PNB कडून 50 हजार ते 10 लाखांचे कर्ज, जाणून घ्या कसे आणि कोणाला लाभ?

एखादा छोटा व्यवसाय सुरू करण्यासाठी किंवा त्याचे जुने काम वाढवण्यासाठी सरकारने 10 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जासाठी अनेक योजना सुरू केल्यात. तुम्हाला हे 10 लाख रुपये कर्ज म्हणून मिळतील. सरकारच्या या योजनेचे नाव पीएम मुद्रा कर्ज योजना (PMMY Scheme) आहे.

PNB कडून 50 हजार ते 10 लाखांचे कर्ज, जाणून घ्या कसे आणि कोणाला लाभ?
punjab national bank
Follow us
| Updated on: Aug 15, 2021 | 11:15 AM

नवी दिल्ली: पंजाब नॅशनल बँक (Punjab National Bank) ग्राहकांना अनेक विशेष सुविधा पुरवते. जर तुम्हालाही पैशांची गरज असेल किंवा तुम्ही तुमचा स्वतःचा व्यवसाय सुरू (Business Opportunity) करण्याचा विचार करत असाल तर बँक तुम्हाला 10 लाख रुपयांपर्यंत मदत करेल. पीएनबीने ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे. या योजनेंतर्गत बँक ग्राहकांना 50,000 ते 10 लाखांपर्यंत कर्ज देते. पीएनबीची ही योजना प्रधानमंत्री मुद्रा योजना (‘Pradhan Mantri Mudra Yojana’) आहे. आपण त्याचा फायदा कसा घेऊ शकता हे जाणून घेऊयात. एखादा छोटा व्यवसाय सुरू करण्यासाठी किंवा त्याचे जुने काम वाढवण्यासाठी सरकारने 10 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जासाठी अनेक योजना सुरू केल्यात. तुम्हाला हे 10 लाख रुपये कर्ज म्हणून मिळतील. सरकारच्या या योजनेचे नाव पीएम मुद्रा कर्ज योजना (PMMY Scheme) आहे.

पीएनबीने केले ट्विट

पीएनबीने ट्विटमध्ये लिहिले आहे की, स्वयंरोजगाराला प्रोत्साहन देण्यासाठी मुद्रा कर्ज योजनेची सुविधा पीएनबीद्वारे प्रदान केली जाते. या योजनेसह स्वावलंबनाकडे वाटचाल करा. याशिवाय या योजनेबद्दल अधिक माहितीसाठी तुम्ही tinyurl.com/z3us9s2r या अधिकृत लिंकला भेट देऊ शकता. तुम्हाला पीएम मुद्रा कर्जाचा लाभ 3 टप्प्यांत मिळू शकतो. यातील पहिली पायरी म्हणजे शिशु कर्ज आहे. याशिवाय दुसरा टप्पा किशोर कर्ज आणि तिसरा टप्पा तरुण कर्ज आहे.

1. शिशु कर्ज योजना- या योजनेंतर्गत तुम्हाला 50,000 रुपयांपर्यंत कर्ज मिळेल. 2. किशोर कर्ज योजना- या योजनेतील कर्जाची रक्कम 50,000 ते 5 लाख रुपये निश्चित करण्यात आलीय. 3. तरुण कर्ज योजना- तरुण कर्ज योजनेमध्ये 5 लाख रुपयांपासून 10 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज घेतले जाऊ शकते.

कर्जासाठी कागदपत्रांची यादी

>> ओळखीचा पुरावा – मतदार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड, आधार कार्ड, पासपोर्ट, फोटो आयडी >> रेसिडेन्सीचा पुरावा- टेलिफोन बिल, वीजबिल, मालमत्ता कर पावती, आधार कार्ड, पासपोर्ट >> अर्जदाराचे छायाचित्र (6 महिन्यांपेक्षा जुने नाही) >> SC/ST/OBC चा पुरावा >> ओळख/व्यवसाय उपक्रमांचा पुरावा

प्रधानमंत्री मुद्रा योजनेचे (PMMY Scheme) काय फायदे?

मुद्रा योजनेअंतर्गत हमीशिवाय कर्ज उपलब्ध आहे. याशिवाय कर्जासाठी कोणतेही प्रक्रिया शुल्क आकारले जात नाही. मुद्रा योजनेतील कर्जाची परतफेड कालावधी 5 वर्षांपर्यंत वाढवता येते.

मुद्रा कर्जासाठी अर्ज कसा करावा?

>> तुम्हाला अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल. (http://www.mudra.org.in/) >> येथून तुम्हाला कर्ज अर्ज भरावा लागेल. >> शिशु कर्जासाठी फॉर्म वेगळा आहे. त्याच वेळी किशोर आणि तरुणांसाठी एकच फॉर्म आहे. >> कर्ज अर्जामध्ये मोबाईल नंबर, आधार क्रमांक, नाव, पत्ता इत्यादी तपशील द्या. >> 2 पासपोर्ट फोटो जोडा. >> फॉर्म भरल्यानंतर कोणत्याही सार्वजनिक किंवा खासगी बँकेत जा आणि सर्व प्रक्रिया पूर्ण करा. >> बँकेचे शाखा व्यवस्थापक तुमच्याकडून कामाची माहिती घेतात. त्या आधारावर PMMY तुम्हाला कर्ज मंजूर करते.

संबंधित बातम्या

Dry ATM म्हणजे काय? तुम्हाला ATM मध्ये असे दिसले तर करा तक्रार, बँकेला दंड होणार

ज्यांनी पहिल्यांदा अवकाश भ्रमंती करत जेफ बेजोसलाही मागे सोडले, कोण आहेत रिचर्ड ब्रॅन्सन?

Loans of Rs 50,000 to Rs 10 lakh from PNB, find out how and who benefits?

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.