SBI, HDFC सह ‘या’ बँकांची स्पेशल FD स्‍कीम, 31 मार्चपर्यंत गुंतवणुकीची सुवर्णसंधी

सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्येष्ठ नागरिकांसाठी बँकांमध्ये खास योजना राबवल्या जात आहेत. ज्यामध्ये ज्येष्ठ नागरिक वयाच्या शेवटच्या टप्प्यात असताना त्यांना कोणताही त्रास न घेता त्यांच्या आर्थिक गरजा भागवता येतील.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 9:47 AM, 9 Mar 2021
SBI, HDFC सह 'या' बँकांची स्पेशल FD स्‍कीम, 31 मार्चपर्यंत गुंतवणुकीची सुवर्णसंधी

मुंबई : कोरोनाचा जीवघेणा काळ पाहिल्यानंतर आता गुंतवणुकीसाठी बँकेत मुदत ठेव हा सगळ्यात सोपा आणि सुरक्षित पर्याय दिसतो. यामध्ये गुंतवणूकदारास ठराविक कालावधीत निश्चित उत्पन्न मिळतं तसेच बाजारातील चढ-उतारांचा त्याच्यावर काही परिणाम होत नाही. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्येष्ठ नागरिकांसाठी बँकांमध्ये खास योजना राबवल्या जात आहेत. ज्यामध्ये ज्येष्ठ नागरिक वयाच्या शेवटच्या टप्प्यात असताना त्यांना कोणताही त्रास न घेता त्यांच्या आर्थिक गरजा भागवता येतील. (best fixed deposit scheme fd invest in sbi hdfc icici banks special fd by 31 march to get more interest)

ही खास ऑफिर 31 मार्च 2021 पर्यंतच आहे

तुम्हाला तुम्ही केलेल्या बचतीवर अधिक व्याज मिळवायचं असेल तर फिक्स्ड डिपॉझिट (€ एफडी) योजनांमध्ये गुंतवणूक म्हणजे उत्तम पर्याय आहे. यासाठी भारतीय स्टेट बँक (SBI), एचडीएफसी बँक (HDFC BANK), आयसीआयसीआय बँक (ICICI BANK) आणि बँक ऑफ बडोदा (BOB) यासारख्या प्रमुख बँकांनी या गुंतवणुकीच्या योजना सुरू केल्या आहेता. ही विशेष एफडी योजना ज्येष्ठ नागरिकांना 31 मार्च 2021 पर्यंत उपलब्ध आहे.

ICICI बँक विशेष एफडी योजना –

ICICI बँक ज्येष्ठ नागरिकांना ठेवींवर 80 बीपीएस जास्त व्याज दर देणार आहे. यामध्ये बँकेने ज्येष्ठ नागरिकांसाठी गोल्डन ईयर एफडी अशी विशेष योजना सुरू केली आहे. यामध्ये ज्येष्ठ नागरिकाला 6.30 टक्के व्याज दिलं जातं.

HDFC बँक विशेष एफडी योजना –

ज्येष्ठ नागरिकांना ठेवींवर 75 बीपीएस जास्त व्याज दर देते. एचडीएफसी बँकेच्या सीनियर सिटीझन केअर एफडी योजनेमध्ये जर ज्येष्ठ नागरिकाने निश्चित ठेव केली तर एफडीला लागू असलेला व्याज दर 6.२5 टक्क्यांपर्यंत मिळेल.

BOB ची खास एफडी योजना –

ज्येष्ठ नागरिकांना BOB बँक ठेवींवर 100 बीपीएस जास्त व्याज दर देत आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एफडी योजनेत (5 वर्ष ते 10 वर्षे) जर वरिष्ठ नागरिक बीओबी बँकेच्या सीनियर सिटीझन केअर एफडी मध्ये गुंतवणकूत करतात तर त्यांना एफडीचा व्याज दर 6.25 टक्के असणार आहे.

SBI विशेष एफडी योजना –

देशातील सगळ्यात मोठी सरकारी बँक SBI आहे. एसबीआय ठेव रकमेवर ज्येष्ठ नागरिकांना 80 बीपीएस जास्त व्याज दर देते. सध्या एसबीआय ज्येष्ठ नागरिकांना एफडीवर 6.20% व्याज देत आहे. एसबीआय सध्या सामान्य लोकांना 5.4 टक्के व्याज देत असून अशा परिस्थितीत तुम्ही ज्येष्ठ नागरिक असाल तर एसबीआयमध्ये निश्चित ठेव ठेवू शकता. (best fixed deposit scheme fd invest in sbi hdfc icici banks special fd by 31 march to get more interest)

संबंधित बातम्या – 

कमी पैशांमध्ये जास्त परतावा देणाऱ्या LIC च्या धमाकेदार योजना; फायदे वाचून करा गुंतवणूक

फक्त 1 रुपये खर्च करून मिळणार 2 लाखांचा फायदा, Bank of Baroda ची धमाकेदार योजना

Petrol Diesel Rate Today : पेट्रोल आणि डिझेल आज स्वस्त की महाग, वाचा तुमच्या शहरातील दर

(best fixed deposit scheme fd invest in sbi hdfc icici banks special fd by 31 march to get more interest)