Pension Scheme : पेन्शनधारकांसाठी गुडन्यूज! केंद्र सरकारने केली ही घोषणा मोठी

कल्याण माणिकराव देशमुख, Tv9 मराठी

|

Updated on: Feb 02, 2023 | 9:36 PM

Pension Scheme : पेन्शनधारकांसाठी केंद्र सरकारने मोठी घोषणा केली आहे, त्याचा फायदा निवृत्तीधारकांना होईल.

Pension Scheme : पेन्शनधारकांसाठी गुडन्यूज! केंद्र सरकारने केली ही घोषणा मोठी
मोठी घोषणा

नवी दिल्ली : निवृत्तीधारकांसाठी आनंदवार्ता आहे. केंद्र सरकारने पेन्शनर्ससाठी नवीन घोषणा केली आहे. पेन्शन योजनेत (Pension Scheme) मोठा फेरबदल करण्यात आला आहे. निवृत्तीधारकांना मोठा फायदा मिळणार आहे. केंद्रीय अर्थसंकल्पात (Budget 2023-24) वन रँक वन पेन्शन (One Rank One Pension) योजनेचा ऊहापोहच करण्यात आला नाही तर भरीव तरतूद ही करण्यात आली आहे. सशस्त्र दलातील निवृत्तीधारक आणि कौटुंबिक निवृत्तीधारकांच्या सुधारणेसाठी आणि त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी 28,138 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या योजनेचा पेन्शनर्सला मोठा दिलासा मिळेल.

आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये 3,582.51 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. तर आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये 5,431.56 कोटी रुपयांची अंदाजित तरतूद करण्यात आली आहे. माजी सैनिक अंशदायी आरोग्य योजनेसाठी (ECHS) भरीव निधीची तरतूद करण्यात आली आहे.

ही योजना भारतातील संपूर्ण सशस्त्र दल आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी लागू करण्यात आली आहे. ही कॅशलेस आरोग्य सुविधा आहे. ही चांगली सेवा देते. केंद्रीय अर्थसंकल्पात अग्निवीर कोषसाठी सूट-सवलत-सवलत (E-E-E) दर्जाही दिला आहे.

हे सुद्धा वाचा

याविषयीची घोषणा करण्यात आली आहे. त्यामध्ये आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये संरक्षण पेन्शन बजेटमध्ये 15.5 टक्क्यांची वृद्धी नोंदविण्यात आली आहे. या आर्थिक वर्षासाठी ही रक्कम 1,38,205 कोटी रुपये आहे. तर गेल्या आर्थिक वर्षात या कारणासाठी 1,19,696 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती.

याशिवाय आरई 2022-23 मध्ये 1,53,415 कोटी रुपयांच्या निधीवर 28 टक्क्यांची वृद्धी नोंदविण्यात आली आहे. ही वृद्धी 33,718 कोटी रुपये आहे. या योजनेतंर्गत वन रँक वन पेन्शन अंतर्गत सशस्त्र दलातील पेन्शनधारक आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी भरीव निधीची तरतूद करण्यात आली आहे. त्यासाठी 28,138 कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे.


Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI