Best Mutual Funds to Invest | भारतीय शेअर बाजारावरील (Share Market) संकटांची मालिका कमी झाली आहे. कोरोना काळात तेजीत राहिलेला बाजार यंदा सुरुवातीपासूनच मंदीच्या छायेत होता. मे, जून, जुलै तर शेअर बाजारासाठी सर्वात वाईट काळ ठरला. गुंतवणूकदारांचे (Investors) कोट्यवधी रुपये बुडाले. बाजारातील अस्थिरता बघता परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी गाशा गुंडाळला. पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात विदेशी गुंतवणूकदारांनी (FII) बाजारातून काढता पाय घेतला. भारतीय बाजार गंटागळ्या खात असताना अचानक बदल झाला. गेल्या महिना भरापासून बाजार पुन्हा जून्या रंगात न्हाऊन निघाला. चैतन्याचे वातावरण आले. बाप्पा विघ्नहर्त्याने गुंतवणूकदारांना दिलासा दिला. बाजार सावरलाच नाही तर विदेशी गुंतवणूकदारही झपाट्याने वाढले. त्यामुळे शेअर बाजारावर आधारीत म्युच्युअल फंडात (Mutual Fund) गुंतवणुकीचा विचार करत असाल तर शीर्ष रेटिंग एजन्सी क्रिसिलने (Crisil) सर्वोच्च रेटिंग (Rating) दिलेल्या चार म्युच्युअल फंडाविषयी चर्चा पाहुयात.