AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जगातील सहाव्या क्रमांकाचा श्रीमंत, नंतर बायकोचे दागिनेही विकावे लागले; अनिल अंबानी कसे बाहेर पडले ?

मुकेश अंबानी यांचा धाकटा भाऊ अनिल अंबानी हे एकेकाळी जगातील सहाव्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती होते. त्यांची एकूण संपत्ती 42 अब्ज डॉलर होती. पण काही वेळातच त्यांचे झपाट्याने पतन झाले, ते प्रचंड कर्जात बुडाले. एक वेळ अशी आली की त्यांना पत्नीचे दागिनेही विकावे लागले.

जगातील सहाव्या क्रमांकाचा श्रीमंत, नंतर बायकोचे दागिनेही विकावे लागले; अनिल अंबानी कसे बाहेर पडले ?
अनिल अंबानी हे एकेकाळी जगातील सहाव्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती होते
| Updated on: Apr 06, 2024 | 2:58 PM
Share

आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती अशी रिलायन्सच्या मुकेश अंबानी यांची ओळख. मुकेश यांच्याप्रमाणेच त्यांचा भाई अनिल अंबानी हेदेखील एकेकाळी रिलायन्सचा चेहरा होते. मोठ्या भावासोबत मतभेद आणि विभाजन झाल्यानंतर अनिल अंबानी हे एकेकाळी जगातील सहाव्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती होते.त्यांची एकूण संपत्ती 42 अब्ज डॉलर होती. विभाजनानंतर मुकेश अंबानी यांनी अथक मेहनतीने त्यांचा उद्योग वाढवला आणि आज ते जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक आहेत. पण दुसरीकडे काही काळातच त्यांचा लहान भाऊ अनिल अंबानी यांनी सर्व काही धुळीला मिळवलं. ते मोठ्या आर्थित संकटात सापडले. एक वेळ अशी आली की अनिल यांच्याकडे त्यांच्या वकिलाची फी देण्यासाठी देखील पैसे नव्हते. तेव्हा त्यांना त्यांच्या पत्नीचे दागिने विकून फी भरावी लागली. चुकीच्या गोष्टींची निवड आणि दूरदृष्टीचा अभाव असल्याने मोठ्यात मोठं साम्राज्य कसं उद्ध्वस्त होऊ शकतं यांच उदाहरण म्हणजे अनिल अंबानीचे हे अपयश.

उंची महालातून जमीनीवर येण्यसाठी अनिल अंबानी हे स्वत:च जबाबादार होते. त्यांच्या निवडी याच त्याच्या पतनासाठी कारणीभूत ठरल्या. योग्य नियोजन न करता किंवा दूरदृष्टी न ठेवता त्यांनी एकाच वेळी अनेक कंपन्या सुरू केल्या. दूरसंचार, ऊर्जा, पायाभूत सुविधा आणि मनोरंजन क्षेत्रात मोठा खेळाडू बनण्याचे स्वप्न अनिलने पाहिले. पण, त्याच्या सर्व योजनांची अंमलबजावणी योग्य पद्धतीने झाली नाही. अपेक्षेपेक्षा जास्त झालेला खर्च, चुकीचे नियोजन आणि कमी परतावा यामुळे अनिल अंबानी हे कर्जात बुडू लागले.

दिवाळखोर झाले अनिल अंबानी

अनिल अंबानी यांच्या कंपनीवरील कर्ज वाढू लागले. त्यामुळे त्यांना त्यांच्या कंपन्या एकामागोमाग एक अशा विकायला लागल्या. चुकीच्या निर्णयांमुळे त्यांची टेलिकॉम कंपनी बुडली. त्या कंपनीचे कर्ज 25 हजार कोटींवर पोहोचले. अनिल अंबानी यांनी वैयक्तिक हमीवर चिनी बँकांकडून कर्ज घेतले. पण, त्यांना त्या कर्जाची परतफेड करता आली नाही. त्यानंतर त्यांना लंडन येथील न्यायालयात हजर राहवे लागले. न्यायलयाने त्यांना तीन बँकांचे सुमारे 5446 कोटी रुपये परत करण्याचे निर्देश दिले. माझ्याकडे काहीच पैसे शिल्लक नाही असे सांगत अनिल अंबानी यांनी न्यायालयात स्वतःला दिवाळखोर घोषित केले. त्यांच्यावर अंदाजे 40,000 कोटी रुपयांचे कर्ज होते.

वकिलांची फी भरण्यासाठीही नव्हते पैसे

अनिल अंबानी यांचे नेटवर्थ शून्य झाले होते. वर नमूद केल्याप्रमाणे त्यांच्याकडे त्यांच्या वकिलांची फी भरण्यासाठीदेखील पैसे नव्हते. अखेर त्यांनी त्यांच्या पत्नीचे दागिने विकून वकिलांना फी दिली. एका कारशिवाय आपल्याकडे काहीच उरले नसल्याचे अनिल यांनी सांगितले. ते साधं जीवन जगत आहेत. फेब्रुवारी 2023 पर्यंत, त्यांची एकूण संपत्ती सुमारे 250 कोटी रुपये इतकी होती. अनिल अंबानी यांचं मुंबईत 17 मजली घर आहे. त्यांच्या रिलायन्सने नुकतेच तीन बँकांचे कर्ज फेडले.

Follow Us
ते सर्व आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
Sanjay Raut At Thane : ते आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा...
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा; कापूरबावडी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडतंय?
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी!CM फडणवीसांच्या बैठकीत..
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी! CM फडणवीसांच्या बैठकीतील ‘हे’ 5 महत्त्वाचे निर्णय
सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
Sachin Waze | सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश...
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश करण्याचा प्रयत्न: पुढे जे घडलं ते...
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे निर्देश काय?
मातोश्री'वर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर...
मातोश्री बंगल्यावर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर राऊत आणि नार्वेकर... नेमकं काय घडतंय?
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा...
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा आता...
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या,
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, जोपर्यंत...