दोन दिवसानंतर तुमच्या आयुष्यालाही या गोष्टींची सवय लावा, आधारकार्डपासून… मोठी अपडेट काय?

1 October Big Updates : 1 ऑक्टोबरपासून अनेक बदलांना तुम्हाला सामोरं जावं लागू शकतं. दोन दिवसानंतर तुमच्या आयुष्यालाही या गोष्टींची सवय लावावी लागेल. तर ऐन सणासुदीत कदाचित तुमचा खिसा पण कापल्या जाऊ शकतो. काही सेवांचे दाम वाढू शकतात. काय आहे अपडेट?

दोन दिवसानंतर तुमच्या आयुष्यालाही या गोष्टींची सवय लावा, आधारकार्डपासून... मोठी अपडेट काय?
कोणत्या बदलाला जावं लागेल समोर?
Follow us
| Updated on: Sep 28, 2024 | 11:26 AM

प्रत्येक महिन्याच्या सुरुवातीला काही ना काही बदल होतात. त्यात नियम आणि सेवांच्या किंमतीत बदलांचा सामना नागरिकांना करावा लागतो. या 1 ऑक्टोबरपासून अनेक बदलांना तुम्हाला सामोरं जावं लागू शकतं. दोन दिवसानंतर तुमच्या आयुष्यालाही या गोष्टींची सवय लावावी लागेल. आयकर, आधार कार्ड ते एलपीजी गॅस किंमतीपर्यंत मोठ्या बदलाला तुम्हाला सामोरं जावं लागू शकतं. तर ऐन सणासुदीत कदाचित तुमचा खिसा पण कापल्या जाऊ शकतो. काही सेवांचे दाम वाढू शकतात. काय आहे अपडेट?

आयकरसंदर्भात मोठी अपडेट काय?

अर्थसंकल्प 2024 मध्ये केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आयकरासंबंधी काही बदलांची घोषणा केली होती. यातील काही बदल अगोदरच लागू झाले आहेत. तर काही बदल या 1 ऑक्टोबरपासून लागू होतील. नवीन महिन्यापासून नागरिकांना आधार कार्ड, एसटीटी, टीडीएस रेट, डायरेक्ट टॅक्स वादातून विश्वास योजना 2024 अशा बदलाला सामोरं जावं लागणार आहे.

हे सुद्धा वाचा

करदात्यांसाठी कोणता तोडगा?

Direct Tax Vivad to Vishwas Scheme 2024 ही योजना 1 ऑक्टोबरपासून लागू होणार आहे. ही योजना करासंबंधीत सर्व प्रलंबित वादावर तोडगा काढण्यासाठी आणण्यात आली आहे. प्रलंबित प्रकरणांचा त्वरीत निपटारा व्हावा यासाठी ही योजना आणण्यात आली आहे. ज्या करदात्यांची, संस्थांचे उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालयात कर, व्याज आणि दंडासंबंधी प्रकरणे प्रलंबित आहेत, त्यांना त्यावर तोडगा काढण्यासाठी ही एक चांगली योजना आहे. येत्या 31 डिसेंबरप्रकरणावर तोडगा काढण्यासाठी त्यांना 25 टक्के रक्कम जमा करण्याचा आणि त्यानंतर 30 टक्के रक्कम जमा करून तोडग्यासाठी चर्चा करण्याची संधी देण्यात आली आहे.

आधार कार्डची अपडेट काय?

केंद्रीय अर्थसंकल्प 2024 मध्ये आधार संख्येऐवजी आधार नामांकन आयडीचा उल्लेख करण्याची परवानगी देण्यासंबंधीची तरतूद बंद करण्यात आली आहे. त्याची अंमलबजावणी या 1 ऑक्टोबरपासून करण्यात येणार आहे. पॅनकार्डचा दुरुपयोग टाळण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. आता पॅन कार्डसाठी कोणालाही अर्जात आयकर रिटर्नमध्ये आधार कार्डचा उल्लेख करण्याची गरज नसेल.

शेअर बायबॅक

1 ऑक्टोबरपासून शेअर बायबॅकवरील व्यवहारांवर नवीन नियम लागू होत आहे. त्यानुसार, शेअरधारक बायबॅक उत्पन्नावर कर देण्यास पात्र असेल. हा कर भरण्याची त्याची जबाबदारी असेल. या नियमामुळे कंपन्यांवरील कराचे ओझे शेअरधारकांवर हस्तांतरीत करण्यात येत आहे.

गॅस दरवाढ होणार का?

