AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bitcoin चा नवनवीन रेकॉर्ड; मग तुम्ही गुंतवणूक करावी का?

Bitcoin | बिटकॉईन जणू गुंतवणूकदारांसाठी परीस ठरला आहे. बिटकॉईन सातत्याने नवनवीन रेकॉर्ड करत आहे. बिटकॉईन 70 हजार डॉलरच्या पुढे गेले आहे. येत्या काही दिवसांत हे आभासी चलन पुन्हा नवीन रेकॉर्ड करु शकते. मग या पळणाऱ्या घोड्यावर तुम्ही डाव लावणार का? हे फायद्याचे गणित ठरेल का?

Bitcoin चा नवनवीन रेकॉर्ड; मग तुम्ही गुंतवणूक करावी का?
| Updated on: Mar 09, 2024 | 9:13 AM
Share

नवी दिल्ली | 9 March 2024 : तर क्रिप्टोकरन्सी बाजारात गुंतवणूकदारांचा भांगडा सुरु आहे. आनंदाचे वारे वाहत आहे. आताच 5 मार्च रोजी रात्री बिटकॉईने 28 महिन्यांचा रेकॉर्ड मोडीत काढला होता. 69 हजार डॉलरचा टप्पा ओलांडला होता. तर काल रात्री पुन्हा नवीन रेकॉर्ड बिटकॉईनने तयार केला. 70 हजार डॉलरचा टप्पा ओलांडला. इथेरियमसह इतर क्रिप्टो करन्सी सध्या तेजीचे वारे आहे. त्यामागे अमेरिकन सरकारचे बदलले धोरण आहे. तर युरोपियन राष्ट्रांसह काही देशांनी क्रिप्टोविषयीची भूमिका बदलल्याचा परिणाम आहे. मग तुम्ही क्रिप्टोत गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल का?

बरं हे तेजीचे सत्र का?

मध्यंतर बिटकॉईन आणि इतर आभासी चलन जणू चर्चेच्या बाहेर फेकले गेले होते. त्यांच्यात प्रचंड घसरण झाली होती. पण जानेवारीनंतर क्रिप्टोकरन्सीमध्ये तेजीचे सत्र आले आहे. बिटकॉईन ईटीएफ(Bitcoin ETF) हे या तेजीमागील खरे कारण आहे. अमेरिकेच्या बाजार नियंत्रकाने ईटीएफला मंजुरी दिली आहे. मेरिकेतील सिक्युरिटीज अँड एक्सचेंज कमिशनने 11 स्पॉट बिटकॉईन ईटीएफला मंजुरी दिली. अर्थात त्यासाठी कोर्टकचेऱ्या झाल्या. पण हा विषय निकाली निघाला. त्यामुळे आता गुंतवणूकदार विश्वासाने गुंतवणूक करत आहेत.

बिटकॉईन सर्वकालीन उच्चाकांवर

मंगळवारी जागतिक बाजारात बिटकॉईनचा भाव 28 महिन्यांच्या विक्रमी स्तरावर पोहचला होता. नोव्हेंबर 2021 मध्ये बिटकॉईनच्या नावावर 68,991 डॉलरचा विक्रम आहे. हा रेकॉर्ड इतिहासजमा झाला. व्यापारी सत्रात बिटकॉईन 69,208.79 डॉलरच्या पण पुढे गेले होते. शुक्रवारी रात्री 70 हजार डॉलरचा टप्पा ओलांडला. विशेष म्हणजे या 28 महिन्यात बिटकॉईन 20 हजार डॉलरहून निच्चांकावर पोहचले होते. व्याजदर वाढल्याने हा फरक दिसून आला.

का करु नये गुंतवणूक

  1. भारत सरकारची बिटकॉईनला मान्यता नाही. भारतीय रिझर्व्ह बँक आणि सेबीने क्रिप्टोतील गुंतवणूक धोकादायक ठरवली आहे. पण क्रिप्टो गुंतवणुकीतील उत्पन्न कराच्या परिघात आहे.
  2. बिटकॉईन ट्रेडिंगमध्ये एकदम चढउतार दिसून येते. ज्या वेगाने बिटकॉईन चढते, त्याच वेगाने घसरण दिसून येते.
  3. बिटकॉईन गुंतवणुकीत कुठल्याही प्रकारची गुंतवणूक जोखिमपात्र असते. गुंतवणूकदारांनाच त्याचा फटका सहन करावा लागतो. फसवणूक झाल्यास तुम्हाला सरकारी यंत्रणेकडे दाद मागता येत नाही.
  4. क्रिप्टोकरन्सीविषयीचे कोणतेही नियम अथवा मूल्यासंदर्भात काही ही निश्चित नाही. जर काही बडे गुंतवणूकदार बाहेर पडले तर क्रिप्टोचे हाल काय होतील, हे कल्पनेबाहेरील आहे.
  5. क्रिप्टोत अनेक घोटाळे पण समोर आलेले आहेत. त्यात सरकारी यंत्रणा तुमची कुठलीच मदत करु शकत नाही. त्यामुळे कष्टाचा पैसा गुंतवणूक करताना आमिषाच्या मागे न लागता तुमचे हित तुम्हालाच जपावे लागते.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.