Mukesh Ambani : काय सांगता, उद्योगपती मुकेश अंबानी यांनी एकाच दिवशी कमावले इतके हजार कोटी

Mukesh Ambani : अनिल अंबानी सह पत्नी टीना अंबानी यांची ईडी चौकशी करत असताना श्रीमंतांच्या यादीत पुन्हा उलटफेर होण्याची शक्यता आहे. भारतीय उद्योगपती मुकेश अंबानी हे लवकरच अब्जाधीशांच्या टॉप-10 मध्ये एंट्री करण्याची शक्यता आहे.

Mukesh Ambani : काय सांगता, उद्योगपती मुकेश अंबानी यांनी एकाच दिवशी कमावले इतके हजार कोटी
Follow us
| Updated on: Jul 05, 2023 | 1:53 PM

नवी दिल्ली : या वर्षाच्या सुरुवातीला उद्योगपती गौतम अदानी (Gautam Adani) यांनी जगातील श्रीमंतांच्या यादीत तिसरा क्रमांक गाठला होता. त्यावेळी जगभरात एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर रिलायन्स समूहाचे मुकेश अंबानी यांनी झेप घेतली होती. ते बराच काळ टॉप-10 मध्ये होते. पण ते यादीच्या बाहेर फेकल्या गेले. त्यानंतर अब्जाधीशांच्या सर्वोच्च पंक्तीत बसण्यासाठी त्यांना कवायत करावी लागली. आता तर मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांनी कमाईत षटकार लगावला आहे. एकाच दिवसांत त्यांनी इतके हजार कोटी रुपये कमावले आहे. एखादा मोठा उद्योग सुद्धा एका दिवसात इतकी मोठी उलाढाल करु शकत नाही, इतकी संपत्ती अंबानी यांनी एकाच दिवसात कमावली आहे. लवकरच एक भारतीय उद्योगपती अब्जाधीशांच्या टॉप-10 मध्ये एंट्री करणार आहे.

मस्क-झुकरबर्गची कमाई वर्ष 2023 च्या सुरुवातीला टेस्लाचे सीईओ एलॉन मस्क जगातील पहिल्या क्रमांकाचे श्रीमंत ठरले आहेत. या वर्षांत, म्हणजे सहामाहीत त्यांची एकूण नेटवर्थ 110 अब्ज डॉलरवर पोहचली आहे. या कमाईमुळे मस्क यांच्या संपत्तीत मोठी वाढ झाली. टॉप-10 मध्ये ते वेगाने पुढे सरकले. तीन अब्जाधीशांची मिळून जेवढी संपत्ती आहे, तेवढी आता मस्क यांची एकूण संपत्ती आहे. त्यांच्यानंतर मार्क झुकरबर्ग यांचा क्रमांक लागतो. त्यांनी या वर्षात 58.6 अब्ज डॉलरची कमाई केली. अनेक दिवसांनी ते टॉप-10 मध्ये पुढे आले आहेत.

शेअर बाजारातील तेजीचा फायदा एलॉन मस्क आणि मार्क झुकरबर्ग यांची एकूण संपत्ती झपाट्याने वाढली. शेअर बाजारातील उलाढालीमुळे ही तेजी आली आहे. अमेरिकन शेअर बाजाराने उसळी घेतल्याने त्यांच्या संपत्तीत वाढ झाली आहे. गेल्या 6 महिन्यात S&P500 मध्ये 16 टक्क्यांची तेजी दिसून आली. तर नॅस्डॅक 100 या कालावधीत 39 टक्क्यांनी वधारला.