प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला घरगुती आणि व्यावसायिक गॅसच्या किंमतीत बदल दिसतो. ऑगस्ट महिन्यात पण 19 किलो व्यावसायिक गॅस महागला होता. सप्टेंबर महिन्यात सुद्धा दरवाढ झाली होती. त्यामुळे हॉटेलिंग महागले होते. आता 1 ऑक्टोबर रोजी त्यात पुन्हा दरवाढ होते का? याकडे सगळ्यांचे लक्ष्य लागले आहे. तर 14 किलो घरगुती गॅस सिलेंडरची किंमत जशीच्या तशी आहे. त्यात बदल झाला नाही.

पेट्रोल-डिझेल होणार का स्वस्त?

देशात कोरोनानंतर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाल्यानंतर एकच असंतोष झाला. त्यामुळे केंद्र सरकारने त्यात हस्तक्षेप करत, इंधनावरील विविध करात कपात केली. भाजप शासित राज्यात सुद्धा हाच पायंडा पडला. तेव्हापासून एका ठराविक दरानेच इंधनाची विक्री होत आहे. गेल्या 6 महिन्यांपासून भावात कोणताच बदल झाला नाही. ब्रेंट क्रूड नोव्हेंबरसाठी 69.58 डॉलर प्रति बॅरल तर WTI क्रूडचा भाव 66.18 डॉलर प्रति बॅरल असा दर आहे. 2021 नंतर पहिल्यांदाच कच्चे तेल 70 डॉलर प्रति बॅरलपेक्षा खाली उतरले होते. आर्थिक वर्ष 2024 पहिल्या तिमाहीत तेल कंपन्यांना मोठा फायदा झाला. काही राज्यात विधानसभा निवडणुकीचे पडघम आहेत. आता सणासुदीत मोदी सरकार आणि तेल कंपन्यात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत मोठी कपात करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

'कारण टायगर अभी जिंदा है...',अमोल कोल्हेंची फटकेबाजी, बघा काय म्हणाले?
'कारण टायगर अभी जिंदा है...',अमोल कोल्हेंची फटकेबाजी, बघा काय म्हणाले?.
उद्धव ठाकरेंवर अ‍ॅन्जिओप्लास्टी शस्त्रक्रिया, डॉक्टरांचा सल्ला काय?
उद्धव ठाकरेंवर अ‍ॅन्जिओप्लास्टी शस्त्रक्रिया, डॉक्टरांचा सल्ला काय?.
भाजप आमदारासमोर महिलांना वाटलेल्या साड्या मराठा आंदोलकांनी पेटवल्या अन
भाजप आमदारासमोर महिलांना वाटलेल्या साड्या मराठा आंदोलकांनी पेटवल्या अन.
UP च्या बहरइचमध्ये देवी विसर्जनावेळी गोळीबार, संतप्त जमावाकडून जाळपोळ
UP च्या बहरइचमध्ये देवी विसर्जनावेळी गोळीबार, संतप्त जमावाकडून जाळपोळ.
सिद्दीकींच्या हत्येचा कट याच घरात शिजला; बघा एक्सक्ल्युझिव्ह व्हिडीओ
सिद्दीकींच्या हत्येचा कट याच घरात शिजला; बघा एक्सक्ल्युझिव्ह व्हिडीओ.
बाबा सिद्दीकींसह झिशान यांच्याही हत्येचा होता कट, आरोपींची मोठी कबुली
बाबा सिद्दीकींसह झिशान यांच्याही हत्येचा होता कट, आरोपींची मोठी कबुली.
राज ठाकरे राजकीय सस्तन प्राणी, जे साडेचार वर्षे..अंधारेंची बोचरी टीका
राज ठाकरे राजकीय सस्तन प्राणी, जे साडेचार वर्षे..अंधारेंची बोचरी टीका.
आचारसंहितेपूर्वी मंत्रिमंडळ बैठकीत निर्णयाचा धडाका, 19 निर्णय जारी
आचारसंहितेपूर्वी मंत्रिमंडळ बैठकीत निर्णयाचा धडाका, 19 निर्णय जारी.
सरकारकडून टोलमाफी अन् राज ठाकरे म्हणाले, 'ही आनंदाची बाब, पण फक्त...'
सरकारकडून टोलमाफी अन् राज ठाकरे म्हणाले, 'ही आनंदाची बाब, पण फक्त...'.
सरकारकडून टोलमाफी अन् मनसेचा एकच जल्लोष; अविनाश जाधव म्हणाले...
सरकारकडून टोलमाफी अन् मनसेचा एकच जल्लोष; अविनाश जाधव म्हणाले....