AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पॅन-आधार लिंक करणे आवश्यक, परंतु ‘या’ लोकांना सूट, पाहा संपूर्ण यादी

सरकारने दिलेल्या माहितीनुसार, लोकांना शेवटच्या तारखेपर्यंत आधार लिंक करणे कठीण होऊ शकते आणि त्यांचे पॅन कार्डदेखील सक्रिय केले जाऊ शकते.

पॅन-आधार लिंक करणे आवश्यक, परंतु 'या' लोकांना सूट, पाहा संपूर्ण यादी
Pan Card Aadhar Card Link
| Edited By: | Updated on: Aug 14, 2021 | 1:11 PM
Share

नवी दिल्लीः पॅन कार्डला आधारशी लिंक करणे सरकारने अनिवार्य केलेय. सरकारने खूप पूर्वी पॅन-आधार लिंक करणे बंधनकारक केले होते आणि त्याची शेवटची तारीख अनेक वेळा वाढवण्यात आली. याआधी आधारला पॅनशी जोडण्याची अंतिम तारीख 30 जून होती, जी आता तीन महिन्यांनी वाढवून 30 सप्टेंबर 2021 करण्यात आली. सरकारने दिलेल्या माहितीनुसार, लोकांना शेवटच्या तारखेपर्यंत आधार लिंक करणे कठीण होऊ शकते आणि त्यांचे पॅन कार्डदेखील सक्रिय केले जाऊ शकते.

काही लोकांना ‘या’ नियमात सूटही

पण आता असे अनेक लोक आहेत, ज्यांनी पॅन कार्डला आधारशी लिंक केलेले नाही. जर तुम्ही देखील हे केले नसेल तर ते शक्य तितक्या लवकर करा. पण तुम्हाला माहीत आहे का? की काही लोकांना या नियमात सूटही देण्यात आलीय. अशा परिस्थितीत जर काही लोकांनी पॅन कार्ड-आधार लिंक केले नाही तर त्यांच्यावर कारवाई केली जाणार नाही. जाणून घ्या ते लोक कोण आहेत, ज्यांना या नियमात सूट देण्यात आली आहे.

कोणाला सवलत मिळाली?

भारतीय स्टेट बँकेने शेअर केलेल्या माहितीनुसार, केंद्रशासित प्रदेश आसाम, मेघालय, जम्मू आणि काश्मीरमध्ये राहणाऱ्या लोकांना यातून सूट देण्यात आलीय. या व्यतिरिक्त आयकर कायदा 1961 नुसार नमूद केलेल्या अनिवासींनाही सूट आहे. तसेच जे लोक गेल्या वर्षी 80 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे झाले आहेत, त्यांना या नियमाच्या बाहेर ठेवले आहे. जे भारताचे नागरिक नाहीत, त्यांनाही आधार आणि पॅन कार्ड लिंक करण्याची गरज नाही.

आधार-पॅन कसे जोडायचे?

आधारला ऑनलाईन पॅनशी जोडण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे नवीन आयकर वेबसाईटला भेट देणे. नवीन https://www.incometax.gov.in/iec/foportal ला भेट द्या. यानंतर तेथे उपलब्ध सुविधांमधून ‘Link Aadhar’ वर क्लिक करा. एक नवीन पेज उघडेल. यामध्ये तुम्हाला पॅन, आधार क्रमांक, तुमचे नाव आणि आधारवर उपस्थित असलेला मोबाईल क्रमांक भरावा लागेल. जर तुमच्या आधारमध्ये फक्त जन्माचे वर्ष लिहिले असेल, तर तुम्हाला हा पर्याय निवडावा लागेल, ‘I have only year of birth in Aadhaar card’’. यानंतर, ‘I agree to validate my Aadhaar details’ समोर बॉक्सवर टिक करून पुष्टी करा. त्यानंतर ‘लिंक आधार’ वर क्लिक करा. यानंतर एक पुष्टीकरण पृष्ठ उघडेल. यामध्ये तुम्हाला दिसेल की, तुमचा आधार क्रमांक पॅनशी यशस्वीरीत्या जोडला गेला आहे.

आधार लिंक नसल्यास काय होते?

या काही लोकांशिवाय सर्व लोकांसाठी पॅन-आधार लिंक करणे अनिवार्य आहे. जर तुम्ही देखील वरीलपैकी कोणत्याही श्रेणीत नसाल तर तुमच्यासाठी आधार-पॅन कार्ड लिंक करणे अनिवार्य आहे. जर तुमचा पॅन आधारशी जोडलेला नसेल, तर तुम्हाला आर्थिक सेवेत अडचणींचा सामना करावा लागू शकतो. यामुळे केवळ तुमच्या आयकर संबंधित समस्या उद्भवणार नाहीत, तर तुम्हाला बँकेच्या सेवेचा लाभ घेणे देखील अवघड वाटेल. यासह पॅन कार्ड पुन्हा सक्रिय करण्यासाठी दंड देखील भरावा लागेल, म्हणून शक्य तितक्या लवकर आधार लिंक करा.

संबंधित बातम्या

SBI कडून 75 व्या स्वातंत्र्यदिनी होम लोनवर विशेष ऑफर, अर्ज कसा करावा ते जाणून घ्या

PNB ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी, पुढील महिन्यापासून मोठा बदल, ग्राहकांवर काय परिणाम?

aadhar pan card link rules and last date these people check here all details

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.