हे सुद्धा वाचा

गौतम अदानी यांची संपत्ती किती जगातील अब्जाधीशांच्या यादीत मुकेश अंबानी यांच्या नंतर सध्या गौतम अदानी यांचे नाव येते. त्यांच्या संपत्तीत मध्यंतरी घसरण झाली होती. पण गेल्या 24 तासांत त्यांच्या संपत्तीत 4.89 दशलक्ष डॉलरची वाढ झाली. त्यांची एकूण संपत्ती 60.3 अब्ज डॉलरवर पोहचली आहे. ते सध्या श्रीमंतांच्या यादीत 21 व्या क्रमांकावर पोहचले आहेत. हिंडनबर्ग रिसर्चच्या दणक्यानंतर मोठी संपत्ती गमावली असली तरी गौतम अदानी या यादीत अग्रेसर आहेत.त्यांच्या संपत्तीत एकूण 60.2 अब्ज डॉलरची घसरण झाली.

अंबानी यांची रॉकेट भरारी ब्लूमबर्ग बिलेनिअर्स इंडेक्सनुसार (Bloomberg Billionaires Index) गेल्या 24 तासांमध्ये आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांनी कमाईत जोरदार मुसंडी मारली. त्यांच्या नेटवर्थ मध्ये 2.35 अब्ज डॉलर म्हणजे जवळपास 19,000 कोटी रुपयांची वाढ झाली. त्यांची एकूण संपत्ती आता 90.6 अब्ज डॉलरवर पोहचली आहे. ही रॉकेट भरारी पाहता टॉप-10 मध्ये ते लवकरच एंट्री घेतील, असे दिसते.

Non Stop LIVE Update
ईव्हीएम ठेवलेल्या स्ट्राँगरूममध्ये CCTV चा डिस्प्ले 24 तास बंद अन् ...
ईव्हीएम ठेवलेल्या स्ट्राँगरूममध्ये CCTV चा डिस्प्ले 24 तास बंद अन् ....
मुंबईत आज 2 मोठ्या जाहीर सभा, दिग्गज नेते दिसणार एकाच मंचावर
मुंबईत आज 2 मोठ्या जाहीर सभा, दिग्गज नेते दिसणार एकाच मंचावर.
अजितदादा महायुतीच्या प्रचारातून गायब? पुन्हा राजकीय भूकंपाचे संकेत?
अजितदादा महायुतीच्या प्रचारातून गायब? पुन्हा राजकीय भूकंपाचे संकेत?.
युती तुटली, तेव्हा मातोश्रीत नेमकं काय घडलं? उद्धव ठाकरेंचा गौप्यस्फोट
युती तुटली, तेव्हा मातोश्रीत नेमकं काय घडलं? उद्धव ठाकरेंचा गौप्यस्फोट.
बाळासाहेबांच्या खोलीत नेमकी काय चर्चा झाली? उद्धव ठाकरेंचा मोठा खुलासा
बाळासाहेबांच्या खोलीत नेमकी काय चर्चा झाली? उद्धव ठाकरेंचा मोठा खुलासा.
'आताही बॅगा घेऊन आलोय', राऊतांच्या आरोपावर एकनाथ शिंदेंचं उत्तर
'आताही बॅगा घेऊन आलोय', राऊतांच्या आरोपावर एकनाथ शिंदेंचं उत्तर.
मोठी बातमी : नाशिकमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बॅगांची तपासणी
मोठी बातमी : नाशिकमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बॅगांची तपासणी.
Monsoon Update:नागरिकांची उकाड्यापासून सुटका, यंदा मान्सून लवकर धडकणार
Monsoon Update:नागरिकांची उकाड्यापासून सुटका, यंदा मान्सून लवकर धडकणार.
पैसा फेको तमाशा देखो हाच शिंदे गटाचा जाहीरनामा : संजय राऊत
पैसा फेको तमाशा देखो हाच शिंदे गटाचा जाहीरनामा : संजय राऊत.
मोदींच्या कांदा प्रश्नावर शरद पवार यांचं चोख प्रत्युत्तर, म्हणाले...
मोदींच्या कांदा प्रश्नावर शरद पवार यांचं चोख प्रत्युत्तर, म्हणाले....