Budget 2024 : बजेटपूर्वी शेअर बाजारात काय घडामोड? तज्ज्ञांचे मत तरी काय

Budget Share Market : लोकसभा निवडणूक काळात आणि निकालानंतर शेअर बाजारात मोठ्या हालचाली झाल्या. बाजाराने तात्काळ रिॲक्शन दिली. आता पूर्ण अर्थसंकल्पापूर्वी काय असेल स्थिती?

Budget 2024 : बजेटपूर्वी शेअर बाजारात काय घडामोड? तज्ज्ञांचे मत तरी काय
Budget 2024 Share Market
Follow us
| Updated on: Jun 29, 2024 | 5:29 PM

सध्या शेतकरीच नाही तर सरकारचे पण डोळे आकाशाकडे लागले आहे. मान्सून अजून देशात पूर्णपणे सक्रिय झाला नाही. उत्तर भारतात उकाड्याने जनता त्रस्त आहेत. त्याचा परिणाम स्थानिक बाजारपेठ आणि शेअर बाजारात दिसून येत आहे. बाजारात चढउताराचे सत्र आहे. स्टॉक मार्केटमध्ये जागतिक संकेत, परदेशी गुंतवणूकदारांचा कल यावर पण बाजाराची दशा आणि दिशा समोर येईल. तज्ज्ञांच्या मते मान्सूनची सक्रियता आणि कच्चा तेलाचे भाव यावर गुंतवणूकदार कशी प्रतिक्रिया देतात हे पण अवलंबून असेल. पुढील महिन्यात पूर्ण बजेट सादर होण्याची शक्यता आहे. त्यापूर्वी काही क्षेत्रात उसळी येण्याची शक्यता आहे.

बाजारात दिसेल उलाढाल

स्वस्तिका इन्व्हेस्टमार्ट लिमिटेडचे विश्लेषक प्रवेश गौड यांनी बाजाराविषयीचे मत व्यक्त केले आहे. त्यानुसार, या आठवड्यात बजेटसंबंधीच्या चर्चा होतील. त्यासंबंधीच्या क्षेत्रात घडामोड दिसेल. मान्सूनच्या सक्रियतेकडे पण बाजाराचे लक्ष आहे. नजीकच्या भविष्यात गुंतवणूकदार त्यादृष्टीने त्यांच्या गुंतवणुकीचा विचार करतील.

हे सुद्धा वाचा

परदेशी गुंतवणूकदार आणि देशातील संस्थागत गुंतवणूकदार कच्चा तेलाच्या किंमतीबाबत जागरुक आहेत. जागतिक बाजारात भाव वाढतात की कमी होतात, याकडे त्यांचे लक्ष आहे. अमेरिकन जीडीपीची आकडेवारी 27 जून रोजी समोर येईल. रेलिअगर ब्रोकिंग लिमिटेडचे वरिष्ठ उपाध्यक्ष अजित मिश्रा यांच्या मते, बजेटसंबंधीच्या घडामोडींवर बाजाराचे बारीक लक्ष असेल. अमेरिकेतील घाडमोडींवर पण गुंतवणूकदार लक्ष ठेवून आहे. त्याचा परिणाम बाजारावर दिसून येईल.

बाजाराची कामगिरी

या आठवड्यात बीएसईच्या 30 शेअर असलेला सेन्सेक्स 217.13 अंक वा 0.28 टक्क्यांनी उसळला. तर नॅशनल स्टॉक एक्सचेंज वा निफ्टी 35.5 अंक वा 0.15 टक्क्यांनी वधारला. मोतीलाल ओसवाल फायनेंन्शिअल सर्व्हिसेजचे सिद्धार्थ खेमका यांच्या मते, एकूणच बाजार स्थिर राहण्याची शक्यता आहे. पण बजेट संबंधी क्षेत्रात घडमोड दिसू शकते.

18 व्या लोकसभेच्या दुसऱ्या सत्रात बजेट

संसदीय कार्यमंत्री किरेन रिजुजू यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यानुसार, मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील पूर्ण बजेट जुलैच्या मध्यात सादर केले जाऊ शकते. त्यांनी X वर याविषयीची पोस्ट लिहिली आहे. 18 व्या लोकसभेचे पहिले सत्र 24 जून ते 3 जुलै दरम्यान होईल. यामध्ये नवनिर्वाचित खासदार शपथ घेतील. लोकसभा अध्यक्ष निवडले जातील. तर राष्ट्रपतींचे अभिभाषण पण सादर होईल. त्यानंतर दुसरे सत्र सुरु होईल. त्यात पूर्ण बजेट सादर करण्यात येईल.

Non Stop LIVE Update
शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार आजच होणार जाहीर, संजय शिरसाट म्हणाले...
शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार आजच होणार जाहीर, संजय शिरसाट म्हणाले....
शरद पवारांच्या NCPकडून एबी फॉर्मचं वाटप सुरू, 3 जणांची उमेदवारी फिक्स
शरद पवारांच्या NCPकडून एबी फॉर्मचं वाटप सुरू, 3 जणांची उमेदवारी फिक्स.
झिशान सिद्दीकी वांद्रे पूर्व मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात
झिशान सिद्दीकी वांद्रे पूर्व मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात.
'राऊतांना झोपताना झाडं अन् उठताना डोंगर...', शहाजी बापूंचं प्रत्युत्तर
'राऊतांना झोपताना झाडं अन् उठताना डोंगर...', शहाजी बापूंचं प्रत्युत्तर.
उन्मेष पाटलांना उमेदवारी, ठाकरे गटाकडून होणार अधिकृत घोषणा?
उन्मेष पाटलांना उमेदवारी, ठाकरे गटाकडून होणार अधिकृत घोषणा?.
अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या 'या' नेत्यानं घेतली ठाकरेंची 'मशाल' हाती
अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या 'या' नेत्यानं घेतली ठाकरेंची 'मशाल' हाती.
अमोल मिटकरींना उमेदवारी मिळणार की नाही?, अजितदादांनी तडकाफडकी बोलावलं
अमोल मिटकरींना उमेदवारी मिळणार की नाही?, अजितदादांनी तडकाफडकी बोलावलं.
'भाई को उडा देंगे, 5 करोड दे दो..', म्हणणारा आता म्हणतो, सलमान भाईजान
'भाई को उडा देंगे, 5 करोड दे दो..', म्हणणारा आता म्हणतो, सलमान भाईजान.
'ते 5 कोटी शहाजी बापूंचे? एकच गाडी सापडली अशा..',रोहित पवारांचा निशाणा
'ते 5 कोटी शहाजी बापूंचे? एकच गाडी सापडली अशा..',रोहित पवारांचा निशाणा.
'भाजपच्या यादीत धक्कातंत्र नव्हतं पण आमची यादी...', कोणाचा गौप्यस्फोट?
'भाजपच्या यादीत धक्कातंत्र नव्हतं पण आमची यादी...', कोणाचा गौप्यस्फोट?.