Budget 2025 : बजेटची सोपी गोष्ट; निर्मला सीतारमण यांच्या भाषणापूर्वी घ्या समजून या 10 शब्दांचा अर्थ
Union Budget 2025 Key Terms : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतरमण या 1 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता बजेट सादर करतील. हे बजेट मोदी 3.0 चे दुसरे बजेट असेल.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण या केंद्रीय अर्थसंकल्प 2025 सादर करतील. येत्या 1 फेब्रुवारी रोजी त्या सकाळी 11 वाजता बजेट सादर करतील. निर्मला सीतारमण या त्यांचे 8 वे बजेट सादर करतील. त्यामध्ये 6 वार्षिक आणि दोन अंतरिम बजट (Interim Budget) असतील. अर्थमंत्री निर्मला सीतारमण पंरपरेनुसार बजेट सादर करतील. त्याची तयारी अगोदरच सुरू झाली आहे. जाणून घ्या बजेट सोपी करणारे या शब्दांचा अर्थ (Budget Vocabulary)
या शब्दांचा घ्या बजेटपूर्वी अर्थ समजून
1- अर्थसंकल्प अंदाज




अर्थसंकल्पात मंत्रालय, विविध विभाग, प्रदेश, योजना यासाठी जो निधी दिल्या जातो, त्याचा अंदाज बांधण्यात येतो. त्यात निधीचा वापर किती आणि कुठे करणार याचा अंदाज व्यक्त करण्यात येतो.
2- वार्षिक आर्थिक विवरण (AF)
वार्षिक आर्थिक विवरण (Annual Financial Statement) हा एक दस्तावेज आहे. आर्थिक वर्षादरम्यान सरकारचे उत्पन्न, महसूल आणि खर्च यावर तो प्रकाश टाकतो.
3-प्रत्यक्ष कर (Direct Taxes)
प्रत्यक्ष कराचे उत्पन्न, जे थेट करदात्यांकडून मिळते. त्यात आयकर आणि कॉर्पोरेट कराचा समावेश आहे.
4- आर्थिक सर्वेक्षण (Economic Survey)
आर्थिक सर्वेक्षण बजट सत्रादरम्यान सादर करण्यात येते. आगामी आर्थिक वर्षात अर्थव्यवस्थेची गती कशी असेल, तिची कामगिरी कशी असेल याची माहिती या बजेटमध्ये कळते.
5- वित्त बिल (Finance bill )
वित्त बिल हा एक दस्तावेज आहे. हा दस्तावेज नवीन कर लावणे, नवीन करात बदल करणे अथवा कराची व्यवस्था कायम ठेवणे याची माहिती देतो.
6- वित्तीय तूट (Fiscal Deficit)
वित्तीय तूट गेल्या आर्थिक वर्षासाठी (Financial Year) सरकारच्या एकूण खर्च आणि महसूल यामधील फरकाची रक्कम आहे. त्यासाठी इतर अनेक उपाय योजना करण्यात येतात. तर वेळप्रसंगी भारतीय रिझर्व्ह बँकेकडून कर्ज सुद्धा घेण्यात येते. एकूण देशांतर्गत उत्पादनाची टक्केवारी यावर ते अवलंबून असते.
7- अप्रत्यक्ष कर (Indirect Taxes)
हे कर अप्रत्यक्षरित्या करदात्यांकडून घेण्यात येतात. यामध्ये जीएसटी, व्हॅट, सीमा शुल्क, उत्पादन शुल्क, सेवा कर वा इतर करांचा यामध्ये समावेश होतो.
8- महागाई (Inflation)
देशातंर्गत विविध वस्तू, सेवा आणि रोजच्या वापरातील पदार्थ यांच्या किंमतीत झालेली वाढ याचा महागाईवर परिणाम दिसून येतो. महागाई जितकी जास्त असेल, तितका ग्राहकांचा खर्च वाढतो.
9- नवीन कर प्रणाली (New Tax Regime)
2022 मध्ये नवीन कर प्रणालीत सवलतीच्या दरात सात टॅक्स स्लॅब (Tax Slab) आहे. आर्थिक वर्षात 2023-24 दरम्यान, नवीन कर प्रणाली डिफॉल्ट झाली आहे. तर जुनी कर प्रणाली ही एक पर्यायी व्यवस्था आहे.
10- जुनी कर व्यवस्था (Old Tax Regime)
जुनी कर व्यवस्थेत चार कर व्यवस्था आहे. यामध्ये 10 लाख रुपयांपेक्षा अधिक उत्पन्नावर 30% पेक्षा अधिक कर आकारला जातो.