AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वाईट दिवस आले, दारू तुफान महागणार, या एका गोष्टीच्या कमतरतेमुळे खिसा थेट खाली होणार!

Beer Price : भारतातील मद्यप्रेमींची आणि कोल्ड्रिंक्स प्रेमींची चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. कारण आगामी काळात या ड्रिंक्सची कमतरता जाणवू शकते, तसेच बीअरच्या किमतीतही वाढ होण्याची शक्यता आहे.

वाईट दिवस आले, दारू तुफान महागणार, या एका गोष्टीच्या कमतरतेमुळे खिसा थेट खाली होणार!
Beer PriceImage Credit source: Google
| Updated on: Apr 23, 2026 | 6:06 PM
Share

गेल्या काही काळापासून जागतिक पातळीवर तणावाचे वातावरण आहे, अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्धामुळे व्यापारावर मोठा परिणाम झाला आहे. अशातच आता भारतातील मद्यप्रेमींची आणि कोल्ड्रिंक्स प्रेमींची चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. कारण आगामी काळात या ड्रिंक्सची कमतरता जाणवू शकते, तसेच बीअरच्या किमतीतही वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मद्यप्रेमींना आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे. ड्रिंक्सच्या किमती का वाढू शकतात याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

नेमकं कारण काय?

अमेरिका-इराण संघर्षामुळे भारतातील ॲल्युमिनियम सप्लाय चेन प्रभावित झाल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे भारतात कॅनमधील बीअर आणि डायट कोकच्या तुटवड्याची शक्यता निर्माण झाली आहे. सध्या उन्हाळ्यात कोल्ड ड्रिंक्सची मागणी वाढलेली आहे, त्यातच कॅनमधील ड्रिंक्सची कमतरता निर्माण होत असल्याने अनेकांची चिंता वाढली आहे. मुंबईसह दिल्ली, बेंगळुरू आणि पुणे या शहरांमध्ये कॅनमधील ड्रिंक्सची कमतरता जाणवू लागली आहे.

ॲल्युमिनियम कॅनची टंचाई

युद्धामुळे जागतिक स्तरावर ॲल्युमिनियम कॅनच्या उत्पादनावर आणि पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. कारण कॅन तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल वेळेवर उपलब्ध होत नाही. तसेच काही ठिकाणी कॅनच्या किमतीही वाढल्या आहेत, त्यामुळे उत्पादकांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. याशिवाय, काचेच्या बाटल्या तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या LPG च्या कमतरतेमुळे बाटल्यांच्या उत्पादनावरही परिणाम होत आहे. त्यामुळे उत्पादन घटले आहे.

बीअरसह ड्रिंक्सच्या किंमती वाढणार

ॲल्युमिनियम कॅनची कमतरता भरून काढण्यासाठी अनेक कंपन्या आता UAE, श्रीलंका आणि दक्षिण-पूर्व आशियाई देशांमधून ॲल्युमिनियम कॅन आयात करत आहेत. मात्र, हे कॅन आधीच्या तुलनेत 25 ते 30 टक्क्यांनी महाग आहेत. तसेच काचेच्या बाटल्यांच्या किंमतीत सुमारे 20 टक्के वाढ झाली आहे. इतर पॅकेजिंग मटेरियलही 20 ते 25 टक्क्यांनी महागले आहे. त्यामुळे आगामी काळात कॅनमधील बीअर आणि ड्रिंक्ससोबतच बाटलीबंद दारू आणि इतर पेयांच्या किंमतीतही वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशावरील ताण वाढण्याची शक्यता  आहे.

Follow Us
रेश्मा काळे नॉट रिचेबल नाहीत; उद्याच माघार घेणार? महाजनांचा मोठा काय?
Girish Mahajan | रेश्मा काळे नॉट रिचेबल नाहीत; उद्याच माघार घेणार? गिरीश महाजनांचा मोठा दावा काय?
गोंदियाला वादळी पावसाचा दणका! उकाड्यापासून दिलासा, पण धान उत्पादक.....
Gondia Rain | गोंदियाला वादळी पावसाचा दणका! उकाड्यापासून दिलासा, पण धान उत्पादक शेतकरी चिंतेत
नेस्को ड्रग्ज प्रकरणात मोठा ट्विस्ट! आता आरोपींना हायकोर्टाकडून जामीन
Mumbai | नेस्को ड्रग्ज प्रकरणात मोठा ट्विस्ट! 13 एप्रिलला अटक, आता आरोपींना हायकोर्टाकडून जामीन
वृद्धाला मारहाण करणाऱ्या कॅब चालकाच्या अडचणीत वाढ, परवाना होणार रद्द
Thane Assault Case | ठाण्यातील वृद्धाला मारहाण करणाऱ्या कॅब चालकाच्या अडचणीत वाढ, परवाना होणार रद्द
लाखो भाविकांची आवडती शेगाव कचोरी FDAच्या रडारवर
Buldhana | लाखो भाविकांची आवडती शेगाव कचोरी FDAच्या रडारवर; कच्च्या मालाचे नमुने तपासणीसाठी जप्त
NEET विद्यार्थ्यांना NTA कडून भेट! परीक्षेत 15 मिनिटे जास्त मिळणार
NEET विद्यार्थ्यांना NTA कडून मोठी भेट! परीक्षेत 15 मिनिटे जास्त मिळणार, नवे नियम लागू
कर्जमाफीवर फडणवीसांचा मोठा खुलासा; ती अट का ठेवली? अखेर सांगितलं कारण!
Devendra Fadnavis On Shetkari Karjmafi | कर्जमाफीवर फडणवीसांचा मोठा खुलासा; ती अट का ठेवली? अखेर सांगितलं कारण!
काँग्रेस म्हणजे बुडतं जहाज ! फडणवीसांचा घणाघात; बेगानी शादी में.....
काँग्रेस म्हणजे बुडतं जहाज ! फडणवीसांचा घणाघात; बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना म्हणत संजय राऊतांनाही खोचक टोला
भारत चौथ्या क्रमांकावर; फडणवीसांनी उघड केली विकासाची आकडेवारी
Devendra Fadnavis UNCUT | मोदींच्या 12 वर्षांचा महाअहवाल! भारत चौथ्या क्रमांकावर; फडणवीसांनी उघड केली विकासाची आकडेवारी
भारताची आर्थिक महासत्ता बनण्याकडे झेप! फडणवीसांनी मांडले....
Devendra Fadnavis | भारताची आर्थिक महासत्ता बनण्याकडे झेप! फडणवीसांनी मांडले मोदी सरकारच्या 12 वर्षांचे रिपोर्ट कार्ड