AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Budget 2024 | बजेटनंतर PSU स्टॉक्स धावणार सूसाट? गेल्यावर्षी तर झाली होती कमाल

Budget 2024 | गेल्या एका वर्षातील प्रत्येक तीन महिन्यात एका पीएसयू स्टॉकची किंमत दुप्पट झाली आहे. सरकारी कंपन्यांनी मोठी झेप घेतली आहे. गेल्या बजेटनंतर विरोधकांना उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरकारी कंपन्या हनुमान उडी घेतली हे स्पष्ट केले होते. या बजेटमध्ये आता काय गिफ्ट मिळते याकडे गुंतवणूकदारांचे लक्ष लागले आहे.

Budget 2024 | बजेटनंतर PSU स्टॉक्स धावणार सूसाट? गेल्यावर्षी तर झाली होती कमाल
| Updated on: Jan 27, 2024 | 3:21 PM
Share

नवी दिल्ली | 27 January 2024 : गेल्या पाच वर्षांत सार्वजनिक उपक्रमातील (PSU-Public Sector Undertaking) शेअर्समध्ये जोरदार तेजीचे सत्र दिसून आले. रेल्वे, इन्फ्रास्ट्रक्चर, पॉवर आणि डिफेंस सारख्या क्षेत्रात विकासाचे चाक जोरात फिरले आहे. गेल्या वर्षात रेल्वे स्टॉक, सरकारी बँका आणि सरकारी उपक्रमातील कंपन्यांनी मोठी झेप घेतली आहे. त्याचा गुंतवणूकदारांना मोठा फायदा झाला आहे. यंदा या कंपन्या मालामाल करतील का, असा प्रश्न गुंतवणूकदारांना पडला आहे. तर पीएसयू स्टॉक्समध्ये पैसे गुंतवणूक करताना सावध भूमिका घेण्याची सूचना गुंतवणूक तज्ज्ञांनी दिला आहे.

PSU Index वधारला

काही शेअरचे मूल्य हे खासगी क्षेत्रातील त्यांच्या प्रतिस्पर्धी कंपन्यांपेक्षा अधिक असल्याचे दिसून आले आहे. गेल्या एका वर्षात प्रत्येक तीन महिन्यात पीएसयू स्टॉकची किंमत दुप्पटहून अधिक झाली आहे. त्यामुळे बीएसई पीएसयू इंडेक्स 65 टक्क्यांपेक्षा अधिक वाढला आहे. या कंपन्यांमध्ये गुंतवणूक वाढल्याने आणि या कंपन्यांनी अनेक विकास कामांमध्ये पैसा ओतल्याने हा बदल दिसून येत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. या अर्थसंकल्पात जर या कंपन्यांसाठी अधिक बजेटची तरतूद झाली तर शेअर बाजारात हे शेअर कमाल दाखवू शकतात.

सरकारी कंपन्यांवर वाढला भरवसा

भाजपच्या नेतृत्वातील एनडीए सरकारने 2014 मध्ये सत्ता हाती घेतली. त्यांनी सार्वजनिक उपक्रमात निर्गुंतवणूकीचे धोरण राबविले. त्याला विरोध झाला. त्यांनी अनेक बदल केले. बँकिंग क्षेत्रात धोरणात्मक निर्णय घेण्यात आला. सरकारने खासगी क्षेत्राच्या धरतीवर या कंपन्यांमध्ये काही बदल केले. त्यांना व्यावसायिक स्वरुप देण्याचा प्रयत्न केला. त्याचा चांगला परिणाम गेल्या चार ते पाच वर्षात दिसून येत आहे. या सरकारने कंपन्या विक्री काढण्याचा सपाटा लावल्याचा आरोप विरोधक करत असताना पीएसयू सेक्टरमधील कंपन्या जोरदार बॅटिंग करत आहेत.

या कंपन्यांची झेप

एनएचपीसी, माझगाव डॉक, रेल्वे विकास निगम, एनटीपीसी आणि इरकॉन इंटरनॅशनल याच नाहीतर रेल्वेसंबंधित अनेक उपक्रमांनी गेल्या काही दिवसांत मोठी झेप घेतली आहे. या कंपन्यांनी शेअर बाजारात गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. केंद्र सरकारने वर्ष 2025 साठी निर्गुंतवणूकीसाठी 5,000 कोटी रुपयांहून कमी उद्दिष्ट ठेवले आहे. गेल्या एका वर्षात सरकारला निर्गुंतवणुकीतून फारसे काही हाती लागले नसल्याचा दावा करण्यात येत आहे. तर 2023-24 मध्ये सरकारने पीएसयू निर्गुंतवणुकीतून जवळपास 10,000 कोटी रुपये मिळवले आहेत. सरकारचे लक्ष्य 51,000 कोटी रुपये इतके होते.

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.