Trump Tariff Bomb : 96 वर्षांपूर्वी त्या मंगळवारी काय घडलेलं? अमेरिकेच्या महामंदीची गोष्ट, त्यातून ते कसे बाहेर आले?
Trump Tariff Bomb : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जगासमोर एक नवीन संकट निर्माण केलय. 2 एप्रिल रोजी त्यांनी रेसिप्रोकल टॅरिफची घोषणा केली. म्हणजे अमेरिकेकडून आता जगातील वस्तुंच्या आयातीवर टॅक्स लावला जाणार आहे. या ट्रम्प टॅरिफमुळे जगात खळबळ माजली आहे. आज जगातील अनेक शेअर बाजार आपटले. याने अमेरिकेत आलेल्या महामंदीची आठवण ताजी झाली. अमेरिकेत ही महामंदी कशी आलेली? ते त्यातून कसे बाहेर पडले? जाणून घ्या.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची 2 एप्रिलची घोषणा जगासाठी एक नवीन संकट घेऊन आली आहे. ट्रम्प यांनी 180 पेक्षा अधिक देशांवर रेसिप्रोकल टॅरिफ (Deducted Reciprocal Tariff) लावला आहे. यामुळे फक्त अमेरिकाचा नाही, तर आशियाई बाजारापासून युरोपियन बाजारात मोठी पडझड पहायला मिळत आहे. जगभरातील शेअर बाजारात हाहाकार उडाला आहे. जगातील मजबूत अर्थव्यवस्थेची मंदीच्या दिशेने वाटचाल सुरु आहे, असं बोललं जातय. या स्थितीत लोकांना 1929 साली आलेल्या महामंदीची भिती सतावू लागली आहे. ट्रम्प यांच्या टॅरिफ बॉम्बने ब्लॅक ट्यूज्डे म्हणजे ‘अशुभ मंगळ’ च्या आठवणी ताज्या झाल्या आहेत. या ब्लॅक ट्यूज्डे सगळ्या जगात हाहाकार उडवून दिला होता.
96 वर्षांपूर्वी त्या मंगळवारी काय घडलं होतं? त्या बद्दल आम्ही तुम्हाला आज सांगणार आहोत. त्याच्या आठवणीने सुद्धा मन अस्वस्थ होतं. त्या घटनेवरुन आजही जगभरातील व्यावसायिक आणि आर्थिक विश्लेषक इशारा देत असतात. आपल्यापैकी आनंदी, श्रीमंत आणि समुद्ध आयुष्य जगण्यासाठी कुठे जायचं, असं जर कोणाला विचारलं, तर समोरचा पटकन अमेरिकच नाव घेईल. अमेरिका म्हणजे अंकल सॅमच्या श्रीमंतीची गोष्ट अजिबात नवीन नाही.
बेरोजगारी दर फक्त 4 टक्के होता
आजपासून जवळपास एका शतकापूर्वी म्हणजे 1928 साली अमेरिकेचे भावी राष्ट्राध्यक्ष हर्बर्ट हूवर यांनी घोषणा केली होती की, “आज आपण अमेरिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच गरीबीवर अंतिम विजय मिळवण्याच्या जवळ आहोत” बहुतांश अमेरिकन नागरिक त्यांच्याशी सहमत होते. लोक याआधी इतकं चांगलं आयुष्य कधी जगले नव्हते. बेरोजगारी दर फक्त 4 टक्के होता. म्हणजे दर 100 अमेरिकन नागरिकांमागे 96 जणांकडे उत्पन्नाचा स्त्रोत होता.
जॅज म्युझिकचे ते दिवस, सर्वकाही मस्त चाललेलं
जॅज म्युझिकचे ते दिवस होते. रेडिओची खूप विक्री व्हायची. वीज आणि टेलिफोन लाइन्स टाकण्याच काम वेगात सुरु होतं. लोक आरामात राहत होते. क्रेडिटवर शॉपिंगची सुविधा होती. मध्यम वर्ग आरामात विकत घेऊ शकतो, इतक्या कार स्वस्त झालेल्या. फ्लोरिडा सारख्या शहरात पटापट घर आणि प्लॉट विकले जात होते. लोक मस्त फिरायचे. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूकीसाठी प्रत्येकजण उत्साही होता. ज्यांच्याकडे पैसे नव्हते, ते सुद्धा बँकेकडून लोन घेऊन शेअर बाजारात गुंतवून पैसे दुप्पट-तिप्पट करत होते. सर्वकाही मस्तीत मस्त सुरु होतं.
