AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ATM Fraud: पैसे काढताना ATM कार्डचे क्लोनिंग करून फसवणूक, जाणून घ्या, ते कसे टाळावे

एटीएम मशीनमध्ये कार्ड क्लोनिंगची प्रकरणे येतच राहतात. अशाच एका प्रकरणात जेव्हा ग्राहक पैसे काढण्यासाठी एटीएम मशीनवर गेला, व्यवहाराची संपूर्ण प्रक्रिया यशस्वी झाल्यानंतरही एटीएम मशीनमधून पैसे बाहेर आले नाहीत.

ATM Fraud: पैसे काढताना ATM कार्डचे क्लोनिंग करून फसवणूक, जाणून घ्या, ते कसे टाळावे
Atm Withdrawl Limit
| Edited By: | Updated on: Aug 16, 2021 | 7:11 AM
Share

नवी दिल्लीः ATM Fraud: जसं जग डिजिटल होत आहे, तशाच फसवणूक आणि ऑनलाईन फसवणुकीच्या घटनाही वाढत आहेत. विशेषत: कोरोना महामारीनंतर फसवणुकीच्या घटनांमध्ये झपाट्याने वाढ झालीय. अशा परिस्थितीत सर्व फसवणुकीपासून सावध राहणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे एटीएम कार्डचे क्लोनिंग करून पैसे चोरूनही फसवणूक केली जातेय.

त्या ठिकाणी टेपसह प्लेट चिकटवल्याचे ग्राहकाला आढळले

एटीएम मशीनमध्ये कार्ड क्लोनिंगची प्रकरणे येतच राहतात. अशाच एका प्रकरणात जेव्हा ग्राहक पैसे काढण्यासाठी एटीएम मशीनवर गेला, व्यवहाराची संपूर्ण प्रक्रिया यशस्वी झाल्यानंतरही एटीएम मशीनमधून पैसे बाहेर आले नाहीत. ग्राहकाला संशय आला आणि एटीएम मशीनकडे काळजीपूर्वक पाहू लागला. ज्या ठिकाणी पिन नंबर टाईप केला होता त्या ठिकाणी टेपसह प्लेट चिकटवल्याचे ग्राहकाला आढळले. या प्लेटमध्ये कॅमेरा, एसडी कार्ड आणि बॅटरी होती. अशा उपकरणातून फसवणूक करणारे एटीएम कार्ड क्लोन करतात आणि नंतर कार्डधारकाच्या खात्यातील सर्व पैसे लुटतात.

फसवणूक टाळण्यासाठी काय करावे?

1. एटीएम मशीनमधून पैसे काढताना कार्डधारकाने मशीनमध्ये कार्ड घालण्याचे स्थान नेहमी तपासावे. ठगांनी त्या ठिकाणी क्लोनिंग यंत्र ठेवले आणि त्या व्यक्तीचे एटीएम कार्ड स्कॅन केले. 2. कार्डधारकाने त्याचा पिन नंबर टाकण्यापूर्वी कीपॅड देखील तपासावा. 3. कार्डधारकाने आपली बोटं कॅमेऱ्याच्या नजरेपासून दूर ठेवावीत किंवा आपला पिन टाकताना कीपॅड दुसऱ्या हाताने झाकून ठेवावा. 4. कार्डधारकाने चुंबकीय कार्डच्या जागी ईएमव्ही चिप आधारित कार्ड वापरावे. यासह जर कार्ड स्कॅन किंवा क्लोन केले असेल, तर फसवणूक करणाऱ्याला एन्क्रिप्टेड माहिती मिळेल, कारण ईएमव्ही कार्डमध्ये मायक्रोचिप असतात. 5. कार्डधारकाने दुकान, हॉटेल किंवा रेस्टॉरंटमध्ये कार्ड स्वाईप करण्यापूर्वी POS मशीन तपासावे. मशीन कोणत्या बँकेची आहे ते तपासा. पीओएस मशीनची कंपनीदेखील मशीनचे बिल पाहून निश्चित करता येते. या व्यतिरिक्त स्वाईप क्षेत्र आणि कीपॅड देखील तपासा. 6. कार्डधारकाने शक्य तितके फक्त सार्वजनिक ठिकाणी किंवा एटीएम जेथे गार्ड आहेत, तेथेच एटीएमचा वापर करावा. 7. खरेदी, रिचार्ज किंवा इतर वॉलेटसाठी तुमचे डेबिट किंवा क्रेडिट कार्ड सेव्ह करू नका. 8. जर पीओसी मशीन शॉपिंग मॉलमध्ये ओटीपीशिवाय व्यवहार करत असेल तर बँकेत जा आणि सुरक्षित कार्ड जारी करा, जे केवळ ओटीपीद्वारे व्यवहार पूर्ण करेल. 9. आपल्या कार्डमध्ये पैसे काढण्याची मर्यादा निश्चित ठेवा, जेणेकरून क्लोनिंग किंवा फसवणूक झाल्यास मर्यादित रक्कमच काढता येईल.

जर तुमची फसवणूक झाली असेल तर हे करा

जर बँक किंवा मशीनच्या बाजूने व्यवहार यशस्वी झाला आणि तुम्हाला पैसे मिळाले नाहीत, तर तुम्ही ताबडतोब बँकेला कॉल करावा. काही तांत्रिक बिघाड झाल्यास बँकेतून 24 ते 48 तासांत पैसे खात्यात परत जमा होतात. त्याच वेळी तांत्रिक दोष नसल्यास बँक कर्मचारी किंवा पोलीस घटनास्थळी पोहोचतात आणि चौकशी करतात. अशा परिस्थितीत वापरकर्त्याने बँक कर्मचारी किंवा पोलीस येईपर्यंत तिथे राहावे. मशीनमधून पैसे का येत नाहीत हे बँकेकडूनही सांगितले जाते.

संबंधित बातम्या

PNB कडून 50 हजार ते 10 लाखांचे कर्ज, जाणून घ्या कसे आणि कोणाला लाभ?

1 लाख रुपयांत सुरू करा हा व्यवसाय, दरमहा 40000 पेक्षा जास्त फायदा, 80% सरकारची मदत

ATM Fraud: Fraud by cloning ATM card while withdrawing money, know how to avoid it

सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.