पावसाळा असो की उन्हाळा..डिलिव्हरी एजंटची छप्परफाड कमाई,रक्कम पाहून पांढरपेशींना सुटला घाम
ऑनलाईन फूड डिलीव्हरी करणारे अनेक तरुण तुम्ही रोज पाहात असाल, पाऊस असो वा कडक ऊन नेहमी बाईकवरुन डिलीव्हरी करणारे हे तरुण तुम्हाला माहिती असतीलच.. अशाच एका तरुणाने आठवड्यात केलेल्या कमाईचा सोशल मीडियावर उल्लेख केला आहे.

Bengaluru News: दिवाळीचा सण संपूर्ण देशात मोठ्या उत्साहाने साजरा होत आहे. येत्या आठवड्यात दिवाळी आणि नाताळ तसेच नवीन वर्षांमुळे सर्वत्र आनंदी आणि उत्साह असणार आहे. याच काळात बंगळूरु येथील एका झेप्टो डिलिव्हरी एजंटने त्यांची कमाई सोशल मीडियावर शेअर केली आहे. त्याच्या कमाईची पोस्ट सोशल मीडियावर खूपच व्हायरल होत आहे. ही व्हायरल पोस्ट पाहून कार्यालयात एसीत बसून काम करणाऱ्यांना घाम सुटला आहे. लोक या झेप्टो डिलीव्हरी एजंटच्या पोस्टवर निरनिराळ्या कमेंट्स करत आहेत.
शेअर केला स्क्रीनशॉट
दिवाळीचा सणात तसेच ऑनलाईन पदार्थ आणि वस्तू मागवण्यास भरते आलेले असते. त्यात एका झेप्टो डिलीव्हरी एजंटने सोशल मीडियावर एक स्क्रीनशॉट पोस्ट केला आहे. त्याने आपण सकाळी १० वा. ते रात्री १० वा.पर्यंत १२ तासांची शिफ्ट करत असून १२ तासांची शिफ्ट करुन आपण आठवड्याच २१,००० रुपयांची कमाई केली आहे. या दरम्यान त्याने एकूण ३८७ ऑर्डर डिलीव्हरी केल्या आहेत. आणि त्यातून पेट्रोलचा खर्च बाजूला काढला तर त्याने १८,९०६ रुपये आठवड्यात कमावले आहेत.
युजर्सच्या प्रतिक्रीया काय ?
डिलिव्हरी एजंटने आपल्या ४० व्या आठवड्याचे विवरण देखील शेअर केले आहे. हा आठवडा २९ सप्टेंबर ते ५ ऑक्टोबर पर्यंतचा होता. स्क्रीनशॉटमध्ये २ ऑक्टोबर, ३ ऑक्टोबर, ४ ऑक्टोबर, आणि ५ ऑक्टोबरला अनुक्रमे ३,७४९.४ रुपये, ३,३७९.९ रुपये, २,४६०.३ रुपये आणि ४,०२०.३ रुपयांची एकूण कमाई दिसत आहे.या पोस्टवर निरनिराळ्या प्रतिक्रीया लोक देत आहेत. एका युजरने या झेप्टो डिलीव्हरी एजंटच्या मेहनतीचे कौतूक केले आहे.
येथे पाहा पोस्ट –
What I earned in a week (working morning 10am to night 10pm) as zepto delivery byu/samfucku inSideHustlePaglu
एजंट म्हणाला की…
झेप्टो डिलीव्हरी एजंटने हे कबूल केले की मागणी आणि हवामानामुळे कमाई बदलत असते. डिलीव्हरी एजंटने सांगितले की कधी-कधी बिझी वेळेत पावसामुळे सर्ज बोनसचा देखील लाभ मिळतो. त्यामुळे त्या दिवसाची कमाई थोडी जास्त असते. एजंट लिहीतो की जे चांगले आहे ते म्हणजे पाऊस आहे.काही तासांपुरता कोसळणारा मोठा पाऊस नव्हे तर संततधार बराच काळ पडणारा पाऊस फायद्याचा असतो. पावसाचा उल्लेख करत एजंट लिहिले की एका आठवड्यात केवळ तीन दिवस मी काम केले आणि केवळ ६०० ते ७०० रुपयांच्या पेट्रोल खर्चात १२ हजार कमावले. कारण त्या तीन दिवसांपैकी दोन दिवस सायंकाळी ६ वाजल्या पासून रात्री ११ – १२ वाजेपर्यंत सातत्याने पाऊस होत होता. त्याची ही कमाई पाहून लोकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.
