AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

LPG Cylinder : सिलेंडर बुक करणं झालं सोपं, आता ‘या’ नंबरवर मिस कॉल द्या आणि…

ही सुविधा फक्त इंडियन ऑईलच्या इंडेन गॅसच्या ग्राहकांना उपलब्ध असेल. इंडेन (Indane) गॅस ग्राहक आता फक्त मिस कॉल देऊन एलपीजी सिलिंडर भरण्यासाठी बुकिंग करू शकतात.

LPG Cylinder : सिलेंडर बुक करणं झालं सोपं, आता 'या' नंबरवर मिस कॉल द्या आणि...
अशा प्रकारे तपासा स्टेटस- सर्वात आधी तुम्हाला http://mylpg.in/ या वेबसाईटवर जाऊन LPG आयडी नंबर टाकावा लागेल. त्यानंतर तुम्ही वापरत असलेल्या OMC LPG च्या आधारावर तुम्हाला आवश्यक माहिती द्या. याठिकाणी तुमचा 17 अंकी LPG आयडी एंटर करा आणि मोबाईल नंबर नोंदवा.
| Edited By: | Updated on: Apr 03, 2021 | 12:52 PM
Share

नवी दिल्ली : ग्राहक आता फक्त एक मिस कॉल देऊन एलपीजी सिलिंडर (LPG Cylinder) बुक करू शकतात. इतकंच नाहीतर तुम्ही व्हॉट्सअॅपद्वारेही (Whatsapp) एलपीजी सिलिंडर बुक करू शकता. ही सुविधा फक्त इंडियन ऑईलच्या इंडेन गॅसच्या ग्राहकांना उपलब्ध असेल. इंडेन (Indane) गॅस ग्राहक आता फक्त मिस कॉल देऊन एलपीजी सिलिंडर भरण्यासाठी बुकिंग करू शकतात. (book your lpg gas cylinder by using whatsapp and give a missed call to this number)

ग्राहक त्यांच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवरून पैसे खर्च न करता मिस कॉल देऊन सिलिंडर बुक करू शकतील. इंडियन ऑइलने त्यांच्या निवेदनात दिलेल्या माहितीनुसार, ही सुविधा आयव्हीआरएस सिस्टममध्ये स्वत: ला आरामदायक नसलेल्या अशा लोकांना आणि ज्येष्ठांसाठी चांगली सोयीची आहे.

या नंबरवर द्यावा लागेल मिस्ड कॉल

एलपीजी ग्राहक सिलेंडर भरण्यासाठी गॅस सिलिंडर्स 8454955555 नंबरवर देशातून कोठूनही मिस कॉल करून बुक करू शकतात. कंपनीने म्हटले आहे की, या सुविधेमुळे ग्राहकांना बुकिंगसाठी लागणाऱ्या वेळेची बचत होईल. तसेच ग्राहकांना कॉलसाठी कोणतेही शुल्क द्यावे लागणार नाही.

व्हॉट्सअ‍ॅपवर गॅस सिलेंडर कसा बूक करावा…

गॅस सिलिंडर बुक करण्याचे काम एकाच मेसेजद्वारे करता येते. यासाठी सर्व गॅस कंपन्यांनी हा नंबर जारी केला आहे. यासाठी तुम्हाला फक्त REFILL टाइप करून पाठवावे लागेल. व्हॉट्सअ‍ॅपच्या मदतीने स्टेटसही शोधता येतो.

या नंबरवर करा मेसेज

तुम्ही इंडियन गॅस म्हणून ओळखल्या जाणार्‍या इंडियन ऑईल कॉर्पोरेशनचे ग्राहक असल्यास तुमच्यासाठी व्हॉट्सअ‍ॅप नंबर देण्यात आला आहे. यासाठी नोंदणीकृत क्रमांकावरून रेफिल टाईप करून तुम्हाला 7588888824 नंबरवर व्हॉट्सअ‍ॅपवर मेसेज करावा लागेल.

जर बुकिंग केले गेले आहे आणि त्याची स्थिती जाणून घेऊ इच्छित असेल तर व्हॉट्सअॅप सेवेवरही ही सुविधा उपलब्ध आहे. यासाठी नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावरून तुम्हाला STATUS # टाईप करावे लागेल, त्यानंतर तुम्हाला ऑर्डर क्रमांक मिळेल. उदाहरणार्थ, जर तुमचा बुकिंग क्रमांक 12345 असेल तर आपणास STATUS # 12345 आणि व्हॉट्सअॅप मेसेज 7588888824 क्रमांकावर टाइप करावा लागेल. STATUS # आणि ऑर्डर नंबर दरम्यान कोणताही स्पेस नाही हे लक्षात असूद्या. (book your lpg gas cylinder by using whatsapp and give a missed call to this number)

संबंधित बातम्या – 

अल्पावधित 10 हजाराचे 17 हजार झाले, कोरोनाकाळातही लोकांनी तुफान पैसा कमावला, तुमच्यासाठी खास आयडिया

मोठी बातमी! आता Post Office मधून पैसे काढणं महागणार, 1 एप्रिलपासून नवा नियम लागू

बँकांमध्ये पैसे जमा करणे आता फायदेशीर नाही, वाढण्याऐवजी होतायत कमी, जाणून घ्या…

(book your lpg gas cylinder by using whatsapp and give a missed call to this number)
मराठी अन् मुस्लिम मतदारांच्या ध्रुवीकरणासाठी ठाकरे बंधूंची रणनिती ठरली
मराठी अन् मुस्लिम मतदारांच्या ध्रुवीकरणासाठी ठाकरे बंधूंची रणनिती ठरली.
मोदी आणि एपस्टीनचं काय नातं? एपस्टीन प्रकरणावरून चव्हाणांचा थेट सवाल
मोदी आणि एपस्टीनचं काय नातं? एपस्टीन प्रकरणावरून चव्हाणांचा थेट सवाल.
भाजपात इनकमिंग सुरूच, 22 नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा पक्षात प्रवेश
भाजपात इनकमिंग सुरूच, 22 नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा पक्षात प्रवेश.
बाबरच्या नावाने मशीद बांधली तर कारसेवक तिथे जातील अन्... राणांचा इशारा
बाबरच्या नावाने मशीद बांधली तर कारसेवक तिथे जातील अन्... राणांचा इशारा.
BMC निवडणुकीसाठी मनसे अ‍ॅक्टिव्ह...राज ठाकरेंच्या मनसेची मोर्चेबांधणी
BMC निवडणुकीसाठी मनसे अ‍ॅक्टिव्ह...राज ठाकरेंच्या मनसेची मोर्चेबांधणी.
ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची रणनीती, शिंदे सेना-BJP समान जागा लढणार
ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची रणनीती, शिंदे सेना-BJP समान जागा लढणार.
3 वर्गमित्र, 3 वेगळे पक्ष अन् प्रभाग एक... राजकारणापलीकडची मैत्री
3 वर्गमित्र, 3 वेगळे पक्ष अन् प्रभाग एक... राजकारणापलीकडची मैत्री.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? युगेंद्र पवारांनी एका वाक्यात म्हटलं..
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? युगेंद्र पवारांनी एका वाक्यात म्हटलं...
मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?
मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?.
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!.