Bank Holidays in October 2021: उद्या नवरात्रीपासून 17 दिवस बँका बंद, जाणून घ्या सुट्ट्यांची संपूर्ण यादी

या 17 दिवसांच्या सुट्ट्यांपैकी 13 दिवस RBI ने सुट्ट्या दिल्यात. ऑक्टोबर 2021 मध्ये बँकांना उपलब्ध असलेल्या एकूण सुट्ट्यांची यादी येथे आहे, जेणेकरून तुम्ही त्यानुसार तुमचे काम शेड्यूल करू शकाल आणि तुम्हाला कोणत्याही समस्येला सामोरे जावे लागणार नाही. हरियाणातील बँका 7 ऑक्टोबर रोजी महाराजा अग्रसेन जयंतीला बंद राहतील.

Bank Holidays in October 2021: उद्या नवरात्रीपासून 17 दिवस बँका बंद, जाणून घ्या सुट्ट्यांची संपूर्ण यादी
Bank holiday list
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: Vaibhav Desai

Oct 06, 2021 | 8:17 PM

नवी दिल्ली : देशभरात सण हंगाम उद्यापासून म्हणजेच 7 ऑक्टोबर 2021 पासून नवरात्रीपासून सुरू होत आहे. यादरम्यान अनेक दिवस बँकांमध्ये कोणतेही सामान्य काम होणार नाही. भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) च्या वेबसाRटनुसार, उद्यापासून देशभरात एकूण 17 दिवसांच्या बँक सुट्ट्या असतील. मात्र, या 17 सुट्ट्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये दिल्या जातील. जर तुम्हाला तुमच्या बँक शाखेला भेट देऊन कोणतेही काम करायचे असेल तर घर सोडण्यापूर्वी सुट्ट्यांची संपूर्ण यादी पाहा. हे तुम्हाला अनावश्यक त्रासापासून वाचवतील.

🛑दुसरा शनिवार असल्याने 9 ऑक्टोबरला देशभरातील बँका बंद राहतील

या 17 दिवसांच्या सुट्ट्यांपैकी 13 दिवस RBI ने सुट्ट्या दिल्यात. ऑक्टोबर 2021 मध्ये बँकांना उपलब्ध असलेल्या एकूण सुट्ट्यांची यादी येथे आहे, जेणेकरून तुम्ही त्यानुसार तुमचे काम शेड्यूल करू शकाल आणि तुम्हाला कोणत्याही समस्येला सामोरे जावे लागणार नाही. हरियाणातील बँका 7 ऑक्टोबर रोजी महाराजा अग्रसेन जयंतीला बंद राहतील. मणिपूरमध्येही स्थानिक धार्मिक सणांमुळे या दिवशी बँका बंद राहतील. दुसरा शनिवार असल्याने 9 ऑक्टोबर रोजी देशभरातील बँकांमध्ये कोणतेही काम होणार नाही. त्याचबरोबर रविवारच्या सुट्टीमुळे 10 ऑक्टोबर रोजी देशभरातील बँका बंद राहतील. तुमच्या राज्यानुसार, कोणत्या दिवशी बँका बंद राहतील हे जाणून घ्या.

🛑ऑक्टोबर 2021 मध्ये ‘या’ दिवशी बँकांना सुट्टी असेल

💠 दुर्गापूजा महासप्तमीमुळे 12 ऑक्टोबरला आगरतळा आणि कोलकातामध्ये बँका बंद राहतील. 💠 13 ऑक्टोबर रोजी दुर्गापूजा महाअष्टमीमुळे आगरतळा, कोलकाता तसेच भुवनेश्वर, गंगटोक, गुवाहाटी, पाटणा आणि रांची येथे बँका बंद राहतील. 💠 14 ऑक्टोबर रोजी दुर्गापूजा महानवमीच्या निमित्ताने आगरतळा, भुवनेश्वर, कोलकाता, गंगटोक, गुवाहाटी, कानपूर, लखनऊ, शिलाँग, श्रीनगर, तिरुअनंतपुरम, पाटणा आणि रांची येथे बँक सुट्टी असेल. 💠 15 ऑक्टोबर रोजी दसऱ्याला देशभरातील बँका बंद राहतील. मात्र, या दिवशी इम्फाळ आणि सिमल्यात बँकांमध्ये काम होईल. 💠 दुर्गापूजेमुळे 16 ऑक्टोबर रोजी गंगटोकमध्ये बँका बंद राहतील. 💠 यानंतर 17 ऑक्टोबर रोजी रविवारच्या सुट्टीमुळे देशभरातील बँकांना सुट्टी असेल. 💠 तसेच 18 ऑक्टोबर रोजी गुवाहाटीच्या बँका बंद राहतील. 💠 ईद-ए-मिलादच्या दिवशी 19 ऑक्टोबर रोजी बँका बंद राहतील 💠 ईद-ए-मिलादमुळे 19 ऑक्टोबर रोजी बँका बंद राहतील. अहमदाबाद, बेलापूर, भोपाळ, चेन्नई, देहरादून, हैदराबाद, इंफाल, जम्मू, कानपूर, कोची, लखनऊ, मुंबई, नागपूर, दिल्ली, रायपूर, रांची, श्रीनगर आणि तिरुअनंतपुरम येथील बँका या दिवशी बंद राहतील. 💠महर्षी वाल्मिकी जयंतीला आगरतळा, बेंगळुरू, चंदीगड, कोलकाता आणि शिमला येथील बँका 20 ऑक्टोबर रोजी बंद राहतील. 💠 ईद-ए-मिलाद नंतर पहिला जुम्मा असल्याने, 22 ऑक्टोबर रोजी जम्मू आणि श्रीनगरमध्ये बँकेला सुट्टी असेल. 💠 त्यानंतर 23 ऑक्टोबर, चौथा शनिवार आणि 24 ऑक्टोबर रविवार असल्याने देशभरातील बँका बंद राहतील. 💠 जम्मू-श्रीनगरमध्येही 26 ऑक्टोबर रोजी बँका बंद राहतील. 💠 रविवारच्या सुट्टीमुळे देशभरातील बँका 31 ऑक्टोबर रोजी बंद राहतील.

संबंधित बातम्या

दोन दिवसांच्या वाढीला ब्रेक, सेन्सेक्समध्ये 555 अंकांची मोठी घसरण

7000mAh बॅटरीवाल्या Samsung च्या स्मार्टफोनवर बम्पर डिस्काउंट, जाणून घ्या स्पेसिफिकेशन्स आणि ऑफर

Bank Holidays in October 2021: Banks closed for 17 days from Navratri tomorrow, find out the complete list of holidays

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें