AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अनिल अंबानींना मोठा झटका; रिलायन्स कम्युनिकेशन्सच्या परवाना नुतनीकरणाला दूरसंचार विभागाचा नकार

Reliance Communications | रिलायन्स कम्युनिकेशन्सने तब्बल 26 हजार कोटी रुपये थकवले आहेत. आता हे पैसे भरले नाहीत तर रिलायन्स कम्युनिकेशनला त्यांच्याकडील स्पेक्ट्रमवरील (दूरसंचार लहरी) हक्कही सोडून द्यावा लागेल.

अनिल अंबानींना मोठा झटका; रिलायन्स कम्युनिकेशन्सच्या परवाना नुतनीकरणाला दूरसंचार विभागाचा नकार
अनिल अंबानी
| Edited By: | Updated on: Jul 06, 2021 | 1:11 PM
Share

मुंबई: कर्जाच्या विळख्यात सापडलेले उद्योजक अनिल अंबानी यांच्यासमोरील अडचणी काही कमी होताना दिसत नाहीत. कारण, आता दूरसंचार मंत्रालयाने अनिल अंबानी यांच्या रिलायन्स कम्युनिकेशन्सच्या (Reliance Communications) परवाना नुतनीकरणाला नकार दिल्याची माहिती समोर आली आहे. जोपर्यंत कंपनी थकबाकी अदा करत नाही तोपर्यंत Reliance Communications च्या परवान्याचे नुतनीकरण होणार नाही, अशी अटच दूरसंचार मंत्रालयाने घातली आहे. (Anil Ambani Reliance communication may face problem due to DOT denied to renew license)

रिलायन्स कम्युनिकेशन्सने तब्बल 26 हजार कोटी रुपये थकवले आहेत. आता हे पैसे भरले नाहीत तर रिलायन्स कम्युनिकेशनला त्यांच्याकडील स्पेक्ट्रमवरील (दूरसंचार लहरी) हक्कही सोडून द्यावा लागेल. तसे घडल्यास रिलायन्स कम्युनिकेशन्सला आपली मालमत्ताही गमवावी लागेल. त्यामुळे कंपनीच्या दिवाळखोरीची प्रक्रियाही ठप्प होऊन अनिल अंबानी यांना मोठा आर्थिक फटका बसू शकतो. रिलायन्स कम्युनिकेशनकडे सध्या देशातील 22 सर्कल्समधील स्प्रेक्ट्र लहरी आहेत. यापैकी 14 स्पेक्ट्रम 850 मेगाहर्टझचे आहेत.

कर्नाटक बँकेचाही झटका

कर्नाटक बँकेकडून रिलायन्स होम आणि रिलायन्स कमर्शियल फायनान्स या कंपन्यांनी घेतलेले 160 कोटींचे कर्ज फ्रॉड असल्याचे जाहीर केले होते. रिझर्व्ह बँकेला यासंदर्भात सूचित करण्यात आले असून त्यामुळे अनिल अंबानी (Anil Ambani) यांच्यासमोरील अडचणी वाढल्या होत्या.

कर्नाटक बँकेने दिलेल्या माहितीनुसार, आम्ही 2014 पासून रिलायन्स समूहातील या दोन कंपन्यांसोबत काम करत आहोत. रिलायन्स फायनान्सच्या मल्टिपल बँकिग व्यवस्थेत आमचा 0.39 टक्के तर रिलायन्स कमर्शियल फायनान्समध्ये 1.98 टक्के इतका हिस्सा आहे. दोन्ही कर्जांसाठी 100 टक्के तरतूद करण्यात आली आहे. तसेच दोन्ही कर्जाची खाती बुडीत खाती म्हणून नोंदवण्यात आली होती. त्यामुळे बँकेच्या आर्थिक स्थितीवर कोणताही परिणाम होणार नाही, असे कर्नाटक बँकेकडून सांगण्यात आले.

इतर बातम्या:

रिलायन्स इन्फ्रावरील कर्जाचा बोजा कमी होणार, रिलायन्स पॉवर 1325 कोटींचे शेअर्स, वॉरंट जारी करणार

Anil Ambani: अनिल अंबानींना मोठा झटका; ‘या’ बँकेचा मोठा निर्णय

अंबानी VS अदानी : रिलायन्स इंडस्ट्रीजच्या तुलनेत 2 महिन्यांच्या कालावधीत अदानी एंटरप्रायजेसचा शेअर्स 6 पट वाढला, गुंतवणूकदार झाले श्रीमंत

(Anil Ambani Reliance communication may face problem due to DOT denied to renew license)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.