त्यावेळी अमेरिकेत आली महामंदी
यानंतर बरोबर एक वर्षाने अमेरिकेत आर्थिक संकट आलं. न्यू यॉर्कचा शेअर बाजार कोसळला, व्यवसाय बंद झाले, बँका बुडाल्या, कोट्यधीश दिवाळखोर झाले. सर्वसामान्य नागरिकांना आयुष्यभराची बचत गमावली. लोकांनी आपल्या नोकऱ्या, घर सर्वकाही गमावलं. पुढच्या काही वर्षात चार चार पैकी एक अमेरिकन नागरिक बेरोजगार होता. पुढे जाऊन हे आर्थिक संकट सगळ्या जगात पसरलं. आधुनिक जगातील हे मोठ संकट होतं. याला आपण महामंदी किंवा ग्रेड डिप्रेशनच्या नावाने ओळखतो.
सर्वकाही नॉर्मल चाललेलं
29 ऑक्टोंबर 1929 चा दिवस इतिहासात ‘काळा मंगळवार’ म्हणून ओळखला जातो. हा तो दिवस होता, जेव्हा अमेरिकी शेअर बाजार आपटला. त्यामुळे जगाच्या अर्थव्यवस्थेमध्ये मोठी मंदी आली. तो दिवस कसा आला? अमेरिकेच्या न्यू यॉर्क शहरातील एक प्रसन्न सकाळ होती. लोक ऑफिसात आपल्या कामात व्यस्त होते. सर्वकाही नॉर्मल चाललेलं. शेअर बाजारात गडबड चाललेली. गुंतवणूकदारांना बाजाराकजून उसळीची अपेक्षा होती. ते आपले शेअर्स विकण्याच्या तयारीत होते.
ही वादळाआधीची शांतता होती
खरंतर या वाईट कथेची सुरुवात एक आठवडाआधीच 24 ऑक्टोंबरला गुरुवारी झाली होती. पण त्यावेळी कोणाला हे इतकं मोठं संकट आहे, याची कोणाला जाणीव नव्हती. त्यादिवशी शेअर बाजार पडला होता. पण दुपारपर्यंत शेअर बाजार संभाळण्याची जबाबदारी काही उद्योजकांनी स्वीकारली. त्यांनी शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात खरेदी केली. ओरडून-ओरडून सांगितलं की, बाजारात कुठलं संकट नाहीय. घाबरून जाऊ नका, किंमती पुन्हा वाढू लागल्या. लोकांनी सुटकेचा निश्वास सोडला. पण ही वादळाआधीची शांतता होती. 28 ऑक्टोंबरला ब्लॅक मंडेने पुन्हा धडक दिली. घसरण दिसून आली. पण बाजाराने इग्नोर केलं. पुन्हा 29 ऑक्टोंबरच्या सकाळी मंगळवारी जे घडलं, ते जग कधी विसरणार नाही.
अखेर त्या दिवशी काय झालेलं?
या दिवशी न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंजमध्ये जवळपास 1.6 कोटी शेअर्सची खरेदी-विक्री झाली. पण घसरणीने सगळा खेळ बिघडवला. एकाचवेळी 11.73 टक्क्यांनी घसरण झाली. ही एक अशी स्थिती होती, जिथे गुंतवणूकादरांनी आपला पैसा गमावला. वॉल स्ट्रीटवर विक्री शिवाय काही ऐकू येत नव्हतं. लाखो डॉलर्सच मूल्य शुन्य झालं होतं.
बाजार पूर्णपणे कोसळलेला. मॅनहट्टनच्या एका इमारतीवरील 44 मजल्यावरुन एका महिलेने उडी मारुन जीव दिला. अभिनेता ग्राउसो मार्क्स यांनी आपलं सगळं काही गमावलेलं. पुढच्या दोन वर्षात दोन हजार बँका कंगाल झाल्या. त्या बँकांसोबत लोकांची गुंतवणूक शुन्यावर आली. प्रत्येक ठिकाणी भिती होती. गुंतवणूकदार कंगाल झालेले. अफवांचा बाजार गरम होता. एका उंच बिल्डिंगवर एक व्यक्ती पेंटिंग करण्यासाठी चढलेला. लोकांना वाटलं की, कोणी गुंतवणूकदार आत्महत्या करतोय, म्हणून लोकांनी खालूनच बोंबाबोंब सुरु केली.
घाबरलेले लोक पैसा काढण्यासाठी बँकांमध्ये जायचे. पण बँकांना टाळी असायची. बँका पैसे परत करण्याच्या स्थितीमध्ये नव्हत्या. ज्या लोकांनी शेअर्स खरेदीसाठी लोन काढलेलं, ते परत करण्याच्या स्थितीमध्ये नव्हते. दुसरीकडे बँकांनी लोकांचा पैसा शेअर्समध्ये लावलेला, त्याचं मुल्य शून्य झालेलं.

