Big News RBI Repo Rate: आरबीआयकडून रेपो रेटमध्ये 50 बेसिस पॉईंटची वाढ, तुमचा EMI पुन्हा वाढणार !

अजय देशपांडे

Updated on: Jun 08, 2022 | 11:24 AM

भारताची मध्यवर्ती बँक असलेल्या आरबीआयकडून अखेर पुन्हा एकदा रेपो रेटमध्ये वाढ करण्यात आली आहे. आरबीआयने रेपो रेटमध्ये 50 बेसीस पॉईंटची वाढ केली आहे.

Big News RBI Repo Rate: आरबीआयकडून रेपो रेटमध्ये 50 बेसिस पॉईंटची वाढ, तुमचा EMI पुन्हा वाढणार !

नवी दिल्ली : भारताची मध्यवर्ती बँक असलेल्या आरबीआयकडून (RBI) अखेर पुन्हा एकदा रेपो रेटमध्ये (Repo rate) वाढ करण्यात आली आहे. आरबीआयने यावेळी रेपो रेटमध्ये 50 बेसीस पॉईंटची वाढ कोली आहे. गेल्या दोन दिवसांपासून आरबीआयची पतधोरण आढावा बैठक सुरू होती. या बैठकीमधील निर्णयांची घोषणा आज करण्यात आली. पतधोरण बैठकीच्या पहिल्याच दिवसापासून आरबीआय रेपो रेटमध्ये वाढ करणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत होता. अखेर आज आरबीआयकडून रेपो रेट दरवाढीची घोषणा करण्यात आली आहे. आरबीआयने रेपो रेटमध्ये 50 बेसिस पॉईंटची (50 basis points) वाढ केली आहे. या वर्षातील रेपो रेटमध्ये करण्यात आलेली ही दुसरी वाढ आहे. काही दिवसांपूर्वी आरबीआयकडून रेपो रेटमध्ये 40 बेसिस पॉईंटची वाढ करण्यात आली होती. आता पुन्हा एकदा रेपो रेट 50 बेसिस पॉईंटची वाढ करण्यात आल्याने कर्ज आणखी महागणार आहे.

रेपो रेटमध्ये किती वाढ

चालू वर्षाच्या सुरुवातीला रेपो रेट 4 टक्के इतका होता. मे महिन्यात झालेल्या पतधोरण आढावा बैठकीत आरबीआयने रेपो रेटमध्ये 40 बेसिस पॉईंटची वाढ केली. त्यामुळे रेपो रेट 4 टक्क्यांवरून 4. 40 टक्क्यांवर पोहोचला. आता आज पुन्हा एकदा रेपो रेटमध्ये 50 बेसिस पॉईंटची वाढ करण्यात आली आहे. नव्या वाढीसह रेपो रेट आता  4.90 टक्क्यांवर पोहोचला आहे. चालू वर्षात रेपो रेटमध्ये आणखी वाढ होणार असून, रेपो रेट कोरोनापूर्व पातळीवर पोहोचण्याचा अंदाज तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

हे सुद्धा वाचा

कर्जदारांना मोठा फटका

महागाई नियंत्रणात आणण्यासाठी आरबीआयच्या वतीने जी पाऊले उचलण्यात येत आहेत. त्यात रेपो रेटमध्ये वाढ करणे हे महत्त्वपूर्ण पाऊल आहे. त्यानुसार आज पुन्हा एकदा रेपो रेटमध्ये 50 बेसिस पॉईंटची वाढ करण्यात आली आहे. रेपो रेट वाढवण्यात आल्याने आता कर्ज महागणार आहे. केवळ कर्जच महागणार नाही तर आधी घेतलेल्या कर्जाचे हाप्ते ‘ईएमआय’मध्ये देखील वाढ होणार आहे.  मे महिन्यात जेव्हा आरबीआयने रेपो रेटमध्ये वाढ केली होती तेव्हा बँकांनी व्याज दरवाढीचा धडाका लावला होता. अनेक बँकांनी आपल्या विविध प्रकारच्या कर्जावरील व्याज दरात वाढ केली. आता पुन्हा एकदा आरबीआयने रेपो रेट वाढवल्याने बँका व्याज दरात वाढ करू शकतात.

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI