ITR : आयकर रिटर्न दाखल करणं हुकलं? अजून वेळ गेली नाही; लगेच करा हे काम लवकर
Belated ITR : एक दिवस कालावधी देऊनही आयकर रिटर्न दाखल करणे जमले नाही का? मग आता तुम्हाला Belated ITR फाईल करता येईल. पण असा आयटीआर भरण्यासाठी काही अटी आणि शर्ती आहेत. त्या जाणून घेणे आवश्यक आहे.

जर यावेळी 16 सप्टेंबर 2025 पर्यंत तुम्हाला आयकर रिटर्न (ITR) दाखल करता आला नाही तर चिंता करण्याची गरज नाही. अजूनही तुमच्याकडे एक संधी आहे. Belated ITR च्या मदतीने तुम्ही आयकर भरू शकता. आयकर विभागाने ज्यांना काही कारणांमुळे रिटर्न फाईल करणे जमले नाही अशा करदात्यांसाठी हा पर्याय ठेवला आहे.
बिलेटेड ITR काय आहे?
जेव्हा एखादा करदाता वेळेत म्हणजे अंतिम मुदतीनंतर आयकर रिटर्न फाईल करतो, त्याला बिलेटेड रिटर्न दाखल करणे असे म्हणतात. आयकर अधिनियमाचे कलम 139(4) अंतर्गत हे रिटर्न दाखल करता येते. मूल्यांकन वर्ष 2025-26 साठी तुम्ही आता 31 डिसेंबर 2025 पर्यंत Belated ITR फाईल करू शकता.
किती लागते विलंब शुल्क?
Belated ITR फाईल केल्यावर कलम 234F अंतर्गत विलंब शुल्क आकारण्यात येते. जर तुमचे वार्षिक उत्पन्न 5 लाखांपेक्षा अधिक असेल तर 5000 रुपयांचा दंड भरावा लागेल. जर तुमचे वार्षिक उत्पन्न 5 लाखांपेक्षा कमी आहे तर केवळ 1,000 रुपये विलंब शुल्क लागेल.
Belated ITR कसे करणार दाखल?
- Belated ITR फाईल करण्यासाठी अगोदर आयकर विभागाच्या अधिकृत साईटवर जाऊन लॉगिन करा.
- e-File विभागात जाऊन Income Tax Return हा पर्याय निवडा
- संबंधित Assessment Year 2025-26 निवडा आणि Online फायलिंगचा पर्याय निवडा
- नवीन फायलिंग सुरू करा आणि तुमची कॅटेगिरी (Individual, HUF) निवडा
- आता योग्य ITR फॉर्म निवडा ( ITR-1, ITR-2 )
- फायलिंग सेक्शनमधये जाऊन कलम 139(4) म्हणजे Belated Return निवडा
- तुमचे उत्पन्न, कपात आणि कर भरणाविषयीची सविस्तर माहिती जमा करा. फायलिंग पूर्ण करा
Belated ITR चे नुकसान?
Belated ITR फाईल करणे हा एक विकल्प आहे. त्याचे फायदे तोटे पण आहेत. यामध्ये तुमचे जर काही नुकसान (Losses) पुढील वर्षासाठी Carry Forward करता येणार नाही. यासोबत तुम्हाला विलंब शुल्क पण अदा करावे लागू शकते. बिलेटेड आयटीआर भरण्यापूर्वी तुमच्या कर सल्लागाराचा सल्ला जरूर घ्या. अथवा याविषयीची माहिती तज्ज्ञाकडून घ्या. नंतर पुढील निर्णय घ्या.
