AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

1 लाख रुपयांत सुरू करा हा व्यवसाय, दरमहा 40000 पेक्षा जास्त फायदा, 80% सरकारची मदत

लॉकडाऊनदरम्यान जेव्हा सर्व उद्योग प्रभावित झाले होते, तेव्हाही पार्ले जी बिस्किटे इतकी विकली गेली आहेत की, गेल्या 82 वर्षांचा रेकॉर्ड मोडला गेला. अशा परिस्थितीत बेकरी उत्पादन बनवण्याचे युनिट उभारणे हा एक चांगला पर्याय असू शकतो.

1 लाख रुपयांत सुरू करा हा व्यवसाय, दरमहा 40000 पेक्षा जास्त फायदा, 80% सरकारची मदत
संग्रहित छायाचित्र.
| Edited By: | Updated on: Aug 15, 2021 | 10:53 AM
Share

नवी दिल्ली : आम्ही तुम्हाला एका खास व्यवसायाबद्दल सांगत आहोत, ज्याची सुरुवात तुम्ही कमी पैशाने करू शकता आणि जास्त नफा कमवू शकता. आम्ही बिस्किटांबद्दल बोलत आहोत, होय बिस्किटे ही एक अशी  गोष्ट आहे, ज्याची नेहमी मागणी असते. बिस्किटांची मागणी कधीही कमी होत नाही. लॉकडाऊनदरम्यान जेव्हा सर्व उद्योग प्रभावित झाले होते, तेव्हाही पार्ले जी बिस्किटे इतकी विकली गेली आहेत की, गेल्या 82 वर्षांचा रेकॉर्ड मोडला गेला. अशा परिस्थितीत बेकरी उत्पादन बनवण्याचे युनिट उभारणे हा एक चांगला पर्याय असू शकतो.

…तर तुम्हाला फक्त 1 लाख रुपये गुंतवावे लागतील

जर तुम्हाला बेकरी उघडायची असेल तर खुद्द मोदी सरकार यासाठी मदत करत आहे. मुद्रा योजनेअंतर्गत व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला फक्त 1 लाख रुपये गुंतवावे लागतील. एकूण खर्चाच्या 80 टक्क्यांपर्यंत सरकारकडून निधीची मदत मिळेल. यासाठी सरकारने स्वतः प्रकल्प अहवाल तयार केलाय. सरकारच्या व्यवसायाच्या संरचनेनुसार, सर्व खर्च वजा केल्यानंतर तुम्हाला दरमहा 40 हजार रुपयांपेक्षा जास्त नफा मिळू शकतो.

किती खर्च येईल?

प्रकल्पाच्या उभारणीसाठी एकूण खर्च: 5.36 लाख रुपये, यामध्ये तुम्हाला तुमच्याकडून फक्त 1 लाख रुपये गुंतवावे लागतील. जर तुम्ही मुद्रा योजनेअंतर्गत निवडले तर तुम्हाला बँकेकडून 2.87 लाख रुपयांचे मुदत कर्ज आणि 1.49 लाख रुपयांचे कार्यशील भांडवल कर्ज मिळेल. प्रकल्पाअंतर्गत आपल्याकडे 500 चौरसपर्यंत आपली स्वतःची जागा असावी. नसल्यास ती भाड्याने घ्यावी लागेल आणि प्रकल्पाच्या फाईलसह दाखवावी लागेल.

नफा किती असेल?

सरकारने तयार केलेल्या प्रकल्प अहवालानुसार, एकूण वार्षिक उत्पादन आणि विक्रीची किंमत 5.36 लाख रुपये अशा प्रकारे अंदाजित करण्यात आलीय.

4.26 लाख रुपये: संपूर्ण वर्षासाठी कास्ट ऑफ कास्ट 20.38 लाख रुपये: संपूर्ण वर्षभरात इतके उत्पादन केले जाईल की, ते विकल्यावर तुम्हाला 20.38 लाख रुपये मिळतील. बेकरी उत्पादनांची विक्री किंमत बाजारात मिळणाऱ्या इतर वस्तूंच्या दराच्या आधारावर काही कमी करून निश्चित करण्यात आलीय. 6.12 लाख रुपये: एकूण परिचालन नफा 70 हजार: प्रशासन आणि विक्रीवर खर्च 60 हजार: बँक कर्जाचे व्याज 60 हजार: इतर खर्च निव्वळ नफा: 4.2 लाख रुपये वार्षिक

मुद्रा योजनेत अर्ज करा

तुम्ही प्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गत कोणत्याही बँकेत अर्ज करू शकता. यासाठी तुम्हाला एक फॉर्म भरावा लागेल, ज्यात हे तपशील द्यावे लागतील. नाव, पत्ता, व्यवसायाचा पत्ता, शिक्षण, चालू उत्पन्न आणि किती कर्ज आवश्यक आहे. यामध्ये कोणतेही प्रोसेसिंग शुल्क किंवा हमी शुल्क भरावे लागणार नाही. कर्जाची रक्कम 5 वर्षांत परत केली जाऊ शकते.

संबंधित बातम्या

Dry ATM म्हणजे काय? तुम्हाला ATM मध्ये असे दिसले तर करा तक्रार, बँकेला दंड होणार

ज्यांनी पहिल्यांदा अवकाश भ्रमंती करत जेफ बेजोसलाही मागे सोडले, कोण आहेत रिचर्ड ब्रॅन्सन?

Start this business at Rs 1 lakh, profit more than Rs 40,000 per month, 80% government assistance

मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप
मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप.
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान.
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?.
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट.
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?.
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?.
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!.
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान.
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्..
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्...
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात.