PNB ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी, पुढील महिन्यापासून मोठा बदल, ग्राहकांवर काय परिणाम?

पंजाब नॅशनल बँक पुढील महिन्यापासून बचत खात्यातील ठेवींवरील व्याजदर कमी करणार आहे. पीएनबीच्या अधिकृत संकेतस्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, बँकेचा नवीन व्याजदर 2.90 टक्के वार्षिक असेल, जो सध्या 3 टक्के आहे.

PNB ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी, पुढील महिन्यापासून मोठा बदल, ग्राहकांवर काय परिणाम?
punjab national bank
Follow us
| Updated on: Aug 14, 2021 | 11:06 AM

नवी दिल्ली : जर तुम्ही पंजाब नॅशनल बँकेचे (PNB) ग्राहक असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. देशातील दुसऱ्या क्रमांकाच्या सार्वजनिक क्षेत्रातील पंजाब नॅशनल बँकेच्या ग्राहकांना मोठा धक्का बसणार आहे. पीएनबी 1 सप्टेंबरपासून बचत खात्यांचे व्याजदर बदलणार आहे. पंजाब नॅशनल बँक पुढील महिन्यापासून बचत खात्यातील ठेवींवरील व्याजदर कमी करणार आहे. पीएनबीच्या अधिकृत संकेतस्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, बँकेचा नवीन व्याजदर 2.90 टक्के वार्षिक असेल, जो सध्या 3 टक्के आहे.

नवीन आणि जुन्या दोन्ही ग्राहकांवर काय परिणाम?

पीएनबीच्या मते, नवीन व्याजदर बँकेच्या विद्यमान आणि नवीन खातेधारकांना लागू होतील. पंजाब नॅशनल बँक ही देशातील दुसरी मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक आहे. पहिली स्टेट बँक ऑफ इंडिया आहे. तसेच एसबीआय बचत खात्यावर वार्षिक 2.70 टक्के व्याज देते. त्याच वेळी कोटक महिंद्रा बँक आणि इंडसइंड बँक बचत खात्यावरील व्याजदर 4-6% आहे.

ओरिएंटल बँक आणि युनायटेड बँक PNB मध्ये विलीन

ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स आणि युनायटेड बँक ऑफ इंडिया यांचे पंजाब नॅशनल बँकेत विलीनीकरण झालेय. फक्त गेल्या वर्षी या दोन बँका पंजाब नॅशनल बँकेत विलीन झाल्यात. आता या दोन्ही बँक शाखा पीएनबीच्या शाखा म्हणून कार्यरत आहेत.

मोदी सरकारने बँकांचे विलीनीकरण कधी केले?

केंद्रातील मोदी सरकारने सार्वजनिक क्षेत्रातील बँकांची स्थिती दोन वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये सुधारण्यासाठी बँक एकत्रीकरणाची प्रक्रिया स्वीकारली. 2019 मध्ये सार्वजनिक क्षेत्रातील 10 बँकांचे विलीनीकरण करण्यात आले. याअंतर्गत सहा कमकुवत बँकांचे चार मोठ्या बँकांमध्ये विलीनीकरण करण्यात आले. ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स आणि युनायटेड बँक ऑफ इंडिया पंजाब नॅशनल बँकेत विलीन झाल्यात. अलाहाबाद बँक इंडियन बँकेत विलीन झाली. सिंडिकेट बँक कॅनरा बँकेत विलीन झाली. आंध्र बँक आणि कॉर्पोरेशन बँक यांचे युनियन बँक ऑफ इंडियामध्ये विलीनीकरण झाले.

संबंधित बातम्या

तुम्हीसुद्धा LIC ची पॉलिसी घेतली असल्यास व्हा सावध, अन्यथा पैसे बुडणार, जाणून घ्या का?

EPFO: महत्त्वाची बातमी! पीएफ खातेधारकांनो हे 4 पर्याय फोनमध्ये सेव्ह करा, बरेच फायदे मिळणार

mportant news for PNB customers, big change from next month, what effect on customers?

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.