मुदतीपूर्वी FD मधील पैसे काढायचे आहेत? ‘या’ बँकेचा मोठा निर्णय

अ‌ॅक्सिस बँकेने (Axis Bank) त्यांच्या मुदत ठेव ठेवणाऱ्या ग्राहकांना दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. (Axis Bank Fix Deposit)

मुदतीपूर्वी FD मधील पैसे काढायचे आहेत? 'या' बँकेचा मोठा निर्णय
Follow us
| Updated on: Jan 13, 2021 | 2:00 PM

नवी दिल्ली: बँकांमध्ये मुदत ठेव स्वरुपात केलेली गुंतवणूक सुरक्षित समजली जाते. मात्र, काही वेळा आर्थिक अडचणींमुळे मुदत ठेव कालावधी संपण्यापूर्वी रक्कम काढावी लागते. बँका अशा प्रकरणांमध्ये दंड वसूल करतात. अ‌ॅक्सिस बँकेने (Axis Bank) त्यांच्या ग्राहकांना दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. अ‍ॅक्सिस बँकेच्या नव्या नियमांनुसार 15 डिसेंबर 2020 रोजी आणि त्यानंतर बुक झालेल्या आणि 2 वर्ष मुदतीची मुदत ठेव (Fix Deposit) कालावधी संपण्यापूर्वी बंद करायची असल्यास कोणताही दंड लावण्यात येणार नाही. (Axis Bank cancel penalty on premature withdrawal from Fix Deposit)

अ‌ॅक्सिस बँकेच्या नव्या निर्णयानुसार याचा फायदा Retail Customers ना होणार आहे. अ‌ॅक्सिस बँकेचा नवा नियम मुदत ठेव आणि रिकरिंग ठेव या दोन् योजनांवर लागू होणार आहे. बँकेने दिलेल्या माहितीनुसार एखाद्या ग्राहकानं मुदत ठेव ठेवल्यानंतर 15 महिन्यानंतर रक्कम काढण्याचा निर्णय घेतल्यास कोणताही दंड लावण्यात येणार नाही. मुदत ठेव ठेवलेल्या रकमेच्या 25 टक्के रक्कम काढली गेल्यासही दंड लावला जणार नाही. अ‌ॅक्सिस बँकेचे अधिकारी प्रवीण भट्ट यांनी 15 महिन्यांनंतर मुदत ठेव योजना आणि रिकरिंग खात्यातून रक्कम काढली गेल्यास दंड लावण्याचा निर्णय रद्द केले जाणार आहे, असं सांगितले.

स्टेट बँकेकडून व्याज दरात वाढ

भारतातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडियानं काही दिवसांपूर्वी व्याज दरात बदल केले होते. 1 ते 2 वर्ष कालावधीच्या मुदत ठेव योजनांवरील व्याज दरात वाढ केली होती. 1 ते 2 वर्षांपेक्षा कमी कालावधीसाठी सामान्य नागरिकांना 5.50 टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी 6 टक्के व्याज मिळते. 2 ते 3 वर्षामध्ये सामान्य नागरिकांना 5.50 टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांना 6 टक्के व्याज तर 3 ते 5 वर्षे सामान्य नागरिकाला 5.70 टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांना 6.20 टक्के व्याज मिळेल. 5 वर्ष ते 10 वर्षांपर्यंत सामान्य नागरिकाला 5.70 टक्के आणि ज्येष्ठ नागरिकाला 6.50 टक्के व्याज मिळते. हे व्याज दर दोन कोटींपेक्षा कमी रकमेच्या देशी ठेवींसाठी आहेत.

संबंधित बातम्या:

SBI च्या एफडीवर मिळतोय जास्त फायदा, व्याज दरामध्ये आणखी केली वाढ

‘या’ अ‍ॅपच्या माध्यमातून पोस्ट ऑफिस RD अकाऊंटमध्ये जमा करा ऑनलाईन पैसे; घरबसल्या होणार काम

SBI, PNB आणि AXIS बँकेनं व्याजदर बदलले, जाणून घ्या कुठे मिळतो FD वर जास्त फायदा

(Axis Bank cancel penalty on premature withdrawal from Fix Deposit)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.