1.18 रुपयाचा शेअर झाला 78 रुपयांचा, वर्षभरात 1 लाखाचे झाले 66 लाख, तुमच्याकडे आहे का?

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: |

Updated on: Dec 05, 2021 | 2:08 PM

सूरज इंडस्ट्रीजच्या शेअरच्या किमतीत झालेली वाढ पाहिली तर एका महिन्यापूर्वी एखाद्या गुंतवणूकदाराने या मल्टीबॅगर पेनी स्टॉकमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते तर आज त्याचे 1 लाख रुपये 2.40 लाख झाले असते. जर गुंतवणूकदाराने या पेनी स्टॉकमध्ये 6 महिन्यांपूर्वी 1 लाख रुपये गुंतवले असते तर आज त्याचे 1 लाख रुपये 35 लाख झाले असते.

1.18 रुपयाचा शेअर झाला 78 रुपयांचा, वर्षभरात 1 लाखाचे झाले 66 लाख, तुमच्याकडे आहे का?
संग्रहित छायाचित्र

नवी दिल्ली : गेल्या दीड वर्षात शेअर बाजाराने गुंतवणूकदारांना उत्कृष्ट परतावा दिला. या कालावधीत अनेक समभागांनी 2021 मध्ये मल्टीबॅगर स्टॉक टिप्सच्या (Multibagger stock tips) यादीत स्थान मिळवले आणि यामध्ये काही पेनी स्टॉकचा (penny stocks) समावेश आहे. सूरज इंडस्ट्रीजचा (Suraj Industries) शेअर त्यापैकीच एक आहे. हा मल्टीबॅगर पेनी शेअर 1.18 (BSE वर 19 ऑगस्ट रोजी बंद किंमत) रुपयांवरून 78.15 (BSE वर 3 डिसेंबर 2021 रोजी बंद किंमत) रुपयांपर्यंत वाढला, ज्याने एका वर्षात सुमारे 6500 टक्के वाढ दर्शविली.

1 महिन्यात 140 टक्के वाढ

सूरज इंडस्ट्रीजच्या शेअरच्या किमतीवर नजर टाकली तर गेल्या वर्षभरापासून हा पेनी शेअर झपाट्याने वाढत आहे. गेल्या एका महिन्यात हा पेनी स्टॉक 32.80 रुपयांवरून 78.15 रुपयांपर्यंत वाढला, या कालावधीत या मल्टीबॅगरमध्ये जवळपास 140 टक्क्यांनी वाढ झाली. गेल्या 6 महिन्यांत या मल्टीबॅगर पेनी स्टॉकची किंमत सुमारे 3400 टक्क्यांच्या वाढीसह 2.24 रुपयांवरून 78.15 रुपयांपर्यंत वाढली.

1.18 रुपयांचा शेअर 78 रुपये झाला

त्याचप्रमाणे वार्षिक आधारावर सूरज इंडस्ट्रीजच्या शेअरची किंमत 1.95 रुपयांवरून 78.15 रुपये प्रति शेअर झाली, ज्यात या कालावधीत सुमारे 3900 टक्के वाढ झाली. अशा प्रकारे हा मल्टीबॅगर स्टॉक 1.18 रुपये प्रति शेअरच्या पातळीवरून 78.15 रुपयांपर्यंत वाढला, म्हणजेच एका वर्षात जवळपास 66 पटीने वाढला आहे.

वर्षभरात 1 लाखाचे 66 लाख झाले

सूरज इंडस्ट्रीजच्या शेअरच्या किमतीत झालेली वाढ पाहिली तर एका महिन्यापूर्वी एखाद्या गुंतवणूकदाराने या मल्टीबॅगर पेनी स्टॉकमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते तर आज त्याचे 1 लाख रुपये 2.40 लाख झाले असते. जर गुंतवणूकदाराने या पेनी स्टॉकमध्ये 6 महिन्यांपूर्वी 1 लाख रुपये गुंतवले असते तर आज त्याचे 1 लाख रुपये 35 लाख झाले असते.

तर आज त्याचे 1 लाख रुपये 40 लाख झाले असते

जर एखाद्या गुंतवणूकदाराने 2021 च्या सुरुवातीला बीएसईच्या या लिस्टिंग शेअरमध्ये 1.95 रुपयांना सूरज इंडस्ट्रीजचे शेअर्स खरेदी करण्यासाठी 1 लाख रुपये गुंतवले असते, तर आज त्याचे 1 लाख रुपये 40 लाख झाले असते. जर एखाद्या गुंतवणूकदाराने वर्षभरापूर्वी या काउंटरमध्ये 1.18 रुपये प्रति शेअरच्या पातळीवर हा पेनी स्टॉक विकत घेण्यासाठी 1 लाख रुपये गुंतवले असतील, तर त्याचे 1 लाख रुपये आजपर्यंत 66 लाख रुपये झाले असतील.

संबंधित बातम्या

ATM कार्ड घरीच विसरलात, बँक ऑफ बडोदाकडून कार्डशिवाय पैसे काढण्याची सुविधा, पण कशी?

..तर Emergency Fund अडचणीच्या वेळी कामी येणार, किती अन् कशी गुंतवणूक करावी?

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI