अहमदाबाद मुंबई तेजस एक्स्प्रेस स्थगित, आयआरसीटीसीनं का घेतला निर्णय?

एक महिन्याच्या कालावधी साठी अहमदाबाद- मुंबई- अहमदाबाद तेजस एक्स्प्रेस रद्द करण्यात आली आहे. Ahmedabad Mumbai Tejas Express

अहमदाबाद मुंबई तेजस एक्स्प्रेस स्थगित, आयआरसीटीसीनं का घेतला निर्णय?
तेजस एक्स्प्रेस
Follow us
| Updated on: Apr 02, 2021 | 4:35 PM

मुंबई: अहमदाबाद-मुंबई-अहमदाबाद तेसज एक्स्प्रेस वाढत्या कोरोना रुग्ण संख्येमुळे रद्द करण्यात आल्याची घोषणा आयआरसीटीसीनं घेतली आहे. कोरोना विषाणू संसर्ग वाढल्यामुळे एक महिन्याच्या कालावधी साठी अहमदाबाद- मुंबई- अहमदाबाद तेजस एक्स्प्रेस रद्द करण्यात आली आहे. (Ahmedabad Mumbai Tejas Express temporarily suspends due to increasing corona cases declared by IRCTC)

कोरोना विषाणूमुळं निर्णय

पश्चिम रेल्वे मार्गावर देशा़तील दुसरी खासगी तत्वावरील तेजस ट्रेन अहमदाबाद-मुंबई-अहमदाबाद या मार्गावर चालवली जाते. मात्र कोरोना विषाणू संसर्गामुळे ही सेवा स्थगित करण्यात आली आहे. मुंबईत गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. तर त्याचसोबत गुजरातमध्येही कोरोना रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे पुढील एक महिन्यासाठी ट्रेन क्रमांक 82902/82901 ही रेल्वे सेवा स्थगित करण्यात आल्याची माहिती आयआरसीटीसीनं दिली आहे.

नोव्हेंबरमध्ये प्रवाशांचा प्रतिसाद नसल्यानं बंद

आयआरसीटीसीकडून 14 फेब्रुवारीला अहमदाबाद-मुंबई-अहमदाबाद तेजस एक्स्प्रेस पुन्हा सुरु करण्यात आली होती. प्रवाशांचा प्रतिसाद कमी असल्यानं त्यापूर्वी 24 नोव्हेंबरला तेजस एक्स्प्रेस स्थगित करण्यात आली होती. पुढील दोन महिन्यांमध्ये कोरोना रुग्णसंख्या कमी झाल्यानंतर तेजस एक्स्प्रेस सुरु करण्यात येईल, असं आयआरसीटीसीनं स्पष्ट केलं आहे.

मुंबईत 8646 कोरोना रुग्ण

मुंबई गेल्या काही दिवसांमध्ये मोठ्या कोरोना रुग्ण वाढत आहेत. मुंबईत गुरुवारी 8 हजार 646 रुग्ण आढळले आहेत. मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या 4 लाख 23 हजार 260 वर पोहोचली. मुंबईत सध्या 55 हजार 5 सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. तर, महाराष्ट्रात गुरुवारी 43 हजार 183 कोरोना रुग्ण वाढले आहेत. मार्च महिन्यात महाराष्ट्रात 6 लाख 51 हजार 513 कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. गुजरातमध्ये 2410 कोरोना रुग्ण वाढले होते.

संबंधित बातम्या:

मुंबईपासून ‘या’ 4 शहरांमध्ये सेवा देणार खासगी Tejas Express, जाणून घ्या वेळापत्रक

आणि अशा पद्धतीने अहमदाबाद निवडणुकीत काँग्रेस न लढताच तीन जागा गमावल्या !

(Ahmedabad Mumbai Tejas Express temporarily suspends due to increasing corona cases declared by IRCTC)

(Ahmedabad Mumbai Tejas Express temporarily suspends due to increasing corona cases declared by IRCTC)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.