Budget 2024 | अर्थसंकल्पाकडून करदात्यांना मोठ्या अपेक्षा, करदात्यांना हे तीन गिफ्ट मिळणार का?

Budget 2024 | अर्थसंकल्प सादर होण्यास आता उणेपुरे दहा दिवस उरले आहेत. अर्थमंत्री निर्मला सीतारमण या केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणार आहेत. या अर्थसंकल्पाकडून प्रत्येकाला काही ना काही अपेक्षा आहेत. करदात्यांना या आरक्षणात तीन गिफ्टची प्रतिक्षा आहे. काय आहेत त्यांच्या मागण्या?

Budget 2024 | अर्थसंकल्पाकडून करदात्यांना मोठ्या अपेक्षा, करदात्यांना हे तीन गिफ्ट मिळणार का?
Follow us
| Updated on: Jan 20, 2024 | 9:54 AM

नवी दिल्ली | 20 January 2024 : केंद्र सरकार 1 फेब्रुवारी रोजी बजेट सादर करणार आहेत. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी स्पष्ट केले आहे की, हे बजेट वोट ऑन अकाऊंट असेल. तरीही 2019 मधील मोदी सरकारने सादर केलेला अर्थसंकल्प पाहता यामध्ये पण काही घोषणा होण्याची शक्यता आहे. करदात्यांना या बजेटकडून अधिक अपेक्षा आहे. करदात्यांना या कर सवलतीची अपेक्षा आहे. 31 जानेवारीपासून बजेट सत्र सुरु होत आहे. त्यावर करदात्यांची नजर आहे. या बजेटकडून करदात्यांना कोणत्या तीन मोठ्या अपेक्षा आहेत ते पाहुयात..

जुनी कर प्रणाली कायम ठेवावी

जुनी कर प्रणाली कायम ठेवावी, अशी मागणी करदात्यांची आहे. अर्थमंत्रालयाने अद्याप जुनी कर प्रणाली समाप्त केलेली नाही. पण सरकार ज्याअर्थी नवीन कर प्रणाली घेऊन आलेली आहे. त्यावरुन असा अंदाज बांधण्यात येत आहे की, सरकार जुनी कर प्रणाली कदाचित बंद करु शकते. जुन्या कर प्रणालीत इतर सवलती मिळत असल्याने ती बंद न करण्याची आग्रही मागणी करण्यात येत आहे.

हे सुद्धा वाचा

8 लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त

अनेक नोकरदार करात मोठ्या बदलाची अपेक्षा करत आहेत. त्यांना कर प्रणालीत मोठा दिलासा हवा आहे. सरकारने कर रचनेत बदल करावा. 8 लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त करावे, अशी मागणी जोर धरत आहे. वाढती महागाई पाहता, करदात्यांना हा दिलासा हवा आहे. महागाईची झळ आणि कराचे ओझे मध्यमवर्गावर आहे. त्यामुळे त्यांना बजेटकडून मोठ्या अपेक्षा आहेत.

80D ची मर्यादा वाढवा

करदात्यांची मागणी आहे की, कलम 80D अंतर्गत मेडिकल इन्शुरन्स प्रीमियममध्ये कपातीची मर्यादा 50 हजार रुपये करण्याची मागणी करण्यात येत आहे. सध्या ही मर्यादा 25 हजार रुपये आहे. ही मर्यादा वाढल्यास करदात्यांना अतिरिक्त लाभ मिळेल. त्यामुळे त्यांचे करमुक्त उत्पन्न वाढेल.

16 जूनपर्यंत कार्यकाळ

सध्याच्या लोकसभेचा कार्यकाळ 16 जून रोजी संपत आहे. लोकसभा निवडणुकीच्या घोषणेपूर्वी 17 व्या लोकसभेचे शेवटचे सत्र होत आहे. 2019 मध्ये लोकसभा निवडणुकांची घोषणा, 10 मार्च रोजी करण्यात आली होती. 11 एप्रिल ते 19 मे दरम्यान 7 टप्प्यात मतदान झाले होते.

Non Stop LIVE Update
पृथ्वीराज चव्हाणांनी किती जागा मिळणार थेट आकडाच सांगितला, म्हणाले....
पृथ्वीराज चव्हाणांनी किती जागा मिळणार थेट आकडाच सांगितला, म्हणाले.....
बीड लोकसभा मतदारसंघात काय घडतंय? फेर निवडणूक घेण्याची कुणाची मागणी?
बीड लोकसभा मतदारसंघात काय घडतंय? फेर निवडणूक घेण्याची कुणाची मागणी?.
ते ज्या ठिकाणी जातात तिथला उमेदवार पराभूत...; राज ठाकरेंना कोणी डिवचलं
ते ज्या ठिकाणी जातात तिथला उमेदवार पराभूत...; राज ठाकरेंना कोणी डिवचलं.
लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत जाहीर झालेली 'ही' निवडणूक पुढे ढकलली
लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत जाहीर झालेली 'ही' निवडणूक पुढे ढकलली.
रवींद्र धंगेकर यांच्यावर पुण्यात गुन्हा दाखल, काय आहे प्रकरण?
रवींद्र धंगेकर यांच्यावर पुण्यात गुन्हा दाखल, काय आहे प्रकरण?.
आता अलकायदाचे लोक मातोश्रीत बिर्याणी..भाजप नेत्याचा कुणावर गंभीर आरोप?
आता अलकायदाचे लोक मातोश्रीत बिर्याणी..भाजप नेत्याचा कुणावर गंभीर आरोप?.
अमोल कोल्हेंचा विरोधकांवर हल्लाबोल, 500 रूपये एका मताची किंमत अन्...
अमोल कोल्हेंचा विरोधकांवर हल्लाबोल, 500 रूपये एका मताची किंमत अन्....
800 कोटींचे शिंदे लाभार्थी, हिशोब द्यावाच लागेल; राऊतांचा गंभीर आरोप
800 कोटींचे शिंदे लाभार्थी, हिशोब द्यावाच लागेल; राऊतांचा गंभीर आरोप.
परवानगी फक्त 40 x 40 फूटांची पण होर्डिंगं लावलं..., कंपनीनं मोडला नियम
परवानगी फक्त 40 x 40 फूटांची पण होर्डिंगं लावलं..., कंपनीनं मोडला नियम.
मुंबई, नाशिक शिक्षक-पदवीधर निवडणूक लांबणीवर जाणार? काय होतेय मागणी?
मुंबई, नाशिक शिक्षक-पदवीधर निवडणूक लांबणीवर जाणार? काय होतेय मागणी?.