share market
त्यावेळी नेमकी अमेरिकेत काय स्थिती झालेली?
ज्यांचे बचत केलेले पैसे बुडाले ते संकटात होतेच. पण ज्यांनी लोन घेऊन पैसे शेअर बाजारात लावले, ते जास्त अडचणीत होते. कारण पैसेही बुडाले आणि त्यांना पैसे चुकवावे लागणार होते. या संकटामुळे पुढच्या चार वर्षात अमेरिकेतील 11 हजार बँका म्हणजे जवळपास निम्म्या बँकस बंद झाल्या. ज्या बँका सुरु होत्या, तिथेही पैसे गुंतावायला लोक घाबरायचे. उद्योग-धंदे ठप्प झाले. बँका दिवाळखोरीत गेल्या. बाजार क्रॅश झाल्यानंतर आपण कल्पनाविश्वात वावरत होतो, याची लोकांना जाणीव झाली. कारखान्यांकडे उत्पादन होती, पण बाजारात विकत घेण्याइतपत लोकांकडे पैसा उरला नव्हता. लोकांच्या नोकऱ्या जात होत्या. शेतकऱ्यांकडे पीक तयार होती. पण विकत घेणारं कोणी नव्हतं. प्रत्येक ठिकाणी निराशेच चित्र होतं. लोकांकडे जेवणाचे पैसे नव्हते. मोफत अन्न देणाऱ्या सेंटर्ससमोर मोठ-मोठ्या रांगा लागायच्या. न्यू यॉर्क शहरात एकादिवसात कमीत कमी 82 हजार निशुल्क भोजनाची व्यवस्था करण्यात यायची. लोक बेघर होऊन रस्त्यावर आलेले.
जगावर काय परिणाम झाला?
अमेरिकन कंपन्यांचा जगभरात प्रभाव होता. अमेरिकन बँका कोसळल्यानंतर युरोपमध्ये सुद्धा एक-एक बँक कोसळू लागली. संपूर्ण जगात आर्थिक मंदीचा परिणाम दिसू लागला. युरोप, आशिया आणि अन्य खंडातही उद्योग-धंदे बंद होऊ लागले. लोकांच उत्पन्न कमी झालं. अनेक देशात बेरोजगारीचा दर 33 टक्क्यांपर्यंत पोहोचला. या मंदीमुळे 1929 ते 1932 दरम्यान जागतिक औद्योगिक उत्पादनात 45 टक्के घसरण झाली. पुढचं एक दशक जगातील अनेक देश वस्तू पुरवठ्याच्या संकटाशी सामना करत होते.
दारुबंदी संपवून मंदीतून बाहेर पडण्याची सुरुवात
रूजवेल्ट यांनी राष्ट्राध्यक्ष निवडणूक लढवण्याची घोषणा केली. ते निवडणुकीत उतरले व मंदीचा सामना करणाऱ्या अमेरिकन जनतेने त्यांना आपलं राष्ट्रपती बनवलं. राष्ट्रपती झाल्यानंतर 4 मार्च 1933 रोजी रूजवेल्ट यांनी ‘ब्रेन ट्रस्ट’ नावाचा सल्लागारांचा एक समूह बनवला. यात अमेरिकेला संकटातून बाहेर काढण्याची आणि विकासाची रणनिती आखण्यात आली. त्यांनी आधी दारुबंदी संपवली. त्यामुळे अमेरिकन सरकारकडे टॅक्स वाढेल. TERA कार्यक्रमातंर्गत शेतात सडणाऱ्या पिकांचा वापर लोकांच पोट भरण्यासाठी करण्याचा निर्णय घेतला. मुलं उपाशी राहू नयेत. कुटुंबांचा ताण कमी व्हावा, यासाठी शाळांमध्ये पहिल्यांदा लंचची व्यवस्था करण्यात आली. रूजवेल्ट सरकारने स्टॉक मार्केटवर नियंत्रण आणलं. ट्रेडिंगसाठी कठोर नियम बनवले. जोसेफ केनेडी यांनी शेअर बाजाराच अध्यक्ष बनवलं. ज्यांचं फंडामेंटल मजबूत होतं, अशाच बँकांना काम करण्याची परवानगी दिली. श्रामिक वर्गाला रोजगार देण्यासाठी CWA कार्यक्रमाची सुरुवात केली. त्या अंतर्गत देशभरात रस्ते, पार्क, शाळा, पुल आणि आऊट हाऊस निर्मितीचा कार्यक्रम सुरु झाला.
