AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Silver Rate Today : 1 जून रोजी मोठा बदल! सोने-चांदीला झळाळी, भाव इतके वधारले

Gold Silver Rate Today : सोने-चांदीने यू-टर्न घेतला. या दोन्ही मौल्यवान धातूला झळाळी आली. 31 मे आणि 1 जून रोजी सोने-चांदीने भाव वाढ नोंदवली.

Gold Silver Rate Today : 1 जून रोजी मोठा बदल! सोने-चांदीला झळाळी, भाव इतके वधारले
आज घेतली उसळी
| Updated on: Jun 01, 2023 | 9:42 AM
Share

नवी दिल्ली : मे महिन्यात सोने-चांदीत (Gold Silver Price) मोठी नरमाई होती. काही दिवस वगळले तर दोन्ही मौल्यवान धातूच्या किंमती वधारल्या नाही. मे महिन्यात सोने-चांदीने कोणताही विक्रम केला नाही. आठवड्यातील एखाद्या दिवशीच भाव वाढीचा अनुभव येत होता. इतर दिवशी सोने-चांदीच्या किंमतीत घसरण दिसून येत होती. मे महिन्यात सोने नवीन विक्रम गाठेल असे वाटत असताना सोन्याची जोरदार घसरगुंडी उडाली. प्रति 10 ग्रॅम दोन हजार रुपयांपर्यंत भावात घसरण झाली. डॉलरचे पारडे जड झाल्याने तसेच अमेरिकेतील आर्थिक घडामोडींचा थेट परिणाम दिसून आला.

दोन दिवसांत भावात इतकी वाढ goodreturns च्या आकडेवारीनुसार, 31 मे आणि 1 जून रोजी सोने-चांदीने भाव वाढ नोंदवली. 31 मे रोजी 22 कॅरेटमध्ये 400 रुपयांची दरवाढ होऊन भाव 56,000 रुपयांवर पोहचला. तर 24 कॅरेटमध्ये 450 रुपयांची वाढ होऊन भाव 61,080 रुपयांवर पोहचला. 1 जून रोजी सकाळच्या सत्रात 22 कॅरेट सोने 56,010 रुपये तर 24 कॅरेट सोने 61,090 रुपये झाले.

24, 23, 22 कॅरेटचा भाव ibjarates.com नुसार, 24 कॅरेट सोन्याचा भाव 60,390 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. 23 कॅरेटचा भाव 60,148 रुपये तर 22 कॅरेटचा भाव 55,317 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. 18 कॅरेट सोन्याचा भाव 45,293 रुपये होता. हे भाव काल संध्याकाळचे आहेत.

भाव एका मिस्ड कॉलवर 22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोने खरेदीपूर्वी तुम्हाला त्याची किंमत एका मिस कॉलवर कळू शकते. त्यासाठी 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊ शकता. त्यानंतर थोड्याचवेळात एसएमएस (SMS) येईल. त्याआधारे तुम्हाला किंमती कळतील. तसेच भाव जाणून घेण्यासाठी तुम्ही www.ibja.co वा ibjarates.com या ठिकाणी माहिती घेऊ शकता.

BIS Care APP सोनार तुम्हाला गंडवत असल्याची शंका असल्यास, अथवा तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासायची असल्यास तुमच्या मोबाईलमध्ये BIS Care APP डाऊनलोड करा. प्ले स्टोअरमध्ये जाऊन तुम्ही हे बीआयएस ॲप घेऊ शकता. तुम्ही खरेदी केलेल्या सोन्यावर त्याचा हॉलमार्क क्रमांक (HUID) अंकित असतो. हा क्रमांक टाकल्यास हॉलमार्किंगची संपूर्ण माहिती समोर येईल आणि सर्वात शेवटी हे सोने किती कॅरेटचे आहे ते दिसेल.

देशात सोने होणार स्वस्त? सीईपीएनुसार, भारत 2023-24 मध्ये संयुक्त अरब अमिरातकडून 14 कोटी टन सोने अत्यंत माफत शुल्क देऊन आयात करणार आहे. प्रभावी सीमाशुल्क किंवा मोस्ट फेव्हर्ड नेशन दराच्या अनुषंगाने केवळ 1 टक्के सवलतीवर आयात होईल. सध्या त्यासाठी 15 टक्के शुल्क आकारण्यात येत आहे. यामुळे देशात सोने स्वस्त होण्याची अटकळ बांधण्यात येत आहे.

अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय,प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय,प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.