कॅनरा बँकेत मर्यादित कालावधीची ऑफर सुरू, 6.65% दराने गृहकर्ज, इतर बँकांचे दर काय?

गृहकर्जाच्या सामान्य दराबद्दल बोलायचे झाल्यास ते 6.90 टक्क्यांपासून सुरू होते आणि 10.05 टक्क्यांपर्यंत निश्चित केले जाते. कर्जाची रक्कम अर्ज करणाऱ्या व्यक्तीच्या प्रोफाईलवर अवलंबून असेल. कर्जाचा कालावधी 30 वर्षांचा आहे आणि प्रक्रिया शुल्क कर्जाच्या रकमेच्या 0.5% अधिक GST किंवा किमान 1500 रुपये आणि कमाल 10,000 रुपये अधिक GST म्हणून आकारले जाऊ शकते.

कॅनरा बँकेत मर्यादित कालावधीची ऑफर सुरू, 6.65% दराने गृहकर्ज, इतर बँकांचे दर काय?
होम लोन

नवी दिल्लीः देशातील सरकारी बँक कॅनरा बँकेने गृहकर्जाची विशेष ऑफर सुरू केलीय. ही ऑफर मर्यादित कालावधीसाठी आहे. बँकेच्या म्हणण्यानुसार, ग्राहकांना 6.65 टक्के दराने गृहकर्ज (Canara Bank Home Loan) दिले जात आहे. हा गृहकर्ज दर परिचयात्मक आहे. कॅनरा बँकेने 4 डिसेंबरला हे कर्ज सुरू केले.

गृहकर्जावरील व्याजदर आकर्षक ठेवलाय

कॅनरा बँकेने म्हटले आहे की, सर्व ग्राहक 6.65 टक्के दराने सुरू झालेल्या मर्यादित कालावधीच्या ऑफरचा लाभ घेऊ शकतात आणि ही योजना सर्व प्रकारच्या कर्जाच्या रकमेसाठी लागू आहे. कॅनरा बँकेने एका प्रसिद्धीपत्रकात ही माहिती दिलीय. गृहकर्जावरील व्याजदर आकर्षक ठेवण्यात आलाय, त्याची मंजुरीदेखील लवकर आणि कमी कागदपत्रांसह दिली जात आहे. बँकेने गृहकर्जाचे प्रक्रिया शुल्क आणि दस्तऐवजीकरण शुल्क माफ केलेय. मर्यादित कालावधीच्या ऑफरमध्ये तुम्ही अनेक विशेष वैशिष्ट्यांसह कॅनरा बँकेकडून गृहकर्ज घेऊ शकता.

स्कॅन करा आणि नवीन वैशिष्ट्य मिळवा

ज्यांना कॅनरा बँकेच्या या कर्ज ऑफरचा लाभ घ्यायचा आहे, ते यासाठी ऑनलाइन अर्ज करू शकतात. यासाठी बँकेचा QR कोड स्कॅन करावा लागेल. क्यूआर कोड स्कॅन केल्यानंतर तुम्हाला गृहकर्जासाठी अर्ज करण्यासाठी त्वरित मंजुरी मिळते. या खास फीचरला ‘स्कॅन अँड अप्लाय’ असे नाव देण्यात आलेय. हे वैशिष्ट्य केवळ गृहकर्जासाठी नाही तर कॅनरा बँकेचे ग्राहक याद्वारे कार कर्ज, शैक्षणिक कर्ज, सुवर्ण कर्ज आणि वैयक्तिक कर्जाचा लाभ घेऊ शकतात.

सामान्य कर्ज व्याजदर

गृहकर्जाच्या सामान्य दराबद्दल बोलायचे झाल्यास ते 6.90 टक्क्यांपासून सुरू होते आणि 10.05 टक्क्यांपर्यंत निश्चित केले जाते. कर्जाची रक्कम अर्ज करणाऱ्या व्यक्तीच्या प्रोफाईलवर अवलंबून असेल. कर्जाचा कालावधी 30 वर्षांचा आहे आणि प्रक्रिया शुल्क कर्जाच्या रकमेच्या 0.5% अधिक GST किंवा किमान 1500 रुपये आणि कमाल 10,000 रुपये अधिक GST म्हणून आकारले जाऊ शकते. पगारदार आणि स्वयंरोजगार असलेल्या दोन्ही व्यक्ती कॅनरा बँकेच्या गृहकर्जासाठी अर्ज करू शकतात. घर खरेदी, प्लॉट खरेदी, घर बांधणे आणि घर दुरुस्तीसाठी कर्ज घेता येते.

गृहकर्जाची वैशिष्ट्ये

💠प्रत्येक ग्राहकाच्या कर्जाच्या गरजेनुसार गृहकर्ज योजना ऑफर केल्या जातात 💠6.90% पासून सुरू होणारे आकर्षक गृहकर्ज व्याजदर (मर्यादित कालावधीसाठी ऑफर 6.65%) p.a. 💠जास्त परतफेडीचा कालावधी 30 वर्षांपर्यंत वाढवला जाऊ शकतो 💠PMAY “सर्वांसाठी घरे” योजनेअंतर्गत गृहकर्ज दिले जाते 💠गृहकर्जावर कर लाभ

अनेक बँकांकडून स्वस्त गृहकर्ज

कॅनरा बँकेच्या मर्यादित कालावधीच्या ऑफरचा व्याजदर पाहिला तर तो 6.65 टक्के आहे आणि या दराच्या आसपास अनेक सरकारी बँका गृहकर्ज देत आहेत. स्टेट बँकेचे गृहकर्ज 6.70 टक्क्यांपासून सुरू होते. एचडीएफसीसुद्धा त्याच दराने गृहकर्ज देते. कोटक महिंद्राचे खासगी बँकांमधील गृहकर्ज 6.55 टक्क्यांपासून सुरू होते. PNB चे गृहकर्ज देखील 6.55 टक्के, बँक ऑफ बडोदाचे गृहकर्ज 6.50 टक्के, युनियन बँकेचे गृहकर्ज 6.40 टक्क्यांपासून सुरू होत आहे.

संबंधित बातम्या

1.18 रुपयाचा शेअर झाला 78 रुपयांचा, वर्षभरात 1 लाखाचे झाले 66 लाख, तुमच्याकडे आहे का?

ATM कार्ड घरीच विसरलात, बँक ऑफ बडोदाकडून कार्डशिवाय पैसे काढण्याची सुविधा, पण कशी?

Published On - 3:43 pm, Sun, 5 December 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI