कर्ज वसुलीसाठी बँकांची कठोर पाऊले, थकबाकीदार कंपन्यांचा दिवाळखोरीच्या प्रक्रियेमध्ये समावेश

कर्ज वसुलीसाठी बँकांची कठोर पाऊले, थकबाकीदार कंपन्यांचा दिवाळखोरीच्या प्रक्रियेमध्ये समावेश
प्रातिनिधीक फोटो

देशभरातील विविध बँका आणि अर्थपुरवठा करणाऱ्या संस्थांनी कर्जाच्या वसुलीसाठी कठोर पाऊले उचलायला सुरुवात केली आहे. याचे मुख्य कारण म्हणेज अनेक छोट्या, मोठ्या कंपन्यांनी तसेच ग्राहकांनी कर्ज घेतले आहे. मात्र कर्जाची वेळेत न होणारी परतफेड हा बँकांसाठी चिंतेचा विषय बनला आहे.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: अजय देशपांडे

Dec 11, 2021 | 12:02 PM

नवी दिल्ली :  देशभरातील विविध बँका आणि अर्थपुरवठा करणाऱ्या संस्थांनी कर्जाच्या वसुलीसाठी कठोर पाऊले उचलायला सुरुवात केली आहे. याचे मुख्य कारण म्हणेज अनेक छोट्या, मोठ्या कंपन्यांनी तसेच ग्राहकांनी कर्ज घेतले आहे. मात्र कर्जाची वेळेत न होणारी परतफेड हा बँकांसाठी चिंतेचा विषय बनला आहे. एनपीए खात्यांची संख्या सातत्याने वाढ असल्यामुळे बँकांवर दबाव निर्माण झाला आहे. त्यामुळे आता एनपीए खात्याची संख्या नियंत्रीत करून, मुदतीच्या आत कर्ज वसुलीसाठी बँकांकडून कठोर निर्णय घेतले जात आहेत.

285  कंपन्यांचे दिवाळे 

वेळेत कर्जफेड न करणाऱ्या जवळपास 285  कंपन्यांना गेल्या सहा महिन्यांमध्ये देशभरातील विविध बँकांनी दिवाळखोरीच्या प्रक्रियेमध्ये सहभागी केले  आहे. तसेच त्यांच्या संपत्तीवर जप्ती देखील आणण्यात आली आहे. कर्जफेड न करणाऱ्या कंपन्यांच्या संपत्तीचा लिलाव करून बँका आता आपले कर्ज वसूल करत आहेत. दरम्यान सप्टेंबर ते नोव्हेंबर या तीमाहीमध्ये मुद्दामहून कर्ज न भरणाऱ्या 144 कंपन्या समोर आल्या आहेत. कोरोना काळात कर्जाच्या वसुलीसाठी कोणत्याही कंपन्यांवर दबाव टाकू नये, तसेच थकबाकीदार कंपन्यांचा समावेश दिवाळखोरीच्या प्रक्रियेत करू नये, असे आदेश सरकारकडून काढण्यात आले होते. मात्र कोरोनाचे सावट काही प्रमाणात दूर होताच  हे आदेश आता मागे घेण्यात आले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा बँकांनी आपल्या वसुली मोहिमेला प्रारंभ केला आहे.

कोरोनाचा कंपन्यांना फटका 

दरम्यान गेल्या दोन वर्षांपासून देशावर कोरोनाचे संकट होते. कोरोनाकाळात सर्व व्यवसाय ठप्प झाले होते.  उत्पादन बंद असल्याने कर्ज फेडायचे कसे असा प्रश्न कंपन्यांसमोर होता. तसेच अनेकांनी बँकांकडून विविध प्रकारचे कर्ज घेतले होते. मात्र कोरोना काळात नोकरी गेल्याने हे कर्ज त्यांना वेळेत परतफेड करता आले नाही, त्यामुळे यादरम्यान बँकांकडील एनपीए खात्यात वाढ झाली.

संबंधित बातम्या

आयकर रिटन भरणाऱ्यांच्या संख्येत घट; …या कारणांमुळे घटली करदात्यांची संख्या

‘हे’ आहेत सर्वोत्तम पाच क्रेडिट कार्ड, जाणून घ्या त्यांचे फायदे

तुम्ही डेबिट कार्ड वापरता?; मग घ्या ‘ही’ काळजी, अन्यथा होऊ शकते फसवणूक

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें