AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

2000 नोटांच्या बाबत मोठी अपडेट, RBI ने सांगितले इतक्या नोटा बॅंकेत परत आल्याच नाहीत

नोटबंदी केल्यानंतर सरकारने बाजारात आणलेली 2000 रुपयांची नोट गेल्यावर्षी चलनातून बाद करण्यात आली. यावेळी ही नोट बॅंकामध्ये परत करण्यासाठी मोठी मुदत देण्यात आली होती, तरीही 2000 रुपयांच्या इतक्या नोटा अजून बॅंकात परतल्याच नाहीत असे आरबीआयने म्हटले आहे.

2000 नोटांच्या बाबत मोठी अपडेट, RBI ने सांगितले इतक्या नोटा बॅंकेत परत आल्याच नाहीत
Two thousand note
| Updated on: Mar 01, 2024 | 4:40 PM
Share

मुंबई | 1 मार्च 2024 : भारतीय रिझर्व्ह बॅंकेने 2000 रुपयांच्या नोटाबाबत मोठी अपडेट दिली आहे. दोन हजार रुपयांच्या नोटांना गेल्यावर्षी चलनातून बाहेर काढले आहे. भारतीय रिझर्व्ह बॅंकेने 29 फेब्रुवारी 2024 पर्यंत 2000 रुपयांच्या एकूण 97.62 टक्के नोटा बॅंकेत परत आल्या आहेत. आता केवळ 8,470 कोटी रुपये किंमतीच्या 2000 च्या नोटा बॅंकांकडे परक आलेल्या नाहीत. आरबीआयने 19 मे 2023 रोजी देशातील चलनातील सर्वात मोठी करन्सी नोट असलेल्या 2000 रुपयांची नोट चलनातून बंद करण्याचा निर्णय घेतला होता.

भारतीय रिझर्व्ह बॅंकने क्लीन नोट पॉलिसी अंतर्गत हा निर्णय घेतला होता. या दोन हजार रुपयांच्या नोटांना बदलण्यासाठी 7 ऑक्टोबर 2023 पर्यंत मुदत देण्यात आली होती. देशातील सर्व बॅंकांमध्ये या नोटा बदलण्याची मुभा दिली होती. आता सर्वसामान्य बॅंका आणि इतर ठिकाणी या 2000 च्या नोटा परत करण्याची सुविधा आता बंद केलेली आहे. जर कोणाला 2000 रुपयांच्या नोटा बदलायच्या असतील तर त्या नोटांना पोस्टाद्वारे रिझर्व्ह बॅंकेकडे पाठवाव्या लागणार आहेत.

केव्हा सुरु झाली होती 2000 ची नोट

भारतीय रिझर्व्ह बॅंकेने 2000 ची नवी नोट नोव्हेंबर 2016 रोजी जारी केली होती. त्यावेळी सरकारने नोटबंदी जाहीर करीत जुन्या 500 आणि 1000 रुपयांच्या नोटांना बंद करण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी 1000 रुपयाची नोट सर्वात मोठी चलनी नोट होती. आरबीआयने आर्थिक वर्ष 2018-19 मध्ये 2000 च्या नोटांची छपाई देखील बंद केली होती. आणि मे 2023 मध्ये तिला चलनातून बाद केले होते. आता 500 रुपयांची नोट सर्वात मोठी चलनी नोट आहे.

आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा.
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला.
सभागृहात आमच्या खुर्च्याखाली काळाबॉक्स कशासाठी? परबांची तुफान टोलेबाजी
सभागृहात आमच्या खुर्च्याखाली काळाबॉक्स कशासाठी? परबांची तुफान टोलेबाजी.
शरद पवारांना भारतरत्न द्या, मागणी होताच गोपीचंद पडळकरांनी उडवली खिल्ली
शरद पवारांना भारतरत्न द्या, मागणी होताच गोपीचंद पडळकरांनी उडवली खिल्ली.
गुलाम, गांडूळ बोलून तोंडाची वाफ...शंभूराज देसाईंचा ठाकरेंना खोचक टोला
गुलाम, गांडूळ बोलून तोंडाची वाफ...शंभूराज देसाईंचा ठाकरेंना खोचक टोला.
शिंदे सेना नाही थेट शिवसेना बोलायच, भर सभागृहात बड्या मंत्र्याचा संताप
शिंदे सेना नाही थेट शिवसेना बोलायच, भर सभागृहात बड्या मंत्र्याचा संताप.
गुलाम म्हणत ठाकरेंची नाव न घेता शिंदेंवर टीका...शिवसेनेकडूनही पटलवार
गुलाम म्हणत ठाकरेंची नाव न घेता शिंदेंवर टीका...शिवसेनेकडूनही पटलवार.
लोकलनं उद्या प्रवास करताय? तिन्ही रेल्वे मार्गावर कसा असणार मेगाब्लॉक?
लोकलनं उद्या प्रवास करताय? तिन्ही रेल्वे मार्गावर कसा असणार मेगाब्लॉक?.
राऊतांनी सत्ताधाऱ्यांची काढली लाज, विरोधी पक्षनेतेपदावरून घणाघाती टीका
राऊतांनी सत्ताधाऱ्यांची काढली लाज, विरोधी पक्षनेतेपदावरून घणाघाती टीका.
पुढच्या आठवड्यात पालिकेची निवडणूक?अनौपचारिक गप्पा, दादांनी काय म्हटलं?
पुढच्या आठवड्यात पालिकेची निवडणूक?अनौपचारिक गप्पा, दादांनी काय म्हटलं?.