AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

यंदाच्या बजेटमधून सर्वसामान्यांना महागाईपासून दिलासा मिळेल?

मंगळवारी सादर होणाऱ्या केंद्रीय अर्थसंकल्पाकडे (Union Budget 2022-23) कडे सर्वांच्याच नजरा लागल्या आहेत. कोट्यवधी नागरिकांचे (Citizen) बजेटमधून आशा-आकांशा आणि स्वप्न पूर्ण होतील का ? महागाईचा (Inflation) मार झेलणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना बजेटमधून काही दिलासा मिळेल का असे अनेक प्रश्न सर्वसामान्य नागरिकांप्रमाणेच अर्थतज्ज्ञांनाही पडले आहेत.

यंदाच्या बजेटमधून सर्वसामान्यांना महागाईपासून दिलासा मिळेल?
प्रातिनिधीक फोटो
| Edited By: | Updated on: Jan 31, 2022 | 8:36 PM
Share

मंगळवारी सादर होणाऱ्या केंद्रीय अर्थसंकल्पाकडे (Union Budget 2022-23) कडे सर्वांच्याच नजरा लागल्या आहेत. कोट्यवधी नागरिकांचे (Citizen) बजेटमधून आशा-आकांशा आणि स्वप्न पूर्ण होतील का ? महागाईचा (Inflation) मार झेलणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना बजेटमधून काही दिलासा मिळेल का असे अनेक प्रश्न सर्वसामान्य नागरिकांप्रमाणेच अर्थतज्ज्ञांनाही पडले आहेत. महागाईपासून दिलासा देण्यासाठी सरकारने ठोस उपाययोजना केल्या पाहिजेत हीच प्रत्येक भारतीय नागरिकांची बजेटकडून अपेक्षा आहे. अशीच अपेक्षा जळगाव जिल्ह्यातील शिवराज यांचीही आहे. 20 डिसेंबरचा दिवस, जिवघेणी थंडी पडली होती. खानदेशातील जळगाव जिल्हयातील शिवराज हीटर घेण्यासाठी दुकानावर गेले. हीटरची किंमत ऐकून त्यांना शॉक लागला. गेल्यावर्षीच्या तुलनेत हीटरच्या किंमतीत तब्बल 20 टक्क्यांनी वाढ झालीय. सिलेंडर महाग झाल्यानं गॅसवर चालणारा हीटर परवडत नव्हता. त्यामुळे शिवराज यांनी इलेक्ट्रीक हीटर घेण्याचं ठरवलं. हीटरसह सर्वच वस्तूंच्या किंमती वाढल्यानं जीवन जगणे महाग झालंय.

जगण्याची किंमत वाढली

सरकारी आकडेवारीनुसार(Government Data) जीवन जगण्याची किंमत गेल्यावर्षापेक्षा 6 टक्क्यानं वाढली आहे. तेल,साबण, किराणा माल, औषधी, डॉक्टरांची फीस, वीज, मोबाईल बिल यासारख्या दररोजच्या वापरातील लहान-मोठ्या सर्व वस्तू महाग झाल्या आहेत. वाढत्या महागाईमुळे दर महिन्याला मिळणारा पगार कमी पडू लागला आहे. कंपन्यांनीही कोरोनाचं कारण पुढे करत, पगार वाढसुद्धा दिली नाही. गरजा कमी करणं हाच शेवटचा पर्याय शिल्लक होता. त्यामुळेच शिवराज यांनी लॉकडाऊनकाळात काढलेल्या मोलकरीण विमला यांना परत कामावर घेतलं नाही.

महागाईमुळे मध्यमवर्गीय अडचणीत

शिवराजसारख्या मध्यमवर्गीय लोकांनी गरजा कमी केल्यानंतर त्यांचा फटकाअगदी शेवटच्या स्तरापर्यंत बसतो. शहरात काम करण्यासाठी आलेले कामगार 4 लाख कोटी रुपये पाठवत होते. हा आकडा जीडीपीच्या 2 टक्के एवढा आहे . शहरात काम न मिळाल्यानं अनेकांनी गाव गाठलं. त्यामुळे गावात आता बेरोजगारांची संख्या वाढली आहे.  वाढत्या महागाईमुळे प्रत्येक जण त्रासलेला आहे. महागाईमुळे प्रत्येक जण प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे प्रभावित झाल्याचं मनी 9 च्या बस्स, एवढंच स्वप्न आहेच्या प्रत्येक भागात दिसून आलंय.

संबंधित बातम्या

Budget 2022: स्टॉक मार्केट आणि म्यूचुअल फंड गुंतवणूकदारांनी, अर्थमंत्र्यांकडे केली ही मागणी, गुंतवणूकदार यांनी लक्षात ठेवाव्यात काही गोष्टी!!

BUDGET EXPECTATION FROM SALARIED CLASS : सर्वसामान्य नौकरदार, मध्यमवर्गीयांना यंदाच्या बजेटकडून काय अपेक्षा?

Budget 2022 : यंदाच्या अर्थसंकल्पात स्टार्टअप्संना सरकारकडून विशेष पॅकेजची प्रतीक्षा, काय होणार घोषणा?

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.