भारतीयांपेक्षा बांगलादेशी सर्वात श्रीमंत; वाचा, नवा रिपोर्ट काय सांगतो

संपूर्ण जग गेल्या दीड वर्षांपासून कोरोनाच्या संकटाशी झुंज देत आहे. त्यामुळे बहुतेक देशांची आर्थिक स्थिती खराब झाली आहे. (Bangladesh surpasses India on per capita incom)

भारतीयांपेक्षा बांगलादेशी सर्वात श्रीमंत; वाचा, नवा रिपोर्ट काय सांगतो
people

नवी दिल्ली: संपूर्ण जग गेल्या दीड वर्षांपासून कोरोनाच्या संकटाशी झुंज देत आहे. त्यामुळे बहुतेक देशांची आर्थिक स्थिती खराब झाली आहे. असंघटीत क्षेत्रातील कामगारांची स्थितीही अत्यंत बिकट झाली आहे. अशातच देशाच्या आर्थिक स्थितीची माहिती देणारा एक अहवाल आला आहे. त्यानुसार बांगलादेशी नागरिकांचं उत्पन्न भारतीयांपेक्षा अधिक असल्याचं आढळून आलं आहे. (Bangladesh surpasses India on per capita incom)

2020-21 या आर्थिक वर्षात बांगालदेशींचं प्रती व्यक्ती उत्पन्न 1,62,371.68 रुपये एवढं आहे. तर भारतीयांचं प्रती व्यक्ती उत्पन्न 1,41,956.74 रुपये इतकं आहे. म्हणजे भारतीयाचं उत्पन्न बांगलादेशींच्या तुलनेत 20,414.94 रुपयांनी कमी आहे. बांगलादेशच्या प्लानिंग कमिशनने हा रिपोर्ट जारी केला आहे. 2019-20 या आर्थिक वर्षात बांगलादेशींचं प्रती व्यक्ती उत्पन्न 1,50,487.27 रुपये होतं. आता या उत्पन्नात अवघ्या वर्षभरातच 11,884.41 रुपयाने त्यात वाढ झाली आहे. ही 8 टक्के वाढ असल्याचं सांगितलं जात आहे.

गतवर्षी भारतीयांचं उत्पन्न किती?

2019-20मध्ये भारतीयांचं पर व्यक्तीचं उत्पन्न 1,50,487.27 रुपये होतं. त्यात 9 टक्क्याने वाढ झाली आहे. 2007मध्ये बांगलादेशचं पर व्यक्ती उत्पन्न भारतापेक्षा अर्ध होतं. मात्र, लवकरच पर व्यक्ती उत्पन्नात बांगलादेश भारतीयांना मागे टाकेल, असं जागतिक नाणे निधीने ऑक्टोबर 2020मध्ये स्पष्ट केलं होतं. त्यांचं हे भाकित खरं ठरलं आहे.

जीडीपीतही भारताला मागे टाकणार?

जागतिक नाणे निधीच्या एका अहवालानुसार, बांगलादेशची आर्थिक गती अशीच राहिल्यास 2025 पर्यंत बांगलादेशचा पर कॅपिटा जीडीपी भारतापेक्षा अधिक असेल. 1971मध्ये बांगलादेश स्वतंत्र झाला. तेव्हा त्यांची आर्थिक स्थिती अत्यंत वाईट होती. गरीब देशात बांगलादेशचा समावेश होत होता. मात्र, गेल्या काही दशकांपासून बांगलादेशने चांगली प्रगती केली आहे. (Bangladesh surpasses India on per capita incom)

 

संबंधित बातम्या:

NEFT सेवा उद्या 14 तास बंद राहणार, आर्थिक कामं आजच करुन घ्या, RBI नं दिली माहिती

LIC च्या ‘या प्लॅन’ मधून दरमहा 9250 रुपये पेन्शन मिळवा, मॅच्युरिटीनंतर 15 लाखही मिळणार, वाचा सविस्तर

कॅनरा आणि सिंडिकेट बँकेत अकाऊंट असल्यास लक्ष द्या, अन्यथा होणार मोठं नुकसान

(Bangladesh surpasses India on per capita incom)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI