यापुढे युलिप योजनेत करमुक्त उत्पन्नावर पाणी सोडावे लागण्याची शक्यता आहे. अर्थात 2.5 लाखांपेक्षा तुमची कमाई कमी असेल तर याविषयीचा तोटा होणार नाही. मात्र जुन्या आणि नवीन युलिप पॉलिसी मिळून तुमची वार्षिक कमाई 2.5 लाख रुपये असेल तर मात्र गुंतवणुकदाराला कर सवलतीला मुकावे लागेल.

अर्थसंकल्प 2021 मध्ये सरकारने यूलिपवर कराबाबत प्रस्ताव आला. पण प्रस्तावात अनेक गोष्टींमध्ये स्पष्टता नव्हती. आता सीबीडीटीने यूलिपवरील कर नियम स्पष्ट करणारी अधिसुचना जारी केली आहे. त्यात यूलिपवरील कर नियम स्पष्ट केले आहेत. गुंतवणूकदारांना युलिप बद्दल वेगळे आकर्षण आहे. कारण यामुळे गुंतवणूकदाराला विमा आणि गुंतवणूक या दोन्हींचा फायदा होतो. कर वाचवण्यासाठी मोठ्या संख्येने लोक युलिपमध्ये गुंतवणूक ही करतात.जर तुम्ही करमुक्त कमाईसाठी यूलिप खरेदी करण्याचा विचार करत असाल तर नवीन नियमांचा विचार करणे आवश्यक आहे. आयकर विभागाने कर गणनेविषयी नवीन नियम जाहीर केले आहेत.

युलिप म्हणजे काय

युनिट लिंक्ड इन्शुरन्स प्लॅन म्हणजेच यूलिप हे एक आयुर्विमा पॉलिसी आहे . ज्यात ग्राहकांना विमा तसेच गुंतवणूक पर्याय मिळतो. युलिपमध्ये ग्राहकांनी गुंतवलेले पैसे शेअर बाजार, रोखे आणि तत्सम मालमत्तांमध्ये गुंतवले जातात तर यातील एक भाग विमा क्षेत्रात गुंतविला जातो. त्यामुळ व्यक्तीला जीवनसंरक्षण मिळते. यूलिपमध्ये गुंतवणूक करण्याबद्दल लोकांच्या मनात अनेक प्रश्न आहेत. कधी कधी काही लोक विचार न करता गुंतवणूक करतात आणि नंतर परतावा आणि विमा यांचे गणित कळाल्यानंतर अस्वस्थ होतात. अनेक युलिप योजनांमध्ये लोकांना परतावा जास्त मिळाला नाही आणि त्यांनी केवळ विमा संरक्षणावर खर्च केला असा त्यांना अर्थबोध झाला. युलिप योजनांची योग्य माहिती न झाल्याने ही समस्या उद्भवली. तसेच अभ्यास आणि तज्ज्ञांचा सल्ला न ऐकल्याने अनेकांना विमा संरक्षण आणि कर सवलतीवर समाधान मानावे लागले. युलिपमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी प्रत्येकाने त्याचे फायदे-तोटे तसेच त्याच्याशी संबंधित जोखीम काळजी घेतली पाहिजे.

काय आहे नवीन नियम

2021 च्या अर्थसंकल्पात असा प्रस्ताव होता की, युलिपमधील वार्षिक गुंतवणूक 2.5 रुपयांपेक्षा जास्त असेल तर परताव्यावर करात सूट मिळणार नाही. ही गुंतवणूक मर्यादा 1 फेब्रुवारी 2021 रोजी किंवा त्यानंतर खरेदी केलेल्या धोरणांना लागू आहे. आधीच्या यूलिपवरील परतावा करमुक्त आहे. असा त्याचा अर्थ काढण्यात येत होता. त्यानंतर या नियमांत आता स्पष्टता आणण्यात आली आहे

आता नवीन नियमांनुसार करसवलतीसाठी जुन्या आणि नवीन या दोन्हींचा एकत्रित विचार करण्यात येणार आहे. जुन्या आणि नवीन युलिप योजनांची एकत्रित वार्षिक रक्कम 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त असेल तर गुंतवणुकदारांना कर सवलतीवर पाणी सोडावे लागेल. वार्षिक प्रीमियम अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त असेल, तर त्यावरील गुंतवणुकीवर सवलत उपलब्ध होणार नाही.

Follow Us
इंडोनेशियामध्ये भूकंपाचा हाहाकार
इंडोनेशियामध्ये भूकंपाचा हाहाकार: एकाच दिवशी दोन मोठे धक्के
चाकण एमआयडीसीतील उद्योजक आणि वाहतूक समस्या सोडवण्यासाठी समिती
चाकण एमआयडीसीतील उद्योजक आणि वाहतूक समस्या सोडवण्यासाठी समिती: सीएम फडणवीस
गोविंदा आणि पत्नी सुनीता यांच्यातील वाद शिगेला
अभिनेता गोविंदा आणि पत्नी सुनीता यांच्यातील वाद शिगेला; नवोदित अभिनेत्री ठरली निमित्त
अभिजीत दिपके यांचे स्कूल ठीक करो आंदोलन
महाराष्ट्रातील ग्रामीण शाळांच्या अवस्थेवर अभिजीत दिपके यांचे स्कूल ठीक करो आंदोलन
मनोज जरांगे पाटील यांनी बोलावली आरक्षण अभ्यासकांची महत्त्वाची बैठक
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांची उद्या आरक्षण अभ्यासकांसोबत बैठक
पृथ्वीराज चव्हाण यांची अमित शाहांवर बोचरी टीका, निलम गोऱ्हेंचा टोला
पृथ्वीराज चव्हाण यांची अमित शाहांवर बोचरी टीका, निलम गोऱ्हे यांचा मिश्किल टोला, म्हणाल्या तुमचा उजवा हात...
हाहाकार! समुद्रात भीषण तेल गळती, पाण्यावर सगळीकडे....
हाहाकार! समुद्रात भीषण तेल गळती, पाण्यावर सगळीकडे.... मोठ्या पर्यावरण संकटाला निमंत्रण
शिंदे गटातील नेत्याची थेट धमकी, माझ्यावर आधीच अनेक कलमं, तुम्हाला....
माझ्यावर आधीच अनेक कलमं, तुम्हाला थेट... पुन्हा शिंदें गटातील बड्या नेत्याची भर मंचावरून धमकी
याचा अर्थ मीच गुन्हेगार असा होत नाही; गिरीश महाजानांनी 'त्या' फोटो...
Nashik Kumbh | याचा अर्थ मीच गुन्हेगार असा होत नाही; गिरीश महाजानांनी 'त्या' फोटोबाबत अखेर सांगितलंच
आजचा मित्र पक्ष उद्याचा शत्रु होऊ शकतो, शिंदे गटातील नेत्याचं विधान
मोठी बातमी! आजचा मित्र पक्ष उद्याचा शत्रु होऊ शकतो, त्यामुळे... शिंदे गटातील बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