AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ग्राहकांना अजून मोठा झटका… गॅस सिलेंडरचा बदलला हा नियम, जून महिन्यात बंद होणार तुमचे कनेक्शन?

LPG Cylinder Rules: एलपीजी सिलेंडरविषयी मोठी अपडेट समोर आली आहे. सरकार आता पीएनजी गॅससाठी अधिक भर देत आहे. त्यामुळे जूनपासून मोठ्या हालचाली दिसू शकतात. काय असेल नवीन बदल?

ग्राहकांना अजून मोठा झटका... गॅस सिलेंडरचा बदलला हा नियम, जून महिन्यात बंद होणार तुमचे कनेक्शन?
एलपीजी पीएनजी कनेक्शनImage Credit source: एजन्सी
| Updated on: May 16, 2026 | 4:32 PM
Share

LPG Cylinder Rules: एलपीजी ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. इंडेन (Indane), भारत गॅस (Bharat Gas) आणि एचपी गॅस (HP Gas) सारख्या प्रमुख सरकारी तेल कंपन्यांनी एलपीजी (LPG) सिलेंडरच्या नियमांमध्ये मोठा बदल केला आहे. नवीन नियमांनुसार, सरकार आता ‘नो ड्यूएल गॅस कनेक्शन’ (No Dual Gas Connection) धोरणाचा अवलंब करणार आहे. तुमचे एलपीजी कनेक्शन बंद केले जाऊ शकते काय? काय होणार त्याचा फायदा आणि तोटा? जाणून घ्या.

काय आहे नो ड्युएल कनेक्शननियम?

गेल्या काही वर्षांत देशातील अनेक मोठ्या शहरात आणि सोसायट्यांमध्ये पाईपमधून नैसर्गिक गॅसचा (PNG) पुरवठा करण्यात येत आहे. पीएनजी हा एलपीजीपेक्षा अधिक सुरक्षित, स्वस्त आणि सुविधाजनक मानल्या जातो. अनेक घरांमध्ये पीएनजी कनेक्शन पोहचलेले आहे. तरीही जुने एलपीजी सिलेंडर अशा ग्राहकांनी जमा केलेले नाही. सरकारच्या नियमानुसार, एकाच पत्त्यावर दोन वेगवेगळी घरगुती गॅस कनेक्शन असणे बेकायदेशीर आहे. त्यामुळे कंपन्यांनी अशा ग्राहकांची शोध मोहीम सुरू केली आहे. ज्या ग्राहकांना अद्याप त्यांचे एलपीजी सिलेंडर सरेंडर केलेले नाही. एजन्सीकडे जमा केलेले नाही. त्यांचे एलपीजी कनेक्शन येत्या जून महिन्यापासून बंद करण्यात येणार आहे. त्यांना एलपीजी गॅस सेवा मिळणार नाही.

सिलेंडर सरेंडर कसं करणार?

जर तुमच्या घरात पीएनजी आणि एलपीजी हे दोन्ही गॅस असतील तर मोठ्या दंडापासून वाचण्यासाठी अगोदर गॅस एजन्सीकडे धाव घ्या. इंडेन, भारत गॅस अथवा एचपी गॅस एजन्सीकडे जा. तिथे कनेक्शन सरेंडरचा अर्ज मिळेल. तो अर्ज भरून गॅस सिलेंडर कनेक्शन सरेंडर करण्याची विनंती करा. सोबत तुमचे गॅस सिलेंडर आणि रेग्युलेटर जमा करावे लागेल. त्यानंतर कंपनी तुम्हाला सिलेंडर टाकी जमा केल्याचे ना हरकत प्रमाणपत्र देईल. एलपीजी सिलेंडर खरेदी करते वेळी जी सुरक्षा रक्कम जमा केली होती. ती ग्राहकांच्या बँक खात्यात थेट जमा होईल. त्यानंतर ग्राहकांना कोणत्याही अडथळ्या विना पीएनजी सेवेचा वापर करता येईल.

LPG सिलेंडरच्या किंमती पुन्हा भडकणार?

पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढल्यानंतर एलपीजी सिलेंडरचा भाव पुन्हा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पण सरकारकडून अद्याप याविषयीचे कोणतेही संकेत अथवा अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मार्च 2026 मध्ये एलपीजी गॅस सिलेंडरच्या किंमतीत 60 रुपयांची वाढ करण्यात आली. अनेक दिवसानंतर ही दरवाढ करण्यात आली आहे. आता गॅस सिलेंडर एक हजार रुपये किंमतीच्या आता उपलब्ध होत आहे.

Follow Us
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत.
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र...
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र....
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा.
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं...
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं....
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण...
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण....
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर.......
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर........
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?.
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांचा मराठ्यांसाठी एल्गार, सरकार वारंवार...
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांचा मराठ्यांसाठी एल्गार, सरकार वारंवार....
8 महिने गेले, कुणबी प्रमाणपत्र कुठे? जरांगेंचा सरकारला जळजळीत सवाल
8 महिने गेले, कुणबी प्रमाणपत्र कुठे? जरांगेंचा सरकारला जळजळीत सवाल.
मला लाथ मारून हाकलण्याचा...NCPच्या आणखी एका नेत्याने बोलून दाखवली खंत
मला लाथ मारून हाकलण्याचा...NCPच्या आणखी एका नेत्याने बोलून दाखवली खंत.