AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वैश्विक आव्हाने असतानाही भारताचा वस्त्रोद्योग तेजीत; किती झाली उलाढाल?

सीआयटीआयच्या अहवालानुसार, 2024-25 मध्ये भारताच्या वस्त्र आणि परिधान निर्यातीत 6.32% ची वाढ झाली आहे. हे मुख्यतः परिधान निर्यातीतील 10.03% च्या वाढीमुळे शक्य झाले आहे. सीआयटीआयचे अध्यक्ष राकेश मेहरा यांनी या वाढीचे श्रेय नवीन व्यापार धोरणे आणि सरकारच्या मदतीला दिले आहे.

वैश्विक आव्हाने असतानाही भारताचा वस्त्रोद्योग तेजीत; किती झाली उलाढाल?
textile businessImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Apr 18, 2025 | 5:39 PM
Share

भारतीय वस्त्र उद्योग परिसंघ (सीआयटीआय) ने एक मोठी माहिती दिली आहे. सीआयटीआयच्या नुसार, 31 मार्च 2025 संपलेल्या चालू आर्थिक वर्षात भारताच्या वस्त्र आणि परिधान निर्यातीत गेल्यावर्षीच्या तुलनेत 6.32 टक्के वाढ झाली आहे. या वृद्धीसाठी कापड उद्योग अत्यंत महत्त्वाचा राहिला आहे. या विश्लेषणातून हेच समोर येतंय की, वस्त्र आणि परिधान निर्यातीत ही वृद्धी मुख्यत्वे परिधान निर्यातीने झाली आहे. यात चालू आर्थिक वर्षात 10.03 टक्के वाढ नोंदवली गेली आहे.

CITI चे अध्यक्ष काय म्हणाले?

सीआयटीआयचे अध्यक्ष राकेश मेहरा यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. वैश्विक आव्हाने असताना परिधान निर्यातीत मजबूत कामगिरी आणि वस्त्र उद्योगात स्थिर वृद्धी भारतीय कपडा आणि परिधान उद्योगाला मजबुती, अनुकूलशीलता आणि वैश्विक प्रतिस्पर्धात्मकतेला उजागर करत आहे, असं राकेश मेहरा म्हणाले. त्यांनी याचं सर्व श्रेय नव्या व्यापार आघाडी बनवण्याला आणि वाढता वेग आणि सरकारच्या सहाय्यक धोरणांना दिलं आहे. सरकारच्या धोरणांमुळे निर्यातदारांमध्ये विश्वास निर्माण करण्यात मदत झाली आहे.

भारतासाठी संधी

ही वाढ कायम ठेवण्यासाठी उद्योग जगत आशावादी आहे, असं मेहरा यांनी म्हटलंय. खासकरून विकसित होत असलेल्या वैश्विक व्यापार गतिशिलतेला पाहता ही वाढ कायम राहण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मेहरा म्हणाले की, अमेरिका आणि चीन दरम्यान सुरू असलेला व्यापार तणाव भारतासाठी धोरणात्मक दृष्टया संधी निर्माण करणारा आहे. खासकरून कापड आणि परिधान उद्योगात. भारत चीनच्या पुढे जाण्यास आणि अमेरिकेचा एक विश्वासू तसेच आवडता भागीदार बनण्यासाठी चांगली स्थिती आहे. त्यासाठी सक्रिय कूटनिती आणि अधिक अनुकूल तसेच स्थिर टॅरिफ व्यवस्था मिळवण्यासाठी ठोस प्रयत्नांची गरज आहे.

अमेरिका-चीनच्या लढाईत वाढ

यावर्षी मार्चमध्ये भारतीय कपडा निर्यातीत मार्च 2024च्या तुलनेत सुमारे 5.81 टक्क्याने घसरण झाली आहे. तर याच काळात परिधान निर्यातीत 3.97 टक्क्यांची वाढ नोंदवली गेली आहे. मार्च 2025च्या दरम्यान कापड आणि परिधानच्या संचयी निर्यातीत मार्च 2024च्या तुलनेत 1.63 टक्क्यांची घसरण झाली आहे.

3.61 टक्के वाढ

एप्रिल 2024पासून मार्च 2025 च्या दरम्यान भारतीय कापड निर्यातीत गेल्या वर्षीच्या तुलनेत 3.61 टक्के वाढ झाली आहे. तर या काळात परिधान निर्यातीत 10.03 टक्क्याने वाढ झाली आहे. सीआयटीआय विश्लेषणानुसार, ही वाढ समग्र वस्तू निर्यातीच्या कामगिरीच्या पुढे निघून गेली आहे. यापूर्वी ती याच कालावधीत बऱ्यापैकी स्थिर होती.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.