AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अमेझॉनमध्ये पुन्हा एकदा नोकर कपात, एकाचवेळी जाणार चक्क इतक्या कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या

Amazon ने 30,000 हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकणार असल्याची घोषणा कंपनीने केली आहे. तर कामावरून काढून टाकण्याची प्रक्रिया मंगळवारपासून सुरू केली आहे.

अमेझॉनमध्ये पुन्हा एकदा नोकर कपात, एकाचवेळी जाणार चक्क इतक्या कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या
Amazon layoffImage Credit source: tv9gujarati
| Edited By: | Updated on: Oct 29, 2025 | 2:27 AM
Share

तीन वर्षांनंतर जगातील सर्वात मोठी ई-कॉमर्स कंपनी Amazon ने पुन्हा एकदा कर्मचारी कपातीची घोषणा केली आहे. तर कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना पत्राद्वारे याबद्दल औपचारिकपणे माहिती दिली आहे. मात्र आता अमेझॉन कंपनीच्या कर्मचाऱ्यांमध्ये नोकरी वरून काढण्याची माहिती मिळताच खळबळ उडाली आहे. अशातच कंपनीने 30,000 हून अधिक कॉर्पोरेट नोकऱ्या कमी करण्याची तयारी करत आहे. मंगळवारपासून ही कपात सुरू केली आहे आणि कोविड-19 च्या माहामारीनंतर कंपनीने पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात कपात लागू केली आहे.

यापूर्वी 2022 मध्ये Amazon ने अंदाजे 27,000 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले होते. ज्यात डिव्हाइस, कम्युनिकेशंस आणि पॉडकास्टिंग या विभागाचा समावेश होता. मात्र यावेळी, एचआर, डिव्हाइसेस आणि सेवा आणि अमेझॉन वेब सेवा यासारख्या विभागांमध्येही ही कपात केली जाणार आहे. या कपातात अनुभवी कर्मचारी देखील कमी करणार आहेत. अशातच कंपनी एचआर विभागातील 15% कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढणार आहे.

तर आता 30,000 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्याची संख्या कंपनीच्या एकूण कर्मचाऱ्यांपेक्षा खूपच कमी आहे, कारण कंपनीच्या कॉर्पोरेट कर्मचाऱ्यांच्या अंदाजे 10% टक्केच कर्मचारी कपात करणार आहे. Amazon मध्ये अंदाजे 350,000 कॉर्पोरेट कर्मचारी आहेत.

मॅनेजर्सच्या जागाही होणार कमी

अ‍ॅमेझॉनचे सीईओ अँडी जॅसी यांच्या मते, कंपनीत ब्युरोक्रोसी लक्षणीयरीत्या वाढली असल्याने मॅनेजर्सची संख्या कमी करण्यावर भर दिला जाणार आहे. या प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी तक्रार लाइन सुरू करण्यात आली होती, ज्याला 1,500 हून अधिक प्रतिसाद मिळाले आहेत. अ‍ॅमेझॉनचे सीईओ यांनी जूनमध्येच म्हटले होते की एआयचा वापर वाढत आहे, ज्यामुळे भविष्यात कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढले जाऊ शकते.

याचा अर्थ असा की अ‍ॅमेझॉन कंपनी आता त्यांच्या कॉर्पोरेट टीममध्ये एआयचा वापर वाढवणार आहे आणि कर्मचाऱ्यांची संख्या कमी करणार आहे.

मिळालेल्या माहितनुसार 2025 मध्ये अंदाजे 216 कंपन्यांनी आतापर्यंत अंदाजे 98,000 लोकांना नोकरी वरून कपात केले आहे, जर आपण 2024 मध्ये झालेल्या कपातीची संख्या विचारात घेतली तर ही संख्या सुमारे 1,53,000 असल्याचे दिसून येते.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.