कल्याणच्या मलंगगड परिसरात नदीत बुडून दोघांचा मृत्यू, एनडीआरएफने 24 तासांनी मृतदेह बाहेर काढले

पोहण्यासाठी नदीत उतरलेल्या दोन तरुणांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना अंबरनाथ तालुक्यातील मलंगगड परिसरात घडली आहे.

कल्याणच्या मलंगगड परिसरात नदीत बुडून दोघांचा मृत्यू, एनडीआरएफने 24 तासांनी मृतदेह बाहेर काढले
कल्याणच्या मलंगगड परिसरात नदीत बुडून दोघांचा मृत्यू, एनडीआरएफने 24 तासांनी मृतदेह बाहेर काढले
Follow us
| Updated on: Jul 23, 2021 | 11:25 PM

कल्याण (ठाणे) : पोहण्यासाठी नदीत उतरलेल्या दोन तरुणांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना अंबरनाथ तालुक्यातील मलंगगड परिसरात घडली आहे. या दोघांचे मृतदेह एनडीआरएफच्या टीमने तब्बल 24 तासांनंतर बाहेर काढले. विशेष म्हणजे प्रशासनाकडून ठाणे जिल्हा हद्दीत पर्यटकांना नदी, धबधबा आणि तलाव क्षेत्रात जाण्यास मज्जाव करण्यात आलं आहे. तरीही पर्यटक अशा ठिकाणी जात असल्याने प्रशासनाचं लक्ष आहे की नाही? असा प्रश्न उपस्थित केला जातोय.

नेमकं काय घडलं?

कल्याणच्या कोळसेवाडी परिसरात राहणारा 18 वर्षीय इशांत मोहाडीकर आणि 20 वर्षीय विनायक परब हे दोघे गुरुवारी (22 जुलै) मलंगगड भागात अन्य एका मित्रासह फिरण्यासाठी आले होते. चिंचवली परिसरातील नदीत हे दोघे पोहण्यासाठी उतरले. तर त्यांच्या एका मित्राला पोहता येत नसल्याने तो बाहेरच थांबला. मात्र नदीच्या पाण्याला प्रचंड प्रवाह असल्याने पाण्यात उतरलेले इशांत आणि विनायक हे वाहून गेले.

तब्बल 24 तास शोध मोहिम

संबंधित घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने काल दिवसभर या दोघांचा शोध घेतला. मात्र ते सापडले नाहीत. त्यामुळे आज अखेर एनडीआरएफच्या टीमने याठिकाणी येत शोधकार्य सुरू केलं. यावेळी एका तरुणाचा मृतदेह दुपारी साडेबारा वाजता, तर दुसऱ्या तरुणाचा मृतदेह संध्याकाळी साडेपाच वाजता सापडला. हे दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी सरकारी रुग्णालयात पाठवण्यात आले. या घटनेनंतर मलंगगड परिसरात येणाऱ्या पर्यटकांना रोखणं गरजेचं असल्याचं मत पुन्हा एकदा व्यक्त होतंय.

हेही वाचा :

समोरून मगर, साप जात होते, चिपळूणमध्ये रेसक्यू केलेल्या नागरिकांनी सांगितला थरार

Non Stop LIVE Update
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा.
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन.
अमरावतीत शरद पवारांचा माफीनामा, ... तेव्हा चूक झाली, यापुढं होणार नाही
अमरावतीत शरद पवारांचा माफीनामा, ... तेव्हा चूक झाली, यापुढं होणार नाही.
वंचित उमेदवाराची माघार, भाजपची डोकेदुखी तर काँग्रेसला मिळणार दिलासा
वंचित उमेदवाराची माघार, भाजपची डोकेदुखी तर काँग्रेसला मिळणार दिलासा.
शिंदेंच्या बंडाचा आणखी एक पत्ता उघडला, टपरीवरून शिंदेंचा ठाकरेंना फोन
शिंदेंच्या बंडाचा आणखी एक पत्ता उघडला, टपरीवरून शिंदेंचा ठाकरेंना फोन.