बिटकॉईन, डॉजकॉईन आता विसरून जा! आरबीआय लवकरच आणतेय डिजीटल चलन, पटापट वाचा

युरोपियन मध्यवर्ती बँकेने डिजिटल युरोच्या ‘तपासणी टप्प्या’ला (इन्व्हेस्टिगेशन फेज) मान्यता दिली आहे. त्यानंतर आता असे बोलले जात आहे की, या दशकाच्या मध्यापर्यंत युरोपमध्ये व्हर्च्युअल चलनाची व्यवस्था लागू होईल. हा टप्पा 24 महिन्यांसाठी असेल.

बिटकॉईन, डॉजकॉईन आता विसरून जा! आरबीआय लवकरच आणतेय डिजीटल चलन, पटापट वाचा
बिटकॉईन, डॉजकॉईन आता विसरून जा! आरबीआय लवकरच आणतेय डिजीटल चलन
Follow us
| Updated on: Jul 24, 2021 | 8:33 AM

नवी दिल्ली : रिझर्व्ह बँकही आपले स्वत:चे डिजिटल चलन बाजारात आणणार आहे. आरबीआय हे चलन टप्प्याटप्प्याने पद्धतीने लाँच करणार आहे. देशातील परकीय चलन विनिमय नियम आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यातील बदल लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. गुरुवारी रात्री आरबीआयचे डेप्युटी गव्हर्नर टी रविशंकर यांनी याबाबत माहिती दिली. आरबीआयच्या योजनेबाबत माहिती देताना ते म्हणाले, सार्वभौम हमीचे डिजिटल चलन आल्यानंतर अर्थव्यवस्थेतील रोख रकमेचे प्रमाण कमी होईल. यासह सामान्य लोकदेखील खाजगी चलनाद्वारे होणारे नुकसान टाळू शकतील. (Bitcoin, Dodgecoin, forget it now! RBI to launch digital currency soon)

आरबीआयचे डेप्युटी गव्हर्नर यांचे हे वक्तव्य अशावेळी आले आहे, ज्यावेळी युरोपियन सेंट्रल बँकेने डिजिटल युरोसंदर्भात मोठे पाऊल उचलले आहे. युरोपियन मध्यवर्ती बँकेने डिजिटल युरोच्या ‘तपासणी टप्प्या’ला (इन्व्हेस्टिगेशन फेज) मान्यता दिली आहे. त्यानंतर आता असे बोलले जात आहे की, या दशकाच्या मध्यापर्यंत युरोपमध्ये व्हर्च्युअल चलनाची व्यवस्था लागू होईल. हा टप्पा 24 महिन्यांसाठी असेल. यादरम्यान डिजिटल युरोच्या डिझाईन आणि वितरणावर लक्ष केंद्रित केले जाणार आहे.

अनेक देश डिजीटल चलन लॉन्च करण्याच्या तयारीत

जगभरातील अनेक देश डिजिटल चलन सुरू करण्याची तयारी करत आहेत. यात भारतानेही एक पाऊल पुढे टाकल्याचे आरबीआयच्या घोषणेवरून स्पष्ट होत आहे. जगातील बर्याच बँका त्यांच्या स्वत:च्या डिजिटल चलनावर काम करत आहेत, परंतु सध्या हे देश चीनपेक्षा खूपच मागे आहेत. चीननेही अनेक शहरांमध्ये डिजिटल चलनाची चाचपणी सुरू केली आहे. तथापि, ग्रेनेडा, सेंट किट्स आणि नेव्हिस या पूर्व कॅरेबियन प्रदेशातील तीन बेटांनी स्वत:चे डिजिटल चलन सुरू केले आहे. या तीन बेटांवर एकच मध्यवर्ती बँक आहे. अमेरिकन फेडरल रिझर्व्ह बँक आणि बँक ऑफ इंग्लंडदेखील व्हर्च्युअल चलन सुरू करण्याच्या शक्यतेवर काम करीत आहेत.

आरबीआयच्या वार्षिक अहवालात उल्लेख

यंदा रिझर्व्ह बँकेने चलन आणि फायनान्ससंबंधी आपल्या वार्षिक अहवालात डिजीटल चलनाचा उल्लेख केला होता. केंद्रीय बँकेच्या नेतृत्वाखाली डिजीटल चलन लॉन्च केले जाऊ शकते. जेणेकरून थेट हस्तांतरणाद्वारे बिगरआर्थिक व्यवहार आणि आर्थिक समन्वयाचे काम पूर्ण केले जाऊ शकते. या अहवालात असे म्हटले होते की, व्याज दरयुक्त डिजिटल फिएटच्या मदतीने धोरणात्मक व्याजदराच्या आघाडीवर अर्थव्यवस्था सुधारण्यास मदत मिळेल. विकसनशील अर्थव्यवस्थांमध्ये चलन स्वरूपात मोठ्या प्रमाणात भांडवलाची गुंतवणूक अनेक प्रकारे फायदेशीर ठरू शकते. यामुळे केंद्रीय बँकेच्या सरकारी सिक्युरिटीजवरील ताणही कमी होईल.

डिजिटल चलनाविषयी आरबीआयची चिंता

आरबीआयने डिजिटल चलनाबाबत काही चिंता व्यक्त केल्या आहेत. डिजिटल चलन व्यवहारात नाव किंवा ओळख नसल्यामुळे क्रॉस-बॉर्डर व्यवहार व्यवस्थापित करणे कठिण होऊ शकते. यातून मार्ग काढण्यासाठी सध्या अस्तित्त्वात असलेल्या आर्थिक अफरातफरविरोधी आणि आर्थिक दहशतवाद प्रतिबंधक कायद्यान्वये योग्य ती व्यवस्था करावी लागेल. (Bitcoin, Dodgecoin, forget it now! RBI to launch digital currency soon)

इतर बातम्या

कल्याणच्या मलंगगड परिसरात नदीत बुडून दोघांचा मृत्यू, एनडीआरएफने 24 तासांनी मृतदेह बाहेर काढले

Sangli Flood : कृष्णा, वारणा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ, सांगलीत मदतकार्यासाठी लष्कर पाचारण

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.