आता गॅस सिलिंडर मोफत मिळणार, जाणून घ्या पेटीएमची नवी ऑफर

इंडेन, भारत आणि HP या कंपन्यांचे LPG गॅस सिलिंडर मोफत मिळवण्याची पेटीएमकडून एक नामी ऑफर जारी करण्यात आली आहे. (gas booking Paytm cashback)

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 14:59 PM, 22 Jan 2021
आता गॅस सिलिंडर मोफत मिळणार, जाणून घ्या पेटीएमची नवी ऑफर

मुंबई : इंडेन, भारत आणि HP या कंपन्यांचे LPG गॅस सिलिंडर मोफत मिळवण्याची ग्राहकांकडे नामी संधी चालून आली आहे. पेटीएमने (paytm) गॅस सिलिंडरबाबत एक खास कॅशबॅकची ऑफर जारी केली आहे. सिलिंडरवर मिळणाऱ्या सबसीडीमुळे सामान्य ग्राहकांना गॅस सिलिंडर जवळपास 700 ते 750 रुपयांना पडतो. याच कॅशबॅकच्या माध्यमातातून गॅस सिलिंडर मोफत मिळणार आहे. (cashback offer by Paytm on first time gas booking)

पेटीएमची योजना काय?

गॅस सिलिंडर मोफत हवे असेल तर त्यासाठी ग्राहकांना पेटीएम अ‌ॅपच्या माध्यमातून गॅस बुकिंग करावे लागेल. किंवा आयव्हीआरएस (IVRS) च्या माध्यमातून गॅस बुक केल्यानंतर पेटीएमच्या माध्यमातून पैसे द्यावे लागतील. त्यानंतर पेटीएमकडून ग्राहकांना कॅशबॅक दिला जाईल. कमीतकमी 500 रुपयांपर्यंतच्या गॅस बुकिंगनंतर ग्राहकांना कॅशबॅक मिळेल. ही योजना 31 जानेवारी रोजी समाप्त होईल.

एकदाच फायदा घेता येणार

पेटीएमकडून चालवली जाणारी ही योजना 31 जानेवारी रोजी समाप्त होईल. या कालावधी दरम्यान कॅशबॅक योजनेचा एकदाच लाभ मिळेल. पेटीएम अ‌ॅपच्या मध्यमातून पहिल्यांदा गॅस बूक केल्यानंतर ही योजना आपोआप अ‌ॅक्टिव्हेट होईल. एचपी, इंडेन किंवा भारत गॅस या कंपन्यांचे गॅस बुक केल्यानंतर कॅशबॅक मिळवण्यासाठी ग्राहकांना एक स्क्रॅचकार्ड दिले जाईल. हे कार्ड स्क्रॅच केल्यानंतर ग्राहकांच्या खात्यात कॅशबॅकची रक्कम 24 तासांच्या आत जमा ग्राहकांच्या पेटीएम व्हॅलेटमध्ये जमा होईल.

दरम्यान, एलपीजी गॅस सिलिंडर बुक करताना प्रत्येक स्क्रॅच कार्डची वैधता 7 दिवसांच्या आत समाप्त होईल असे पेटीएमने सांगितले आहे.

संबंधित बातम्या :

आता फक्त 30 मिनिटांत घरी येणार LPG सिलिंडर, ‘या’ तारखेपासून सेवा सुरू

आता अ‍ॅड्रेस प्रूफशिवाय LPG सिलिंडर खरेदी करता येणार, जाणून घ्या प्रोसेस

आग विझवताना गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट, अग्निशमन दलाच्या 3 जवानांसह ७ जखमी

(cashback offer by Paytm on first time gas booking)