Year Ender | कंडोमच नाही तर लायटरची पण मोठी खरेदी, या वर्षात Blinkit वरुन काय काय मागवले ग्राहकांनी

Year Ender Blinkit | वर्षाच्या शेवटचा दिवस संपण्यासाठी अगदी काही तास उरले आहेत. लगेचच नवीन वर्ष सुरु होणार आहे. यावर्षात ऑनलाईन ग्रोसरी डिलिव्हरी एप Blinkit च्या खरेदीच्या आकडेवारीने अनेकांना धक्का दिला. या वर्षी ब्लिंकिटवरुन 9,940 कंडोम, 65,973 लायटर तर इतकी केळी आणि इतर वस्तू मागवल्या आहेत.

Year Ender | कंडोमच नाही तर लायटरची पण मोठी खरेदी, या वर्षात Blinkit वरुन काय काय मागवले ग्राहकांनी
Follow us
| Updated on: Dec 31, 2023 | 2:22 PM

नवी दिल्ली | 31 डिसेंबर 2023 : वर्ष संपायला आता काही तास उरले आहेत. यावर्षी काही वस्तू एकदम चर्चेत आल्या आहेत. ऑनलाईन फूड डिलिव्हरी एपने त्यांच्या प्लॅटफॉर्मवरुन सर्वाधिक बिर्याणीची ऑर्डर दिल्याचे सांगतिले होते. तर काही इतर प्लॅटफॉर्मने पण कोणत्या वस्तूची सर्वाधिक ऑर्डर आली आणि त्यांची विक्री झाली याची माहिती दिली होती. आता ब्लिंकिट या ऑनलाईन वस्तू पोहचत करणाऱ्या एपने आकडेवारी समोर आणली आहे. ही आकडेवारी धक्का दिल्याशिवाय राहणार नाही. या वर्षात ब्लिंकिटवरुन 9,940 कंडोम, 65,973 लायटरची विक्री झाली तर इतरही विश्वास न बसणाऱ्या ऑर्डर आल्या आहेत.

सामाजिक बदलाची झलक

ब्लिंकिटच्या संस्थापकांनी, ही माहिती दिली. त्यानुसार, खरेदीदारांच्या सवयी कशा बदलत गेल्या त्यातून समाजात काय बदल होत आहेत, हे समोर येते. त्यांनी यासंबंधीची आकडेवारी सादर केली आहे. त्यात दक्षिण दिल्लीतील एका ग्राहकाने या वर्षात तर हद्द केली. त्याने वर्षभरात 1 नाही, 2 नाही, 10 नाही तर 9,940 कंडोमची ऑर्डर दिली.

हे सुद्धा वाचा

65 हजार लायटरसह टॉनिक वॉटर

‘ब्लिंकिट ट्रेंड्स 2023’ च्या आकडेवारीने ग्राहकांचा खरेदीचा ट्रेंड समोर आला आहे. गुरुग्राम शहरातून या प्लॅटफॉर्मवर यंदा 65,973 लायटरची खरेदी करण्यात आले आहे. तर याच शहराने या वर्षी थंड शीतपेय टॉनिक वॉटरची (कार्बोनेटेड पेय) पण जास्त ऑर्डर केल्याचे समोर आले आहे. यावर्षी जवळपास 30,02,080 पार्टी स्मार्ट टॅबलेटची ऑर्डर केली आहे. रात्रभर झिंगल्यावर सकाळी हँगओव्हरपासून वाचण्यासाठी या गोळीचा वापर होतो. त्याची सर्वाधिक विक्री झाली आहे. बेंगळूरुमधील एका व्यक्तीने 1,59,900 रुपयांचा iPhone 15 Pro Max, लेजचे एक पॅकेट, सहा केळी ऑर्डर केली आहेत.

मॅगी पॅकेट ऑर्डर

अर्ध्या रात्री अनेकांना भूक सतावते. ती भूक शांत करण्यासाठी जवळपास 3,20,04,725 मॅगी पॅकेट ऑर्डर बूक केली होती. एका ग्राहकाने 101 लिटर मिनरल वॉटर खरेदी केले होते. यावर्षी ब्लिकिंटवरुन 80,267 गंगाजल बॉटल मागविण्यात आल्या.

एका महिन्यात 38 अंडरविअर

यावर्षी सकाळी 8 वाजेपूर्वी जवळपास 351,033 प्रिंटआउट डिलिव्हर झाल्या. 1,22,38,740 आईसक्रीम ग्राहकांनी फस्त केल्या. आईस क्यूब पॅकेट आणि 45,16,490 ईनो पाऊच ऑर्डर झालीत. तर एका महिन्यात एकाच व्यक्तीने ब्लिकिंटवरुन 38 अंडरविअरची ऑर्डर दिली.

Non Stop LIVE Update
देवेंद्र फडणवीसांच्या सुरक्षेत अचानक वाढ, काय कारण?
देवेंद्र फडणवीसांच्या सुरक्षेत अचानक वाढ, काय कारण?.
भाजपमधील बंडखोरी टाळण्यासाठी फडणवीस मैदानात, मॅरेथॉन बैठका अन्....
भाजपमधील बंडखोरी टाळण्यासाठी फडणवीस मैदानात, मॅरेथॉन बैठका अन्.....
शायना यांच्या आरोपानंतर दादा म्हणाले, 'माझ्यासकट सगळ्यांना आवाहन की..'
शायना यांच्या आरोपानंतर दादा म्हणाले, 'माझ्यासकट सगळ्यांना आवाहन की..'.
अरविंद सावंत यांच्या अडचणी वाढणार? शायना एन सी यांची पोलिसात तक्रार
अरविंद सावंत यांच्या अडचणी वाढणार? शायना एन सी यांची पोलिसात तक्रार.
पंचवटी एक्सप्रेसचा 49वा वाढदिवस, भल्या पहाटे केक कापून जंगी सेलिब्रेशन
पंचवटी एक्सप्रेसचा 49वा वाढदिवस, भल्या पहाटे केक कापून जंगी सेलिब्रेशन.
सरवणकरांची माघार नाहीच, 'ठासून सांगतो...विधानसभा लढणार आणि जिंकणार'
सरवणकरांची माघार नाहीच, 'ठासून सांगतो...विधानसभा लढणार आणि जिंकणार'.
शायना एनसींना माल संबोधल आता स्पष्टीकरण दिल, काय म्हणाले अरविंद सावंत?
शायना एनसींना माल संबोधल आता स्पष्टीकरण दिल, काय म्हणाले अरविंद सावंत?.
दादांचं निवडणुकीच्या तोंडावर मोठं वक्तव्य, 'यावेळी उभंच राहत नव्हतो..'
दादांचं निवडणुकीच्या तोंडावर मोठं वक्तव्य, 'यावेळी उभंच राहत नव्हतो..'.
सदा सरवणकर माहिममधून उमेदवारी अर्ज मागे घेणार? शिंदेंकडून अल्टिमेमट
सदा सरवणकर माहिममधून उमेदवारी अर्ज मागे घेणार? शिंदेंकडून अल्टिमेमट.
'ईदचं लायटिंग,हिरवे कंदिल लागले असते, तर...', मनसेचा उबाठाला थेट सवाल
'ईदचं लायटिंग,हिरवे कंदिल लागले असते, तर...', मनसेचा उबाठाला थेट सवाल.