अमेरिकेचा मोठा झटका, भारताला ‘करन्सी मॅनिप्युलेटर्स’च्या यादीत टाकलं, नेमका काय परिणाम होणार?

अमेरिकेने भारताला करन्सी मॅनिप्युलेटर्सच्या यादीत टाकून मोठा धक्का दिलाय. अमेरिकेने भारतावर चलनासोबत छेडछाड केल्याचा आरोप केलाय.

अमेरिकेचा मोठा झटका, भारताला ‘करन्सी मॅनिप्युलेटर्स’च्या यादीत टाकलं, नेमका काय परिणाम होणार?
नरेंद्र मोदी जो बायडन
प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

|

Apr 21, 2021 | 7:30 PM

US Adds India to Currency Manipulator Monitoring List वॉशिंग्टन : अमेरिकेने भारताला करन्सी मॅनिप्युलेटर्सच्या यादीत टाकून मोठा धक्का दिलाय. अमेरिकेने भारतावर चलनासोबत छेडछाड केल्याचा आरोप केलाय. विशेष म्हणजे या यादीत भारतासह जगभरातील एकूण 10 देशांचा समावेश आहे (Currency Manipulator Watchlist Meaning). भारताला या करन्सी मॅनिप्युलेटर्सच्या यादीत टाकल्यानंतर भारताने मंगळवारी (20 एप्रिल) अमेरिकेच्या या निर्णयावर आश्चर्य व्यक्त केलंय. तसेच यामागील तर्क कळत नसल्याचं मत व्यक्त केलं. भारताचे व्यापार सचिव अनुप वाधवा म्हणाले, “अमेरिकेच्या या निर्णयात मला कोणताही तर्क दिसत नाहीये. भारताची रिझर्व्ह बँक बाजाराच्या स्थितीनुसार चलन साठ्याला परवानगी देण्याच्या धोरणाला परवानगी देते.” (America adds India in list of Currency Manipulator countries for monitoring)

अमेरिकेच्या अर्थ मंत्रालयाने भारतसह एकूण 10 देशांचा या यादीत समावेश केलाय. या यादीत सिंगापूर, चीन, थायलंड, मेक्सिको, जपान, कोरिया, जर्मनी, इटली आणि मलेशिया या देशांचा समावेश आहे (US Treasury Currency Watchlist). अमेरिकेने आपल्या संस्थांना या देशांच्या चलन साठा आणि त्याच्याशी संबंधित इतर गोष्टींवर बारकाईने नजर ठेवण्याबाबत निर्देश दिलेत.

भारताचा अमेरिकेशी असलेल्या व्यापारात सध्या व्यापार अधिशेष म्हणजेच ट्रेड सरप्लस आहे. 2020-21 या आर्थिक वर्षात भारताचा जवळपास 5 अरब डॉलरपर्यंतचा व्यापार वाढलाय. येथे ट्रेड सरप्लसचा अर्थ एखाद्या देशाची निर्यात आयातीपेक्षा वाढणे असा आहे.

अमेरिकेच्या अहवालात भारताला काय सूचना?

अमेरिकेने आपल्या अहवालात भारताला काही सूचना केल्या आहेत. अहवालात म्हटलं आहे, “वस्तूंच्या व्यापाराविषयी 2020 मध्ये भारताचा अमेरिकेशी असलेल्या द्विपक्षीय व्यापारात 24 अरब डॉलरचा अधिशेष झालाय. त्यामुळे भारताने परदेशी चलनातील हस्तक्षेप मर्यादीत करावा. यासाठी भारताने अधिक राखीव साठा तयार करु नये” (US Currency Watchlist Meaning).

“भारताला या यादीत टाकण्याची ही पहिलीच वेळ नाही”

अमेरिकेने भारताला या यादीत टाकण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधी 2018 मध्ये अमेरिकेने भारताला या यादीत टाकलं होतं. मात्र, नंतर 2019 मध्ये त्यातून हटवण्यात आलं. अमेरिकेने वेळोवेळी वेगवेगळ्या देशांना या यादीत टाकलं आहे. भारताशिवाय चीनला देखील अनेकदा या यादीत टाकण्यात आलंय. जे देश डॉलरच्या तुलनेत आपल्या चलनाचं अवमुल्यन करतात त्यांनाच या यादीत टाकण्यात येतं असा दावा अमेरिकेने केलाय.

कोणताही देश आपल्याच देशाचं चलन अवमुल्यन का करेल?

अमेरिकेच्या निर्णयानंतर कोणताही देश स्वतःच्या देशाच्या चलनाचं अवमुल्यन म्हणजेच किंमत का करेल असा प्रश्न उपस्थित होतो. इतर देशांकडून विशिष्ट प्रकारचा लाभ मिळवण्यासाठी काही देश आपल्या चलनाचं अवमुल्यन करतात. असं केल्यानं संबंधित देशातील निर्यातीच्या खर्चात कपात होते आणि त्यामुळे त्या देशाच्या व्यापारातील तोट्यात कृत्रिमरित्या तोटा कमी करता येतो, असा आरोप केला जातोय.

भारतावर काय परिणाम होणार?

‘करन्सी मॅनिप्युलेटर्स’ यादीत समावेश होणं हे भारतासाठी अजिबातच चांगली बाब नाहीये. अर्थशास्त्रज्ञांच्या मते अमेरिकेच्या या निर्णयामुळे भारताला परदेशी चलन बाजारात आक्रमक हस्तक्षेप करण्यात अडचणी येतील (What is Currency Manipulator List). कोणत्याही देशाला या यादीत टाकल्यानंतर आर्थिक दंड होत नाही. मात्र, संबंधित देशाची जागतिक आर्थिक बाजारात पत कमी होते.

हेही वाचा :

George Floyd: अमेरिकन न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय; जॉर्ज फ्लॉईड मृत्यूप्रकरणात पोलीस अधिकारी दोषी

PHOTO | इस्त्राईलमध्ये आता मास्क वापरण्याची सक्ती नाही, ‘मास्क मुक्ती’ देणारा जगातील पहिला देश!

भारतात Corona Vaccine ‘मोफत’ तरीही लोक दुबईला का जातात? प्रवासासाठी चार्टर्ड प्लेनचा खर्च 35 ते 55 लाख रुपये

व्हिडीओ पाहा :

America adds India in list of Currency Manipulator countries for monitoring

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें