Bank Holidays 2026 : नव्या वर्षात बँकांना नेमकं कधी सुट्टी असणार, पूर्ण वर्षाची अधिकृत यादी समोर!
नव्या वर्षात म्हणजेच 2026 साली बँका कोणकोणत्या दिवशी बंद असणार याबाबतचे वार्षिक कॅलेंडर समोर आले आहे. आरबीआयने हे कॅलेंडर प्रसिद्ध केले आहे. त्यामुळे या सुट्ट्या पाहूनच बंँकेचे नियोजन करावे.

Bank Holiday in 2026 Year : नव्या वर्षाला सुरुवात झाली आहे. या नव्या वर्षात काय-काय करायचे आहे? याचा अनेकांनी संकल्प केला आहे. सोबतच अनेकांनी नव्या वर्षात कोणकोणती कामे करायची आहेत? याचीही यादी अनेकांनी तयार केली आहे. नव्या वर्षात अनेकांना बँकेशी संबंधित महत्त्वाची कामे करायची असतील. याच कामांचे लोकांनी वर्षभराचे नियोजनही लावले असेल. परंतु 2026 साली बँकेला सुट्ट्या कधी आहेत, हे लक्षात घेऊन आर्थिक व्यवहारचे नियोजन करायला हवे. अन्यथा ऐनवेळी मोठा गोंधळ उडू शकतो. याच कारणामुळे आता 2026 सालात बँक कधी-कधी चालू राहील, ते जाणून घेऊ या..
बँकेच्या सुट्टीचे नेमके गणित काय?
काही सुट्ट्या अशा असतात ज्या दिवशी देशभरात बँका बंद असतात. या दिवशी राष्ट्रीय सुट्टी असते. प्रजासत्ताक दिवस, स्वातंत्र्य दिवस, महात्मा गांधी जयंती यासरख्या राष्ट्रीय सुट्टीच्या दिवशी देशभरातील प्रत्येक बँक बंद असते. तर महाशिवरात्री, होळी, बकरी ईद, जन्माष्टमी, ख्रिसमस दिवाळी, स्थानिक पातळीवरील महापुरुषांची जयंती या दिवशी राज्यपातळीवर वेगवेगळ्या दिवशी सुट्ट्या जाहीर केल्या जातात. त्यामुळे तुम्हाला बँकेचे कोणतेही काम करायचे असेल तर अगोदर या सुट्ट्या कधी असतात ते जाणून घेणे गरजेचे आहे.
डिजिटल आणि नेट बँकिंग सुरूच राहील
साल 2026 मध्ये महिन्याच्या प्रत्येक दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारीब बँक बंद असेल. सोबतच त्यानंतर राष्ट्रीय सुट्टी आणि स्थानिक सुट्ट्यांमुळेही बँकांना सुट्टी असेल. या दिवशी बँकांना सुट्टी असली तरीही डिजिटल आणि नेट बँकिंग सुरूच राहील. या काळात तुम्हाला डिजिटल ट्रान्झेक्शन करता येतील. 2026 साली कोणत्या आणि किती सुट्ट्या असतील याची यादी आरबीआयने जारी केली आहे.
2026 साली कोण-कोणत्या दिवशी सुट्टी असेल?
जानेवारी- 10, 24,26 फ्रेब्रुवारी- 14,15,28 मार्च-3,14, 20, 28 एप्रील- 3, 11, 14, 25 मे- 1, 9, 23, 27 जून- 13, 27 जुलै- 11, 25 ऑगस्ट- 08, 15, 22 सप्टेंबर- 04, 12, 26 ऑक्टोबर- 02, 10, 24 नोव्हेंबर- 08, 14, 28 डिसेंबर- 12, 25, 26
दरम्यान, या सुट्या देशभरातील सर्व बँकांना लागू असतील. म्हणजेच या तारखांना देशातील सर्वच बँका बंद असतील. याशिवायच स्थानिक सण, उत्सव आणि त्या-त्या वेळेला घेतलेल्या निर्णयानुसार बँकांना सुट्टी असेल.
